Bigg Boss OTT launch LIVE UPDATES : पहिल्याच दिवशी ‘या’ स्पर्धकाला मोठा झटका! कनेक्शन न मिळाल्याने थेट एलिमिनेशनमध्ये अडकणार!

| Updated on: Aug 08, 2021 | 11:38 PM

आज म्हणजेच 8 ऑगस्टपासून 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) सुरू होणार आहे. हा बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात अधिक काळ चालणारा म्हणजेच 6 महिन्यांचा हा सीझन असणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो सुरू होणार आहे.

Bigg Boss OTT launch LIVE UPDATES : पहिल्याच दिवशी 'या' स्पर्धकाला मोठा झटका! कनेक्शन न मिळाल्याने थेट एलिमिनेशनमध्ये अडकणार!
BB House

मुंबई : आज म्हणजेच 8 ऑगस्टपासून ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) सुरू होणार आहे. हा बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात अधिक काळ चालणारा म्हणजेच 6 महिन्यांचा हा सीझन असणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो सुरू होणार आहे. ओटीटीवर सहा आठवडे लाईव्ह दाखवल्यानंतर, या शोचे काही स्पर्धक सलमान खानच्या ‘बिग बॉस’ हाऊसमध्ये जातील. आजच्या दिवशी 12 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत आणि पहिल्यांदा सलमान खान नाही, तर करण जोहर यावेळी बिग बॉस स्पर्धकांचे स्वागत करताना दिसणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Aug 2021 11:36 PM (IST)

    पहिल्याच दिवशी ‘या’ स्पर्धकाला मोठा झटका! कनेक्शन न मिळाल्याने थेट एलिमिनेशनमध्ये अडकणार!

    बिग बॉसच्या ओटीटी घरात कोणाशीही कनेक्शन न झाल्यामुळे दिव्या अग्रवालला पहिल्याच दिवशी एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. आता तिला प्रेक्षकांची मने जिंकायची आहेत, जेणेकरून त्यांच्या मतांच्या आधारे या शोमध्ये पुढे जाऊ शकते.

     

  • 08 Aug 2021 11:21 PM (IST)

    ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात अवतरली ‘बहु हमारी रजनीकांत’!

    रिद्धिमा पंडित ‘बहू हमारी रजनीकांत’ या शोमुळे प्रसिद्ध झाली. या मालिकेत तिने सुपर ह्युमनॉइड रोबोटची भूमिका केली होती. अभिनय करण्यापूर्वी, 31 वर्षीय अभिनेत्रीने दूरदर्शनच्या जाहिरातींमध्ये मॉडेलिंग केले होते. तिचा शो ऑफ एअर गेल्यानंतर रिद्धिमा ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये दिसली. ती ‘खतरों के खिलाडी सीझन 9’ या रिअॅलिटी शोची सेकंड रनरअप राहिली आहे.

  • 08 Aug 2021 11:14 PM (IST)

    टीव्ही शो क्वीन दिव्या अग्रवाल गाजवणार ‘बिग बॉस ओटीटी’चं आलिशान घर!

    दिव्या अग्रवालने यापूर्वी स्प्लिट्सविला, ऐस ऑफ स्पेस आणि रोडीजसारखे रिअॅलिटी शो केले आहेत. दिव्याने आपल्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली. दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती स्प्लिट्सविला सीझन 11च्या स्पर्धक प्रियांक शर्माची एक्स गर्लफ्रेंड होती. पण सध्या ती ‘खतरों के खिलाडी’ स्पर्धक वरुण सूदला डेट करत आहे. अलीकडेच तिने स्वतःचे फॅशन लेबल देखील लाँच केले आहे.

  • 08 Aug 2021 10:52 PM (IST)

    ‘बिग बॉस ओटीटी’च्या हंगाम्याला भोजपुरी तडका, अभिनेत्री अक्षरा सिंहची ग्रँड एंट्री!

    लोकांना भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह खूप आवडते. ती भोजपुरी सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने 2010च्या अॅक्शन ड्रामा सत्यमेव जयतेमध्ये रवि किशनच्या बरोबरीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने बिग बॉस 13 स्पर्धक खेसारी लाल यादव आणि पवन सिंग यांच्यासोबत काम केले आहे. यापूर्वी अक्षरा ‘काला टीका’, ‘पोरस’, ‘सेवा वाली बहू’सारख्या टीव्ही शोचाही भाग राहिली आहे.

