43 सेकंदाच्या Video ने खळबळ, लाइव्ह राहिलं सुरू अन् ती नको ते…

मनिषाचा 43 सेकंदाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लाइव्ह केल्यानंतर ती कॅमेरा बंद करायला विसरली. तिला वाटलं लाइव्ह संपलं आहे. मात्र, त्यानंतर जे घडलं त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ उडालाय. सोशल मीडियावर हा अवघ्या सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि चर्चांना उधाण आलं आहे. नेटकरी या व्हिडीओवर व्यक्त होताना दिसत आहेत.

43 सेकंदाच्या Video ने खळबळ, लाइव्ह राहिलं सुरू अन् ती नको ते...
Manisha RaniImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 9:18 PM

मुंबई | 12 डिसेंबर 2023 : बिग बॉस ओटीटी 2 मुळे मनिषा रानी घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर तर तिची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. मनिषा सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी फोटो, व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी कधी लाइव्ह येऊन चाहत्यांचं मनोरंजन करत असते. तर कधी कधी महत्त्वाच्या गोष्टीही शेअर करत असते. सोशळ मीडियावर तिचा एक लाइव्ह व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियात एकच खळबळ उडाली आहे.

मनिषा रानी हिचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती फ्लाइंग किस देताना दिसत आहे. त्यानंतर ती बातचीत करताना दिसत आहे. लाइव्ह व्हिडीओवर तिने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. तसेच शो बाबत पॉझिटिव्ह बोलतानाच एंटरटेनिंग वातावरण तयार केलं.

चाहत्यांच्या संपर्कात

मनिषाने आपल्या खास अंदाजात बिग बॉस ओटीटीमध्ये प्रेक्षकांना खूप एंटरटेन केलं होतं. या शोमधून बाहेर पडल्यावर ती एका म्युझिक अल्बममध्येही दिसली. मात्र, आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहण्यासाठी ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचं स्वत:चं युट्यूब चॅनलही आहे. तिचं चॅनल अत्यंत वेगाने वाढताना दिसत आहे. असं असलं तरी तिच्या लाइव्हचं एक फुटेज व्हायरल झालं आहे.

43 सेकंदात काय घडलं?

मनिषाचा 43 सेकंदाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लाइव्ह केल्यानंतर ती कॅमेरा बंद करायला विसरली. तिला वाटलं लाइव्ह संपलं आहे. त्यामुळे तिने फ्लाइंग किस दिला. त्यानंतर ती म्हणाली, लाइव्हमध्ये मी काय म्हणाले माहीत नाही. आता लाइव्ह संपवलंच आहे, तर ते शेअरही करायला हवं का? नाही ना? व्हिडीओ तर माझे फॅन्स शेअर करतील. मागच्यावेळी जस्टिनने हेच केलं होतं ना? हाच व्हिडीओ यूट्यूबवर टाकला होता. त्यातून त्याला भरपूर पैसे मिळाले होते. म्हणजे लाइव्हद्वारे पैसे, असं मनिषा म्हणाली. तिचं हे बोलणं तिचे चाहते ऐकत होते. लाइव्हमध्ये मनिषाने स्वत:चीच पोलखोल केली. अवघ्या 47 सेकंदाच्या व्हिडीओत मनिषाच्या मनातलं ओठावर आलं आणि चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे तिच्याच चाहत्यांनी तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल केला आहे.

चाहत्यांमध्ये जुंपली

या व्हिडीओत मनिषा बोलत असताना एका मुलाचा आवाज येतो. जस्टिनने मला फोन केला होता, असं तो म्हणतो. त्यावर मनिषा काय असा प्रश्न करते. व्हिडीओ हाईड करायला अभिषेक येत आहे. त्याला रिक्वेस्ट पाठव, असं ही व्यक्ती सांगते. त्यावर मनिषा म्हणते, अरे आपण नाही पाठवलं. हा संवाद ऐकल्यानंतर आता मनिषा आणि अभिषेक यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्हीकडून प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. पैशासाठी अभिषेकचा वापर करत आहे, असं एकाने म्हटलंय. तर मनिषा आणि एल्विश पेड पीआर करत आहेत असं काही लोक म्हणतील, असं एकाने लिहिलंय. एका फॅन्सने तर, यूट्यूब कंटेटमधून सर्वच कमावतात त्यात काय एवढं, असं म्हटलं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.