Top 5 Web Series |  ‘मनी हाईस्ट’ ते ‘स्क्विड गेम’, ओटीटीवरील वेब सीरीज करतील दिवसभर मनोरंजन!

डिजिटल प्लॅटफॉर्मने गेल्या काही वर्षांत देशात फार वेगाने आपले पाय पसरले आहेत. कोरोनाच्या काळात त्याला आणखी बळ मिळाले आहेत. मात्र, कोरोना कमी झाल्यानंतरही लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याला कंटाळा करत आहेत. आता लोकांची पहिली पसंती म्हणजे घरी बसून OTT वर मनोरंजनाचा आनंद घेणे.

Top 5 Web Series |  ‘मनी हाईस्ट’ ते ‘स्क्विड गेम’, ओटीटीवरील वेब सीरीज करतील दिवसभर मनोरंजन!
Web Series
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 8:37 AM

मुंबई : डिजिटल प्लॅटफॉर्मने गेल्या काही वर्षांत देशात फार वेगाने आपले पाय पसरले आहेत. कोरोनाच्या काळात त्याला आणखी बळ मिळाले आहेत. मात्र, कोरोना कमी झाल्यानंतरही लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याला कंटाळा करत आहेत. आता लोकांची पहिली पसंती म्हणजे घरी बसून OTT वर मनोरंजनाचा आनंद घेणे. ओटीटीवर दररोज काहीतरी नवीन प्रसारित केले जात आहे, जेणेकरून प्रेक्षकांना मनोरंजनाची कमतरता भासू नये.

जर, तुम्हालाही घरी बसून कंटाळा येत असेल, तर तुमच्या कंटाळ्यावर आमच्याकडे उपाय आहे. आम्ही तुम्हाला एक छोटासा मार्ग दाखवणार आहोत आणि यासाठी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल उचलण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा पाच वेब सीरीज बद्दल सांगणार आहोत, ज्या तुमचा कंटाळा दूर करण्यासाठी अतिशय योग्य आहेत आणि तुम्ही त्या तुमच्या मोबाईलवर पाहू शकता.

मनी हाईस्ट

नेटफ्लिक्सची सुपरहिट स्पॅनिश क्राइम थ्रिलर वेब सीरीज मनी हाईस्ट लोकांच्या आवडत्या वेब सीरीजच्या यादीत अव्वल आहे. ही सीरीज रिलीज झाल्यानंतर अनेक दिवस ट्रेंडिंगमध्ये राहिली होती.

स्क्विड गेम्स

ही नेटफ्लिक्सची वेब सीरीज दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरियाचा सर्वात घातक स्पोर्ट्स थ्रिलर स्क्विड गेम्स, जो सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित केला जात आहे. सध्या ओटीटीवर देखील याचे वर्चस्व आहे. स्क्विड गेम्स 90 देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. यात हे दाखवले आहे की, जगातील सर्व श्रीमंत सुखी नाहीत किंवा सर्व गरीब सुखी नाहीत. श्रीमंत लोक स्वतःच्या आनंदासाठी लोकांना मारत आहेत. त्यांना फक्त पैसे हवे होते, मग ते कुणाला मारायचे किंवा स्वत:ला मारायचे. दरम्यान, मानवी लोभाने यात महत्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे लोक एकमेकांना मारू लागले.

Mindhunter

Mindhunter एक अमेरिकन मानसशास्त्रीय गुन्हेगारीवर आधारित वेब सीरीज आहे, जी पेनहॉलने तयार केली आहे. ही सीरीज खऱ्या घटनेवर लिखित पुस्तकावर आधारित आहे Mindhunter ही जगातील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज आहे. तुम्ही ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

मुंबई डायरी

Amazon प्राईम व्हिडीओवर प्रसारित होणारी मुंबई डायरी ही सीरीज  देखील या दिवसांमध्ये खूप गाजत आहे. जर, तुम्ही अजून ही सीरीज पाहिले नसेल तर नक्की पाहा.

कोटा फॅक्टरी 2

कोटा फॅक्टरीचा दुसरा सीझन देखील लोकांना आवडत आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या शोमध्ये जीतू भैय्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. यामध्ये कोचिंग हबमधील विद्यार्थ्यांवरील दबावाची आणि संघर्षाची कहाणी सुंदरपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, दुसरा सीझन बघण्यापूर्वी याचा पहिला सीझन बघणे अतिशय महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :

Sukh Mhnje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत होणार सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदेंची एण्ट्री

Aryan Khan Drugs Case | आर्यनच्या सुटकेपर्यंत शाहरुखच्या घरात गोडाधोडावर बंदी, गौरी खानचा आचाऱ्यांना सक्त आदेश!

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.