‘अनदर लाईफ 2’ ते ‘महा समुद्रम’, ‘हे’ चित्रपट आणि सीरीज ओटीटी-थिएटरमध्ये होणार रिलीज!

जरी कोरोना महामारीनंतर परिस्थिती सुधारत आहे. यासह चित्रपटगृहे देखील उघडण्यात आली आहेत. परंतु, निर्माते अजूनही चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे टाळत असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करत आहेत.

'अनदर लाईफ 2' ते 'महा समुद्रम', ‘हे’ चित्रपट आणि सीरीज ओटीटी-थिएटरमध्ये होणार रिलीज!
Movies
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 10:39 AM

मुंबई : जरी कोरोना महामारीनंतर परिस्थिती सुधारत आहे. यासह चित्रपटगृहे देखील उघडण्यात आली आहेत. परंतु, निर्माते अजूनही चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे टाळत असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करत आहेत.

चला तर जाणून घेऊया कोणते चित्रपट प्रदर्शित होत आहेत, जे या वीकेंडला एन्जॉय करता येतील. आज ‘अदर लाईफ सीझन 2’, ‘जिन्ने जिम्मे सारे निक्केमे’, ‘महा समुद्रम’ यासह अनेक चित्रपट OTT वर रिलीज होत आहेत. या चित्रपट आणि वेब सीरीज बद्दल जाणून घेऊया…

अनदर लाईफ – सीझन 2

आज, सायन्स फिक्शन ड्रामा ‘अदर लाईफ’ सीझन 2 नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. त्याचा पहिला सीझन 25 जुलै 2019ला रिलीज झाला होता. तुम्हाला माहिती आहेच की, करोनामुळे सर्व शोच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत चाहते या वेब सीरीजची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. ही साय-फाय फिक्शन एका अंतराळवीराची कथा सांगते, ज्यात तो आपला ग्रह कसा वाचवतो, हे दाखवण्यात आले आहे.

जिन्ने जिम्मे सारे निक्कमे

‘जिने जिम्मे सारे निकमे’ आज OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज होत आहे. हा पहिला पंजाबी चित्रपट आहे जो देशातील सर्वात मोठ्या व्यासपीठावर प्रीमियर करत आहे. ही मालिका गुरनाम सिंह आणि सतवंत सिंग कौर यांची कथा आहे, ज्यांना चार मुलगे आहेत. कोणत्याही वाढत्या पालकांप्रमाणे, त्यांना देखील त्यांच्या मुलांकडून वेळ आणि प्रेम हवे आहे. त्यांना त्यांच्या मुलांचे प्रेम मिळते की, नाही हे शेवटी पाहणे मनोरंजक असेल. ही मालिका विनोदी आणि भावनिक दाखवली आहे.

इन द डार्क सीझन -3

आज ‘इन द डार्क’ चा तिसरा सीझन नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. ही एक गुन्हेगारी मालिका आहे. या मालिकेत अंध स्त्री मर्फीची कथा दाखवण्यात आली आहे. मालिकेची संपूर्ण कथा मर्फीभोवती विणलेली आहे. या मालिकेत 13 भाग आहेत. ज्या लोकांना गुन्हेगारी आणि थ्रिलर चित्रपट आवडतात. त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

महा समुद्रम

‘महा समुद्रम’ हा दाक्षिणात्य चित्रपट आहे, ज्यात अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात साऊथचे अभिनेते शर्वानंद, सिद्धार्थ, अदिती हैदरी, अनु इमॅन्युएलसारखे कलाकार दिसतील. या चित्रपटात भरपूर अॅक्शन आणि रोमान्स आहे. अजय भूपती या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. एके एंटरटेनमेंट निर्माता आहे आणि चैतन भारद्वाज संगीत दिग्दर्शक आहेत. राव रमेश आणि जगपति बाबू यांनी महासमुद्रम मध्ये इतर महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा :

‘नट्टू काकां’प्रमाणेच शेवटची इच्छा म्हणून चेहऱ्यावर मेकअपचा साज घेऊन अंतिम प्रवासाला गेले ‘हे’ लाडके कलाकार!

Anjini Dhawan : वरूण धवनची भाची आहे सुपर हॉट, बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा ठरतील फेल!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.