कंगना रनौतचा लॉकअप शो ठरतोय सुपरहिट, “आतापर्यंतचा सर्वाधिक लाईव्ह पाहिला जाणारा कार्यक्रम”, एकता कपूरचा दावा
एकता कपूरने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात लॉकअप शो हा कार्यक्रमाला 2.3 मिलियन लोक लाईव्ह पाहत असल्याचं दिसतंय. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड असल्याचं एकता म्हणाली आहे.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा लॉकअप शो (lockupp show) सध्या सुपरहिट ठरतोय. या कार्यक्रमातील गोष्टींबाबत सर्वत्र बोललं जातं. ओटीटीवरच्या या रिअॅलिटी शोला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. यातली कंगनाची अँकरिंगची स्टाईल, अतरंगी स्पर्धकांचा अतरंगी अंदाज अनेकांना आवडतोय. या रिअॅलिटी शोने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले असल्याचं लॉकअप शोची निर्माती एकता कपूरने म्हटलंय. एकता कपूरने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात हा कार्यक्रमाला 2.3 मिलियन लोक लाईव्ह पाहत असल्याचं दिसतंय. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड असल्याचं एकता म्हणाली आहे.
एकताची इन्स्टाग्राम पोस्ट
लॉकअप शोची निर्माती एकता कपूरने म्हटलंय. एकता कपूरने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात हा कार्यक्रमाला 2.3 मिलियन लोक लाईव्ह पाहत असल्याचं दिसतंय. हे सगळं बघून तिला झालेला आनंद तिने सोशल मीडियावर व्यक्त केलाय. तिच्या या पोस्टवर अर्जुन बिजलानीने कमेंट केली आहे.” ही दोन महिलांच्या कामाची जादू आहे”, असं अर्जुन बिजलानी म्हणाला आहे. तर अनेक चाहत्यांनी कंगना आणि एकताचं अभिनंदन केलं आहे.
View this post on Instagram
कंगना पहिल्यांदाच करतेय अँकरिंग
कंगना पहिल्यांदाच एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसतेय. तिची स्टाईलही वेगळी आहे. ती जर काही सूचना द्यायची असेल तर ती चुटकी आणि टाळ्यांच्या वापर करते. तिच्या या कामाचं अनेकजण कौतुक करत आहेत. कंगना तिच्या लॉकअपमध्ये ‘क्वीन’सारखी वावरते.
कंगनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच सध्याही तिच्या काही चित्रपटांचं चित्रिकरण सुरू आहे. चुकतंच तिचा ‘थलायवी’ आला होता. ‘धाकड’ आणि ‘तेजस’या सिनेमांमधून ती लवकरच मोठ्या पडद्यावर तिच्या चाहत्यांना पुहायला मिळणार आहे. या चित्रपटांचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. याशिवाय कंगना तिच्या वादग्रस्त विधानांसाठीही प्रसिद्ध आहे.
कंगना रनौत आणनि एकता कपूर या दोघींनी ‘शूट आऊट वडाळा’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतरचा ‘जजमेंटल है क्या’ हा सिनेमा तिकीटबारीवर चालला नाही पण त्यामुळे कंगना-एकताची मैत्री घट्ट झाली. ‘थलायवी’ बघितल्यावर एकतानं कौतुक केलं होतं.
संबंधित बातम्या