OTT Release | ‘अतरंगी रे’ ते ‘डोरेमॉन’, आठवडाभरात ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार चित्रपट आणि नवे शो!
लवकरच वीकेंड येणार आहे आणि हा वीकेंड खूप खास आहे, कारण या काळात ख्रिसमसही येत आहे. या आठवड्याच्या शेवटी सर्व लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि शो प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे तुम्हाला या वीकेंडला चित्रपट आणि शो बघायचे असतील तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत.
मुंबई : लवकरच वीकेंड येणार आहे आणि हा वीकेंड खूप खास आहे, कारण या काळात ख्रिसमसही येत आहे. या आठवड्याच्या शेवटी सर्व लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि शो प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे तुम्हाला या वीकेंडला चित्रपट आणि शो बघायचे असतील तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत.
या यादीत अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा चित्रपट ‘अतरंगी रे’ ते ‘डोरेमॉन’च्या चित्रपटाचा समावेश आहे. चला तर, मग आम्ही तुम्हाला या संपूर्ण यादीबद्दल सांगतो आणि तुम्हाला काय पहायचे आहे ते, तुम्हीच ठरवा…
एमिली इन पॅरिस सीझन 2 (22 डिसेंबर)
एमी नामांकित सीरीज तिच्या दुसऱ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लिली कॉलिन्स ही या सीरीजमध्ये तिची एमिली कूपरची भूमिका साकारत आहे. तिचा शेजारी आणि तिचा पहिला फ्रेंच बॉयफ्रेंड यांच्यासोबत लव्ह ट्रायंगलनंतर, एमिली आता तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. ही सीरीज Netflix वर प्रसारित होईल.
अतरंगी रे (24 डिसेंबर)
अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा म्युझिकल रोमँटिक चित्रपट ‘अतरंगी रे’ डिस्ने प्लस हॉट स्टारवर प्रदर्शित होणार आहे. रिंकू (सारा अली खान) बळजबरीने विष्णूशी (धनुष) लग्न करत असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण रिंकू सज्जादच्या (अक्षय कुमार) प्रेमात आहे. दरम्यान, विष्णू रिंकूच्या प्रेमात पडतो आणि रिंकूही त्या दोघांना पसंत करू लागते.
डोंट लूक अप (24 डिसेंबर)
जेनिफर लॉरेन्स आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांच्या प्रमुख भूमिका असलेला दिग्दर्शक अॅडम मॅकेचा चित्रपट ‘डोंट लुक अप’ हा हवामान बदलावर आधारित आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
मिन्नल मुर्ली (24 डिसेंबर)
मिन्नल मुर्ली भारताचा नवीन सुपरहिरो असून, तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात, जेसन (टोविनो थॉमस) सुपरहिरोची शक्ती मिळवतो, जेव्हा तो एके दिवशी विजेच्या कडकडाटात अडकतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
सत्यमेव जयते 2 (डिसेंबर 24)
सत्यमेव जयते हा 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्यमेव जयते’चा सिक्वेल आहे. हा चित्रपट याआधीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि आता Amazon Prime वर दिसणार आहे.
स्टँड बाय मी डोरेमॉन 2 (24 डिसेंबर)
डोरेमॉनची 50 वर्षे साजरी करण्याच्या निमित्ताने मेकर्स 2014मध्ये आलेल्या या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे, तो 24 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
द सायलेंट सी (24 डिसेंबर)
‘द सायलेंट सी’ या कोरियन मिस्ट्री थ्रिलर चित्रपटात अंतराळवीर अंतराळ मोहिमेवर जाणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात चंद्राची काही गडद रहस्ये दाखवली जातील.
हेही वाचा :
Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?
Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!