  • 08 Aug 2021 10:41 PM (IST)

    मस्त मौला सोशल मीडिया इनफ्ल्यूइन्सर मुस्कान जट्टानाची ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात जबरदस्त एंट्री!

    20 वर्षीय मुस्कान सोशल मीडियावर मूस जट्टाना म्हणून ओळखली जाते. ती मोहाली, चंदीगड येथील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. मुस्कानने तिचे शिक्षण ऑस्ट्रेलियामध्ये केले आहे. अहवालानुसार, तिचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

  • 08 Aug 2021 10:20 PM (IST)

    गायिका नेहा भसीनची ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात जबरदस्त एंट्री!

    गायिका नेहा भसीनने जबरदस्त गाण्याच्या सादरीकरणासह बिग बॉसच्या मंचावर प्रवेश केला. तिने तिचे लोकप्रिय गाणे ‘धुनकी धुनकी’ गायले.

  • 08 Aug 2021 09:56 PM (IST)

    बोल्ड अभिनेत्री आणि सोशल मीडिया इनफ्ल्यूइन्सर उर्फी जावेदचा ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात प्रवेश!

    उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये जन्मलेल्या 25 वर्षीय उर्फी जावेदचे सोशल मीडियावर 1.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. उर्फीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘ए मेरे हमसफर’सारखे शो केले आहेत. उर्फी जावेदने बिग बॉसच्या मंचावर प्रतिक सहजपाल आणि पवित्रा पुनिया यांच्यातील संबंध या चर्चेत उघड केले.

  • 08 Aug 2021 09:49 PM (IST)

    राकेश बापट आणि शमिता शेट्टी, ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात जमली पहिली जोडी!

    शमिता शेट्टीने तिचे कनेक्शन म्हणून राकेश बापट आणि करण राकेश नाथ यांची निवड केली. यानंतर राकेश आणि करणने तिच्यासाठी भेळ बनवली. भेळ खाल्ल्यानंतर शमिताने राकेश बापटला तिचे कनेक्शन म्हणून निवडले.

  • 08 Aug 2021 09:30 PM (IST)

    शिल्पा शेट्टीची लाडकी बहिण ‘बिग बॉस ओटीटी’ची पहिली महिला स्पर्धक!

    शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने ‘bigg boss ott’मध्ये प्रवेश केला आहे. शमिता 10 वर्षांपूर्वी बिग बॉसमध्ये दिसली होती. शमिताला असे वाटते की कदाचित शोमध्ये प्रवेश करण्याची ही योग्य वेळ नसेल, पण तिने खूप पूर्वी हा शो स्वीकारला होता. म्हणूनच ती आता या शोला नकार देणार नाहीये.

  • 08 Aug 2021 09:10 PM (IST)

    बिग बॉसची माजी स्पर्धक पवित्रा पुनियाचा एक्स बॉयफ्रेंड प्रतिक सहजपाल ‘बिग बॉस ओटीटी’ सहावा स्पर्धक!

    दिल्लीच्या प्रतीक सहजपालने रिअॅलिटी शो ‘लव्ह स्कूल सीझन 3’ सह चित्रपट मनोरंजन विश्वात प्रवेश केला. त्याने 2018 मध्ये रोडीज एक्सट्रीमसाठी ऑडिशनही दिले, परंतु परीक्षकांना प्रभावित करू शकला नाही. यानंतर त्याने Ace of Space मध्ये भाग घेतला. त्याने आणि पवित्र पुनिया यांनी काही काळ एकमेकांना डेट केले होते.

  • 08 Aug 2021 09:02 PM (IST)

    अभिनेता करण नाथ तब्बल 9 वर्षानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर, ‘बिग बॉस ओटीटी’चा पाचवा स्पर्धक!

    अभिनेता करण नाथने मिस्टर इंडिया (1987) मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘ये दिल आशिकाना’ (2002) मध्ये तो रोमँटिक हिरोची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. 

