Dil Melt Karda : ‘हसीन दिलरूबा’चे पहिले गाणे प्रदर्शित, ‘दिल मेल्ट करदा’मध्ये दिसला तापसी-विक्रांतचा रोमँटिक अंदाज!

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचे (Taapsee Pannu) चाहते तिच्या आगामी 'हसीन दिलरुबा' (Haseen Dillruba) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. गाण्याचे बोल आहेत- 'दिल मेल्ट करदा' (Dil Melt Karda).

Dil Melt Karda : ‘हसीन दिलरूबा’चे पहिले गाणे प्रदर्शित, ‘दिल मेल्ट करदा’मध्ये दिसला तापसी-विक्रांतचा रोमँटिक अंदाज!
हसीन दिलरुबा
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 4:12 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचे (Taapsee Pannu) चाहते तिच्या आगामी ‘हसीन दिलरुबा’ (Haseen Dillruba) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. गाण्याचे बोल आहेत- ‘दिल मेल्ट करदा’ (Dil Melt Karda). पंजाबी बीटसह मनमोहक गाण्याचे बोल त्याला आणखी सुमधुर बनवत आहेत. या गाण्यामध्ये आपल्याला तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) यांच्यातील खास रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळते (Dil Melt Karda Taapsee Pannu upcoming film Haseen dillruba first song released).

या चित्रपटामध्ये तापसी पन्नू आणि विक्रांत मस्सेखेरीज अभिनेता हर्षवर्धन राणेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात विक्रांत तापसीच्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे, तर हर्षवर्धन तापसीच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहे. विनिल मॅथ्यू दिग्दर्शित हा चित्रपट 2 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

पाहा चित्रपटाचे पहिले गाणे

‘दिल मेल्ट करदा’ हे गाणे वरुण ग्रोव्हर यांनी लिहिले आहे, तर हे संगीत अमित त्रिवेदी यांनी दिले आहे. त्याचबरोबर निकिता गांधी आणि नवराज हंस यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्यामध्ये आपण तापसी आणि विक्रांतच्या निरागस प्रेमकथेची झलक पाहू शकता. गाण्यात असे दर्शवले गेले आहे की, जेव्हा एखाद्या जोडप्याचे अरेंज मॅरेज अर्थात ठरवून लग्न होते, तेव्हा ते जोडपे एकमेकांना कसे गुपचूप पाहतात. हे गाणे लोकांना खूपच आवडले आहे. तापसी आणि विक्रांत यांची गाण्यातील केमिस्ट्री पाहून प्रेक्षक खूप कमेंट करत आहेत. निर्मात्यांनी हसीन दिलरुबा ‘द अल्टिमेट कॉन्स्पिरसी’ असं वर्णन केले आहे, तर तापसी पन्नूनं या जुन्या गूढ गोष्टींचे शब्द जोडले आहेत: ‘एक था राजा, एक थी रानी, ​​हूई शुरु एक खूनी प्रेम कहानी’

वादाचा ससेमिरा

‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपटही नुकताच वादात अडकला होता. खरं तर पटकथा लेखक कनिका ढिल्लोन यांनी लेखक नवजोत गुलाटीवर या चित्रपटाविषयी सेक्सिस्ट आणि मिसोगिनिस्ट कमेंट्सचा आरोप केला होता. कनिकाने तिच्या ट्विटर हँडलवरून नवजोतवर जोरदार निशाणा साधला होता.

तापसीकडे चित्रपटांची रांग

तापसी पन्नूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, या चित्रपटाशिवाय तापसीकडे ‘रश्मी रॉकेट’, ‘लूट लपेटा’, ‘शाबाश मिठू’ आणि ‘दोबारा’सारखे उत्कृष्ट चित्रपट आहेत. ‘शाबाश मिठू’ हा भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजचा बायोपिक आहे. या चित्रपटात तापसी मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी तापसी आणि मितालीचे चाहते खूप उत्साही आहेत.

(Dil Melt Karda Taapsee Pannu upcoming film Haseen dillruba first song released)

हेही वाचा :

20 years of Lagaan | पहिल्या पत्नीचं ‘ते’ पत्र वाचून ढसाढसा रडला आमीर खान, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Haseen Dillruba Review : ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित, सुंदर कथानक आणि हटके स्टारकास्टसह परफेक्ट मर्डर मिस्ट्री तुमच्या भेटीला…

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.