Films on OTT | ओटीटी प्लॅटफार्मवर मनोरंजनाची मेजवानी, आठवड्यात प्रदर्शित ‘या’ वेब सीरीज आणि फिल्म्स!

जूनचा चौथा आठवडा सुरू होणार आहे. यासह आता बर्‍याच मोठ्या वेब सीरीजदेखील प्रदर्शित होण्यास तयार आहेत. नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला ‘शेरनी’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्यानंतर, आता या आठवड्यात आणखी काही वेब सीरीज आणि फिल्म्स प्रदर्शित होणार आहेत.

Films on OTT | ओटीटी प्लॅटफार्मवर मनोरंजनाची मेजवानी, आठवड्यात प्रदर्शित ‘या’ वेब सीरीज आणि फिल्म्स!
ओटीटी फिल्म्स
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 9:52 AM

मुंबई : जूनचा चौथा आठवडा सुरू होणार आहे. यासह आता बर्‍याच मोठ्या वेब सीरीजदेखील प्रदर्शित होण्यास तयार आहेत. नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला ‘शेरनी’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्यानंतर, आता या आठवड्यात आणखी काही वेब सीरीज आणि फिल्म्स प्रदर्शित होणार आहेत (Films releasing on OTT platform in this week must watch).

‘टू हॉट टू हँडल’ सीझन 2 ( Too Hot To Handle Season 2 )

‘टू हॉट टू हँडल सीझन 2’ ही सीरीज या आठवड्यात नेटफ्लिक्सवर 23 जून रोजी रिलीज होणार आहे. या सीरीजचा पहिला सीझन प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. त्यानंतर आता त्याच्या दुसर्‍या सीझनची जोरदार एंट्री होणार आहे.

जून गुड ऑन पेपर (June Good On Paper)

‘जून गुड ऑन पेपर’ हा आगामी अमेरिकन रोमँटिक विनोदी चित्रपट आहे. किम्मी गेटवुड यांनी दिग्दर्शित केला आहे. 23 जूनला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ही एक छोटीशी प्रेम कथा आहे, ज्यात एक स्टॅन्ड-अप कॉमेडीयन प्रेमात पडते.

ग्रहण (Grahan)

‘ग्रहण’ ही वेब सीरीज या आठवड्यात डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ही एक अ‍ॅक्शन क्राईम थ्रिलर सीरीज आहे. ही सीरीज बोकारोमधील शीखविरोधी दंगलींवर आधारित आहे.

रजनीगंधा (Rajanigandha)

रजनीगंधा हा एक धमाकेदार चित्रपट आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात राजेश शर्मा, विभा आनंद, तरनजित कौर, अशोक पाठक मुख्य भूमिकेत दिसणार आहोत. हा चित्रपट 21 जून रोजी एमएक्स प्लेअरवर रिलीज होईल.

माडथी (Maadathy: An Unfairy Tale)

‘माडथी’ नीस्ट्रीम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 24 जून रोजी रिलीज होणार आहे. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल, शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल, कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि लॅटिन अमेरिकन फिक्की 60 यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

(Films releasing on OTT platform in this week must watch)

हेही वाचा :

Samantar 2 trailer out | एकाचे कर्म दुसऱ्याचे भविष्य, नियती होणार का नियंत्रित? पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त ट्रेलर

‘द फॅमिली मॅन’चा नवा विक्रम, जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज, ‘फ्रेंड्स’लाही टाकले मागे!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.