इथे रियुनियन, तिथे ब्रेकअप, FRIENDS फेम 51 वर्षीय मॅथ्यू पेरीचे तिशीतील गर्लफ्रेण्डसोबत ब्रेकअप

मॅथ्यूनेच 29 वर्षीय गर्लफ्रेण्ड मॉली हर्विट्झ हिला प्रपोज केलं होतं. मात्र एंगेजमेंटला जेमतेम सात महिने होत असतानाच दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आहे. (FRIENDS Matthew Perry break up )

इथे रियुनियन, तिथे ब्रेकअप, FRIENDS फेम 51 वर्षीय मॅथ्यू पेरीचे तिशीतील गर्लफ्रेण्डसोबत ब्रेकअप
अभिनेता मॅथ्यू पेरी आणि एक्स गर्लफ्रेण्ड मॉली हर्विट्झ
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 11:05 AM

न्यूयॉर्क : एकीकडे ‘फ्रेंड्स रियुनियन’मुळे (Friends Reunion) अमेरिकन सिटकॉममधील जुनी पात्रं पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. अशातच शँडलरच्या (Chandler Bing) भूमिकेतून चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेला 51 वर्षीय अभिनेता मॅथ्यू पेरी (Matthew Perry) याने ब्रेकअप केलं आहे. एंगेजमेंटनंतर अवघ्या सात महिन्यांतच मॅथ्यूने गर्लफ्रेण्ड मॉली हर्विट्झपासून (Molly Hurwitz) फारकत घेतली. दोघांच्या वयात वीसहून अधिक वर्षांचं अंतर आहे. (FRIENDS fame Chandler Actor Matthew Perry break up with Girlfriend Molly Hurwitz)

सात महिन्यांपूर्वीच साखरपुडा

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच मॅथ्यू पेरीने ही खुशखबर दिली होती. “मी पृथ्वीतलावरील सर्वात महान तरुणीला डेट करत आहे” अशा शब्दात मॅथ्यूने आपला आनंद व्यक्त केला होता. मॅथ्यूनेच 29 वर्षीय गर्लफ्रेण्ड मॉली हर्विट्झ हिला प्रपोज केलं होतं. मात्र एंगेजमेंटला जेमतेम सात महिने होत असतानाच दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आहे.

“काही गोष्टी वर्क आऊट होत नाहीत”

‘द पीपल’ला दिलेल्या मुलाखतीत मॅथ्यूने याविषयी भाष्य केलं. “काही वेळा गोष्टी वर्क आऊट होत नाहीत. आमच्या नात्याचंही तसंच काहीसं झालं. मॉलीला माझ्याकडून शुभेच्छा” असं मॅथ्यू म्हणाला. मात्र दोघांनीही ब्रेकअपचं नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाही.

मॉली हर्विट्झ ही साहित्य क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून काम करते. 2018 पासून मॅथ्यू आणि मॉली एकत्र दिसायचे. गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेपासून आपण अभिनेते मॅथ्यू पॅरीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचा दुजोरा मॉलीने दिला होता. तर नोव्हेंबर 2020 मध्ये दोघांनी ऑफिशिअल एंगेजमेंट केली होती.

‘फ्रेण्ड्स’ मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर

मॅथ्यू पेरी जवळपास चाळीस वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. बॉईज विल बी बॉईज, सिडनी, हायवे टू हेवन, होम फ्री अशा अनेक सीरिजमध्ये तो झळकला. मात्र 1994 मध्ये ‘फ्रेण्ड्स’ मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. फक्त अमेरिकन नाही, तर जगभरातील प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला. पंचवीस वर्षांनंतरही ही सीरिज आणि त्यातील व्यक्तिरेखा चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. ‘फ्रेंड्स रियुनियन’मुळे या आठवणींना उजाळा मिळाला असून अनेक प्रेक्षकांचे डोळेही पाणावले.

मॅथ्यू पेरीचे डेटिंग

मॅथ्यू पेरीने 1995 मध्ये अभिनेत्री यास्मिन ब्लिथला डेट केलं होतं. अवघ्या वर्षभरातच त्याने प्रख्यात अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सला डेट करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचं अफेअर जेमतेम दोन वर्षच टिकलं. त्यानंतर 2006 ते 2012 ही सहा वर्ष तो अभिनेत्री एलिझाबेथ उर्फ लिझी कॅप्लनसोबत रिलेशनशीपमध्ये होता.

संबंधित बातम्या :

FRIENDS फेम Chandler रिलेशनशीपमध्ये, 51 वर्षीय मॅथ्यू पेरीची तिशीच्या गर्लफ्रेण्डसोबत एंगेजमेंट

Friends: The Reunion | भारतात ‘फ्रेंड्स : द रियुनियन’चा नवा विक्रम, अवघ्या 9 तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज

(FRIENDS Matthew Perry break up )

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.