‘FRIENDS’ फेम अभिनेता जेम्स मायकल टायलरचे निधन, ‘गुंथर’च्या भूमिकेने जिंकली होती प्रेक्षकांची मने!
अमेरिकन शो 'फ्रेंड्स'मध्ये (FRIENDS) सेंट्रल पर्कमधील कॉफी शॉपमध्ये वेटर गुंथरची भूमिका साकारणारा अभिनेता जेम्स मायकेल टायलर (James Michael Tyler ) यांचे निधन झाले आहे. जेम्स 59 वर्षांचे होते आणि तो कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते.
मुंबई : अमेरिकन शो ‘फ्रेंड्स’मध्ये (FRIENDS) सेंट्रल पर्कमधील कॉफी शॉपमध्ये वेटर गुंथरची भूमिका साकारणारा अभिनेता जेम्स मायकेल टायलर (James Michael Tyler ) यांचे निधन झाले आहे. जेम्स 59 वर्षांचे होते आणि तो कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या कर्करोग चौथ्या टप्प्यावर होता. जेम्सचे मित्र आणि त्यांचे मॅनेजर टोनी बेन्सन यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. टोनीच्या म्हणण्यानुसार, रविवारी सकाळी जेम्सचे निधन झाले.
हॉलिवूड रिपोर्टरला जेम्स मायकल टायलरच्या मृत्यूबद्दल ई-मेलद्वारे माहिती देताना टोनी म्हणाले की, ‘जर तुम्ही त्याला एकदा भेटला असतात, तर तुम्ही त्याला आयुष्यभरासाठी मित्र बनवले असते.’ जेम्स मायकेल टायलरने हॉलिवूडजवळील फ्रँकलिन अव्हेन्यूवरील बुर्जुआ पिग कॉफी शॉपमध्ये वेटर म्हणून काम केले होते. त्यांच्या कॉफी बनवण्याच्या शैलीमुळेच त्यांना ‘फ्रेंड्स’मध्ये महत्वाची भूमिका मिळाली होती.
जेनिफर अॅनिस्टनने जागवल्या जेम्सच्या आठवणी
या सीरीजसाठी प्रथम त्यांना एक संवाद देण्यात आला होता आणि नंतर त्यांच्या पात्राला नाव मिळाले – ‘बरिस्ता गुंथर’. जेम्स मायकेल टायलर यांनी शोच्या 236 भागांपैकी 150 भागांमध्ये अभिनय केला. जेम्स मायकेल टायलर यांच्या निधनाने त्यांच्या मित्रपरिवारासह कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. ‘फ्रेंड्स’शोच्या अनेक कलाकारांनी टायलरची आठवण करून, त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
जेम्सची को-स्टार जेनिफर अॅनिस्टन हिने श्रद्धांजली वाहताना तिने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘फ्रेंड्स तुमच्याशिवाय पहिल्यासारखा असणार नाही. शो आणि आम्हा सर्वांना हसवल्याबद्दल धन्यवाद. तुमची खूप आठवण येईल जेम्स मायकल टायलर….’
View this post on Instagram
जेम्स गुंथरच्या पात्राला शोमध्ये जेनिफर खूप आवडायची. त्याने जेनिफरसमोर आपले प्रेम व्यक्त करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्यांच्या आणि त्यांच्या प्रयत्नांच्या या अपयशाने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. लोकांना देखील गुंथरचे पात्र खूप आवडले होते.
अनेक कलाकारांनीही व्यक्त केले दु:ख
शोमध्ये जॉयची भूमिका करणाऱ्या मेट लेब्लाँकने जेम्सच्या मृत्यूवर लिहिले, ‘आम्ही खूप हसलो, मित्रा. तुझी नेहमी आठवण राहील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.’ त्याच वेळी, जेम्सची आठवण करत अभिनेत्री लिझाने लिहिले की, ‘धन्यवाद मित्र टायलर आम्हा सर्वांसोबत नेहमी एकत्र राहिल्याबद्दल…’
हेही वाचा :
Aryan Khan Drug Case : आधी शाहरुख, आता गौरी खान लेक आर्यनला भेटायला आर्थर रोड जेलमध्ये!