Drishyam 2 Trailer : व्यंकटेश दग्गुबातीच्या ‘दृश्यम 2’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित!

ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video ने नुकताच त्यांच्या तेलुगु क्राईम थ्रिलर 'दृश्यम 2' चा (Drishyam 2 ) ट्रेलर लाँच केला, ज्यामध्ये अभिनेता व्यंकटेश दग्गुबती (Venkatesh Daggubati) पुन्हा एकदा जबरदस्त अभिनय करताना दिसला आहे.

Drishyam 2 Trailer : व्यंकटेश दग्गुबातीच्या ‘दृश्यम 2’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित!
Drishyam 2
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 10:36 AM

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video ने नुकताच त्यांच्या तेलुगु क्राईम थ्रिलर ‘दृश्यम 2’ चा (Drishyam 2 ) ट्रेलर लाँच केला, ज्यामध्ये अभिनेता व्यंकटेश दग्गुबती (Venkatesh Daggubati) पुन्हा एकदा जबरदस्त अभिनय करताना दिसला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मीना, कृतिका, एस्थर अनिल, संपत राज आणि पूर्णा या कलाकारांचा समावेश आहे. जीतू जोसेफ दिग्दर्शित आणि सुरेश प्रॉडक्शन, मॅक्स मूव्हीज आणि राजकुमार थिएटर्सचे डी. सुरेश बाबू, अँटोनी पेरुम्बावूर आणि राजकुमार सेतुपती निर्मित, ‘दृश्यम 2’ येत्या 25 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Videoवर प्रदर्शित होईल.

‘दृश्यम 2’  या चित्रपटाची कथा जिथे पहिल्या चित्रपटाची कथा संपली, तिथपासूनच सुरू होते. रामबाबूच्या (व्यंकटेश दग्गुबाती) कुटुंबाला भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे धमक्या मिळत आहेत. या चित्रपटात एक कुटुंब प्रमुख पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. सहा वर्षांपूर्वी, एका भयंकर रात्रीच्या घटनेने या कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलले आहे.

पाहा ट्रेलर :

व्यंकटेश, जीतू जोसेफ आणि सुरेश बाबू यांच्यासह कलाकार आणि निर्मात्यांची एक दिग्गज टीम या चित्रपटाशी जोडली गेली आहे. त्यांचे एकत्र येणे जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमधील प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे.

पुढे काय घडणार? याची उत्सुकता शिगेला…

याबद्दल बोलताना अभिनेता व्यंकटेश म्हणतात, ‘आम्ही आमच्या सर्व चाहत्यांचे, प्रेक्षकांचे तसेच जगभरातील समीक्षकांचे आभारी आहोत की, त्यांनी आमच्यावर इतके प्रेम आणि कौतुक केले. आम्हाला मिळालेला प्रतिसाद आणि दृश्यमने मिळवलेले यश अभूतपूर्व होते. याने आम्हा सर्वांना ‘दृश्यम 2’ सोबत तो वारसा पुढे चालवण्याची प्रेरणा दिली.’ व्यंकटेश दग्गुबती पुढे सांगतात, ‘सीक्वलच्या सहाय्याने, आपल्या कुटुंबाच्या रक्षणाची शपथ घेणार्‍या रामबाबूच्या आयुष्यात काय घडेल याबद्दल आमचे चाहते आमच्याशी शेअर करत असलेल्या सर्व अनुमानांना आम्ही शेवटी पूर्णविराम देऊ इच्छितो. ‘दृश्यम 2’ प्रेक्षकांना कथानकातील ट्विस्ट आणि टर्नसह भावनिक आणि रोमांचकारी प्रवासात घेऊन जाईल, जो कथेतील सस्पेन्स जिवंत ठेवेल आणि आमच्या प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक नक्की भागवेल.’

प्रेक्षकांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा!

‘दृश्यम 2’ चे लेखक आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ म्हणतात, ‘दृश्यम 2 माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, अनेकांनी मला विचारले की, आपण सिक्वेल घेऊन येणार आहात का, आणि मला नेहमीच माहित होते की मी नक्कीच ही याची पुढची कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येईन. पण मला विश्वास आहे की, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. लाखो वेळा कथेला पुढे नेण्याचा माझा विचार बदलल्यानंतर आणि शेवटी माझ्या सर्व कलाकार आणि क्रूच्या पाठिंब्याने हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम केल्यानंतर, मी आता हा चित्रपट माझ्या प्रेक्षकांसमोर सादर करण्यास तयार आहे. आम्ही प्रेक्षकांचे प्रतिसाद ऐकण्यास उत्सुक आहोत.’

हेही वाचा :

राजकुमार राव आणि पत्रलेखा अडकले विवाहबंधनात, अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Prithviraj Teaser Out | उलगडणार इतिहासातील सुवर्ण पान, बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.