Atrangi Re | ओटीटीवरही अक्षय कुमारची हवा, डिस्ने प्लस हॉटस्टारने ‘अतरंगी रे’ चित्रपट कोटींमध्ये विकत घेतला!
प्रदीर्घ कालावधीनंतर देशभरातील सर्व चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. थिएटर सुरू झाल्यानंतर अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. रिलीजनंतर, या चित्रपटाने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि बंपर कमाई केली. हा धडाका अजूनही सुरूच आहे.
मुंबई : प्रदीर्घ कालावधीनंतर देशभरातील सर्व चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. थिएटर सुरू झाल्यानंतर अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. रिलीजनंतर, या चित्रपटाने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि बंपर कमाई केली. हा धडाका अजूनही सुरूच आहे. या चित्रपटाने जवळपास 200 कोटींचा व्यवसाय केला आहे. अक्षय केवळ बॉक्स ऑफिसचा ‘खिलाडी’ नाही तर, आता तो ओटीटीचा देखील ‘खिलाडी’ झाला आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’ डिस्ने प्लस हॉटस्टारने कोट्यवधी रुपयांना विकत घेतला आहे.
अक्षय कुमारच्या नशिबाचे तारे सध्या चमकत आहेत. ‘सूर्यवंशी’च्या बंपर कमाईनंतर ‘अतरंगी रे’च्या इतक्या मोठ्या डीलने त्याला यावेळचा सर्वात मोठा स्टार घोषित केला आहे. डिस्नेने 200 कोटी देऊन हा चित्रपट विकत घेतला आहे. त्यानुसार हा चित्रपट रिलीज न होता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाची किंमत 120 कोटींच्या आसपास आहे. दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हॉटस्टारवर प्रदर्शित होत असलेल्या ‘अतरंगी रे’ला आतापर्यंतची सर्वात मोठी डील मिळाली आहे, हॉटस्टारने चित्रपट 200 कोटींमध्ये खरेदी केला आहे.
सर्वात महागडा करार
चित्रपटगृह उघडल्यानंतर OTT चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करत असल्याचे या करारावरून स्पष्टपणे दिसून येते. आता भविष्यातही असे सौदेही पाहायला मिळणार आहेत. त्याला निर्मात्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे की, थिएटर व्यतिरिक्त तो त्याच्या चित्रपटांमधून मोठी कमाई करू शकतो. त्यामुळे हा करार अतिशय आश्चर्यकारक आणि महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सुपरहिट ठरला आहे. अशा कराराचा थिएटरवर काय परिणाम होईल, हे पाहावे लागेल. परंतु, सध्या या डीलने सर्वाना सांगितले आहे की, ओटीटी आता चित्रपटांच्या डीलबाबत आक्रमक होणार आहे.
‘हे’ चित्रपटही करोडो रुपये देऊन घेतले विकत!
याआधीही ओटीटीवर चित्रपट विकले गेले आहेत. पण, ही डील आतापर्यंतची सर्वात महागडी डील आहे. याआधी हा रेकॉर्ड अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’च्या नावावर होता, ज्याला 125 कोटींना विकत घेतले गेले होते. सलमान खानच्या चित्रपटाची डील 190 कोटींमध्ये झाली होती, पण त्या डीलमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होता. थिएटर, ओटीटी आणि सॅटेलाइट राइट्स या डीलमध्ये होत्या. हॉटस्टारने नव्याने अजय देवगणचा ‘भुज’ 100 कोटींना विकत घेतला होता. अलीकडेच नेटफ्लिक्सने कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’ चित्रपटाची किंमत 135 कोटी ठेवली होती. त्याचवेळी सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशाह’ चित्रपट अॅमेझॉनने 70 कोटींना विकत घेतला होता.
हेही वाचा :
कतरिना कैफच्या हातावर रचली जाणार विकी कौशलच्या नावाची मेहंदी, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्!