  • 08 Aug 2021 08:48 PM (IST)

    ‘डान्स दिवाने’चा कोरिओग्राफर निशांत भट्ट ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील स्पर्धकांना आपल्या तालावर नाचवणार!

    ‘डान्स दिवाने’चा कोरिओग्राफर निशांत भट्ट ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील स्पर्धकांना आपल्या तालावर नाचवणार!

  • 08 Aug 2021 08:35 PM (IST)

    ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात धमाल करायला सज्ज झालाय पंजाबी गायक मिलिंद गाबा!

    ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात धमाल करायला सज्ज झालाय पंजाबी गायक मिलिंद गाबा! मंचावर येताच त्याने करण जोहरच्या एका लोकप्रिय गाण्याचे पंजाबी गाणे तयार केले आहे.

  • 08 Aug 2021 08:24 PM (IST)

    युट्युबर झीशान खान ठरला दुसरा स्पर्धक!

    Zeeshan Khan

    झीशान खान

    युट्युबर आणि अभिनेता असलेला झीशान खान ‘बिग बॉस ओटीटी’च्या मंचावर अवतरला आहे. एका व्हिडीओमुळे चर्चेत आलेला हा अभिनेता आता या घरात धमाल करणार आहे.

  • 08 Aug 2021 08:14 PM (IST)

    ‘बिग बॉस ओटीटी’चा पहिल्या स्पर्धक ‘राकेश बापट’ची घरात एंट्री!

    Rakesh Bapat

    राकेश बापट

    ‘बिग बॉस ओटीटी’चा पहिल्या स्पर्धक  अभिनेता राकेश बापट याची घरात एंट्री झाली आहे.

  • 08 Aug 2021 08:01 PM (IST)

    करण जोहरने फिल्मी स्टाईलमध्ये घेतली एंट्री!

    प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर शो होस्ट करणार आहे. मात्र, शो सुरू होण्यापूर्वी करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक अतिशय रोचक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. करण जोहरने चाहत्यांना ‘कभी खुशी कभी गम’ स्टाईलमध्ये या घराचे दर्शन घडवले आहे.

  • 08 Aug 2021 07:59 PM (IST)

    आलिशान घराच्या सफरीने ‘बिग बॉस ओटीटी’ची सुरुवात, पाहा ‘या’ घराची झलक!

    Bigg Boss 2

    बिग बॉस ओटीटीचे घर दिग्दर्शक ओमंग कुमार आणि डिझायनर वनिता ओमुंग कुमार यांनी डिझाइन केले आहे. ओमंगने बिग बॉसच्या घराला नवीन रूप दिले आहे.

  • 08 Aug 2021 07:39 PM (IST)

    ‘परम सुंदरी’ बनून मलायका लावणार चार चांद!

    बिग बॉस ओटीटी या शोच्या प्रीमिअरसाठी भव्य तयारीही करण्यात आली आहे. बिग बॉस ओटीटीच्या प्रीमियरमध्ये मलायका अरोराही तिच्या स्टाईलची जादू पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे. वास्तविक, शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात मलायका अरोरा ‘मिमी’ चित्रपटातील ‘परम सुंदरी’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.

  • 08 Aug 2021 07:03 PM (IST)

    काही वेळातच ‘बिग बॉस’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला

    जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल?

    ‘बिग बॉस ओटीटी’चा प्रीमिअर वूट सिलेक्ट अॅपवर आज म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. आजपासून दररोज हा शो 7 वाजता वूट अॅपवर दाखवला जाईल. परंतु, दर रविवारी तो 7 च्या ऐवजी 8 वाजता प्रसारित केला जाईल. पण, हा शो पाहण्यासाठी तुम्हाला वूट अॅपची सदस्यता घ्यावी लागेल. तुम्हाला फक्त वूट सिलेक्टवरच्य बिग बॉस ओटीटी पाहण्याचा पर्याय देण्यात आला आहे. सदस्यता खरेदी केल्यानंतर, तुम्ही हा शो मोबाईल, लॅपटॉप आणि तुमच्या स्मार्ट टीव्हीवर पाहू शकता.

Published On - Aug 08,2021 6:59 PM

Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.