Tandav | वेब सीरीज ‘तांडव’च्या अडचणीत आणखीन वाढ, आता लखनऊमध्ये गुन्हा दाखल!

सैफ अली खानची (Saif Ali Khan) वेब सीरीज तांडव (Tandav) सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Tandav | वेब सीरीज 'तांडव'च्या अडचणीत आणखीन वाढ, आता लखनऊमध्ये गुन्हा दाखल!
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 1:41 PM

मुंबई : सैफ अली खानची (Saif Ali Khan) वेब सीरीज तांडव (Tandav) सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता या वेब सीरीजवर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी भाजप नेते राम कदम यांनी मुंबईत या वेब सीरीजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती आणि आता लखनऊमधील हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. (Filed a case against the web series Tandav in Lucknow)

लखनऊमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा प्रकरणी या वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु कृष्णा मेहरा, लेखक गौरव सोलंकी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याशिवाय माहिती व प्रसारण मंत्रालयही तांडव या वेब सीरिजच्या विरोधात आहे. मंत्रालयाने या वेब सीरीजसंदर्भात स्पष्टीकरण मागण्यासाठी अ‍ॅमेझॉन प्राइमला नोटीस दिली आहे.

तांडव वेब सीरीज ही एक पॉलिटिकल ड्रामा आहे. ही वेब सीरिज काहींच्या चांगलीच पसंतीला उतरत आहे. तर काहींच्या मते या वेब सीरीजद्वारे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मोहम्म जिशान आयुब याच्यावर चित्रित एका दृश्यावरुन हा वाद रंगला आहे. या दृश्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान झाला असल्याचा आरोप करत निर्मात्यांनी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे.

त्याचबरोबर या वेब सीरीज विरोधात हॅशटॅग मोहीमही राबवली जात आहे. ही वेब सीरिज अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केली असून, यात सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहेत.

संबंधित बातम्या :

Dhamaka | कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘धमाका’ ओटीटीवर प्रदर्शित होणार?

Tandav : राम कदम यांचं पोलीस ठाण्यात ‘तांडव’; वेब सीरिजच्या निर्मात्यांना समन्स पाठवणार

(Filed a case against the web series Tandav in Lucknow)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.