Movies And Shows Releasing Today : ‘बंटी और बबली 2’पासून ते ‘धमाका’पर्यंत, एकाच दिवशी प्रदर्शित होणार अनेक चित्रपट!
आज म्हणजेच 19 नोव्हेंबरला अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. थिएटरपासून ते ओटीटीपर्यंत एकापेक्षा एक चित्रपट आणि शो आज प्रदर्शित होत आहेत. मनोरंजक गोष्ट अशी आहे की, हे सर्व भिन्न शैलींचे चित्रपट आणि शो आहेत. त्यामुळे या वीकेंडला तुमचे मनोरंजन करण्यासाठी अनेक चित्रपट आणि शो भेटीला येत आहेत.
मुंबई : आज म्हणजेच 19 नोव्हेंबरला अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. थिएटरपासून ते ओटीटीपर्यंत एकापेक्षा एक चित्रपट आणि शो आज प्रदर्शित होत आहेत. मनोरंजक गोष्ट अशी आहे की, हे सर्व भिन्न शैलींचे चित्रपट आणि शो आहेत. त्यामुळे या वीकेंडला तुमचे मनोरंजन करण्यासाठी अनेक चित्रपट आणि शो भेटीला येत आहेत.
या यादीमध्ये सैफ अली खान आणि राणी मुखर्जीचा चित्रपट ‘बंटी और बबली 2’ समाविष्ट आहे, जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चला तर, पाहूया कोणते चित्रपट आणि सीरीज प्रदर्शित होतायत…
बंटी और बबली 2 (थिएटर)
सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चुरवेदी आणि शर्वरी वाघ स्टारर चित्रपट ‘बंटी और बबली 2’ आज रिलीज होत आहे. सैफ आणि राणीची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. याआधीही या दोघांच्या जोडीने अनेक रोमँटिक चित्रपट दिले आहेत.
ये मर्द बेचारा (थिएटर)
अनुप थापा दिग्दर्शित या चित्रपटात विराज राव, मनुकृती पाहवा आणि सीमा भार्गव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात पुरुषांबद्दलची स्टिरियोटाइप दाखवण्यात आली आहे आणि त्याच वेळी पुरुषांबद्दल समजावून सांगण्यासाठी एका छान कथानकाचा आधार घेण्यात आला आहे.
धमाका (नेटफ्लिक्स)
कार्तिक आर्यनचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘धमाका’ हा आजचा बिग बजेट OTT रिलीज झालेला चित्रपट आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 19 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता प्रसारित होईल. हा चित्रपट इंग्रजी सबटायटल्ससह हिंदी ऑडिओमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यनची सर्वात वेगळी स्टाईल पाहायला मिळणार आहे. बरेच दिवस चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते.
कॅश (डिस्ने प्लस हॉट स्टार)
कॉमेडी चित्रपट ‘कॅश’ देखील आज प्रदर्शित होत आहे. अमोल पराशर, स्मृती कालरा आणि गुलशन ग्रोव्हर अभिनीत हा विनोदी चित्रपट डिस्ने प्लस हॉट स्टारवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषभ सेठ करत असून, दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
द व्हील ऑफ टाईम (प्राईम व्हिडीओ)
‘धमाका’ सारखा मोठा चित्रपट आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. त्याच वेळी, Amazon Prime चा मोठा चित्रपट ‘The Wheel of Time’ देखील आज रिलीज होत आहे. हा चित्रपट रॉबर्ट जॉर्डन यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात गॉन गर्ल फेम रोसामुंड पाईक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
युवर ओनर (सोनी लिव्ह)
सोनी लिव्हची वेब सीरीज ‘युवर ऑनर’चा दुसरा सीझन देखील आज प्रदर्शित होईल. या शोचे पहिले 5 एपिसोड्स आणि बाकीचे 26 नोव्हेंबरला रिलीज होतील. या शोमध्ये जिमी शेरगिल, माही गिल, गुलशन ग्रोवर, पुलकित माकोल, जीशान यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
हेही वाचा :
Hina Khan | हिना खानने बाथटबमध्ये केलं फोटोशूट, बोल्ड फोटोंनी घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ!