Bigg Boss 3 OTT : ‘हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं’, यानेच पराभूत होऊनही सीजन केले आपल्या नावावर
Bigg Boss 3 OTT winner : ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये रणवीर याची प्रबळ दावेदारी होती. कारण तो जे ही काही बोलत होता, करत होतो ते सर्व काही उघडपणे केले होते. त्याला काही चुकीचे वाटले तर त्याने ते चुकीचे असल्याचे स्पष्ट म्हटले. ते बरोबर असेल तर बरोबर सांगत होता
Bigg Boss 3 OTT winner : अभिनेता शाहरुख खानचा बाजीगर चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग आहे. ‘हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं’. ‘बिग बॉस ओटीटी 3’ चे फिनाले नुकताच पार पडले. त्यातील ग्रँड फिनाले एपिसोडमधील स्पर्धकांनी हा संवाद बरोबर सिद्ध केला आहे. या शोमध्ये टॉप पाचमध्ये कृतिका मलिक, रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल आणि नेजी पोहोचले होते. त्यात सना मकबूल विजेती ठरली. परंतु इतर स्पर्धकांची कामगिरी लक्षणीय राहिली. एक स्पर्धकाच्या कामगिरीवर शो चे होस्ट अनिल कपूर चांगलाच प्रभावित झाले. तो या सीझनचा सर्वात मजबूत स्पर्धक होता. अनिल कपूरने त्याचे कौतूक केले. त्याने म्हटले, ‘हा सीझन रणवीर शौरी म्हणून ओळखला जाईल.’ रणवीर ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला, पण लोकांची मने त्याने जिंकली. त्यामुळेच शोचा होस्ट अनिल कपूर याने त्याचे भरभरुन कौतूक केले. त्याची कामगिरी एखाद्या विजयापेक्षा कमी नाही, असे अनिल कपूर याने म्हटले.
अनिल कपूरकडून रणवीरवर कौतुकाचा वर्षाव
‘बिग बॉस ओटीटी 3 ’ चा ग्रँड फिनाले 2 ऑगस्टला झाला. यामध्ये सना मकबूल विजेती ठरली. टॉप 3 मध्ये पोहोचल्यानंतर रणवीर शौरी याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तो जेव्हा स्टेजवर आला तेव्हा अनिल कपूर याने त्याचे कौतुक केले. अनिक कपूरने म्हटले की, हा सीझन रणवीर शौरी म्हणून ओळखला जाईल. मागील सीझनमध्ये सलमान खान याने असे पूजा भट्टसाठी म्हटले होते. पूजा देखील शो जिंकू शकली नाही, परंतु ती एक मजबूत स्पर्धक राहिली होती.
त्याला फक्त 25 लाख रुपये हवे होते
शोच्या एका एपिसोडमध्ये रणवीर म्हणाला होता की, त्याला ट्रॉफी नको आहे, त्याला फक्त 25 लाख रुपये हवे आहेत. बिग बॉसच्या घरात रणवीर याचा हेतू सुरुवातीपासूनच स्पष्ट होता. त्याला 25 लाख रुपये जिंकून त्याच्या मुलाचे भविष्य सुधारायचे आहे. विजेतेपदामुळे मिळणाऱ्या पैशातून तो त्याच्या मुलाला कॉलेजमध्ये पाठवणार होता. त्याच्या मुलगा हारून 13 वर्षांचा आहे.
View this post on Instagram
रणवीर स्पष्टच बोलत होतो
‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये रणवीर याची प्रबळ दावेदारी होती. कारण तो जे ही काही बोलत होता, करत होतो ते सर्व काही उघडपणे केले होते. त्याला काही चुकीचे वाटले तर त्याने ते चुकीचे असल्याचे स्पष्ट म्हटले. ते बरोबर असेल तर बरोबर सांगत होता. शोच्या विजेत्या सना मकबूलचे नाव शोच्या आधी ट्रेंड करत होते, पण रणवीरही चर्चेत होता. 25 लाख रुपये जिंकण्यासाठी तो ज्या उद्देशाने शोमध्ये आला होता, तो पूर्ण होईल, अशी आशा लोकांना होती. परंतु त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली. बिग बॉसमध्ये प्रथम कृतिकाला बाहेर काढण्यात आले, त्यानंतर सई आणि रणवीरला बाहेर काढण्यात आले. शेवटी नेजी आणि सना यांच्यात स्पर्धा झाली. प्रेक्षकांकडून अधिक मते मिळाल्यामुळे सना या हंगामाची विजेती ठरली. नेजी उपविजेती राहिली.