फरहान अख्तरच्या ‘तूफान’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार, नव्या पोस्टरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता!

‘तूफान’च्या चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ द्वारा 'तूफान'चा (Toofan) तूफानी ट्रेलर आता 30 जूनला प्रदर्शित होणार असून येते दोन दिवस चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी उत्साहाचे असणार आहेत.

फरहान अख्तरच्या ‘तूफान’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार, नव्या पोस्टरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता!
तूफान
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 4:07 PM

मुंबई : ‘तूफान’च्या चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ द्वारा ‘तूफान’चा (Toofan) तूफानी ट्रेलर आता 30 जूनला प्रदर्शित होणार असून येते दोन दिवस चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी उत्साहाचे असणार आहेत. या बहुचर्चित, प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) मुख्य भूमिका साकारणार आहे (Farhan Akhtar upcoming Movie Toofan trailer launch on 30 June).

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना लिहिले की, “raise your hands if you are as excited as we are for the Toofaan trailer ..’ चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे करण्यात आली आहे. तूफानचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे, सोबतच मृणाल ठाकुर व परेश रावल यांच्या देखील भूमिका आहेत.

पाहा पोस्ट :

240हून अधिक देशांत स्ट्रीम होणार!

भारत आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रांतांमधील चाहत्यांना हा अत्यंत रंजक चित्रपट 16 जुलैपासून अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. ‘तूफान’मध्ये फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे मृणाल ठाकुर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जूची कहाणी

‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी ‘तूफान’ या चित्रपटामधून एक दमदार पंच पुन्हा एकदा घेऊन आली आहे. ही एक प्रेरणादायी कथा आहे, मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या ‘अज्जू’ या अनाथ मुलाची. ‘अनन्या’ या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द मिळते. या जिद्दीतूनच ‘अजीज अली’ अर्थात ‘अज्जू’चा बॉक्सिंग चॅम्पियन म्हणून तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे.

कथा आहे जिद्दीची आणि तगून राहण्याच्या इच्छेची…

‘तूफान’मध्ये बॉक्सिंग एक खेळ म्हणून जीवंत होतोच. शिवाय, आपल्या स्वप्नांचा वेध घेताना आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य माणसाचा जीवनप्रवासही यात रेखाटला आहे. ही कथा आहे जिद्दीची, तगून राहण्याच्या इच्छेची, चिकाटीची आणि यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा यांची ही कथा आहे.

(Farhan Akhtar upcoming Movie Toofan trailer launch on 30 June)

हेही वाचा :

Goodbye College | आता वडिलांचं स्वप्न साकार करणार, इरफान खानचा लेक बाबिलने शिक्षणाला म्हटले ‘अलविदा’

Photo : निक्की तांबोळीचा सोशल मीडियावर जलवा, ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.