‘स्पेशल ऑप्स’ ते ‘दिल्ली क्राईम’, ओटीटीवरील सस्पेन्स थ्रिलर वेब सीरीज करतील तुमचं मनोरंजन!

ओटीटी प्लॅटफॉर्म हे आजच्या काळात मनोरंजनाचे मुख्य माध्यम बनले आहे. कोरोना विषाणूसारख्या साथीनंतर ओटीटीने स्वतःसाठी एक विशेष जागा तयार केली आहे. बराच काळ चित्रपटगृह बंद असल्याचा पूर्ण लाभ ओटीटीला मिळाला.

‘स्पेशल ऑप्स’ ते ‘दिल्ली क्राईम’, ओटीटीवरील सस्पेन्स थ्रिलर वेब सीरीज करतील तुमचं मनोरंजन!
Web Series
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 8:31 AM

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म हे आजच्या काळात मनोरंजनाचे मुख्य माध्यम बनले आहे. कोरोना विषाणूसारख्या साथीनंतर ओटीटीने स्वतःसाठी एक विशेष जागा तयार केली आहे. बराच काळ चित्रपटगृह बंद असल्याचा पूर्ण लाभ ओटीटीला मिळाला. सलमान खानपासून अक्षय कुमारपर्यंत अनेक बडे स्टार्स आहेत, ज्यांनी चित्रपटगृह बंद झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचे चित्रपट प्रदर्शित केले आहेत. चित्रपटगृहे असली उघडली गेली असली तरी,  बहुतेक लोक अजूनही OTT वर चित्रपट आणि मालिका पाहण्यात अधिक रस दाखवत आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्मची पकड जगभरात मजबूत होत आहे. नेटफ्लिक्सपासून ते अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी 5, एमएक्स प्लेअर, ऑल्ट बालाजी पर्यंत अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर, तुम्ही आरामात वेगवेगळ्या शैलीतील कथांचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला थ्रिलर आणि सस्पेन्स पाहण्याची आवड असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा पाच वेब सीरीज आणि ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमचे भरपूर मनोरंजन करतील.

स्पेशल ऑप्स

हॉटस्टारची पहिली स्पाय थ्रिलर वेब सीरीज स्पेशल ऑप्स प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. त्याचा पहिला सीझन प्रेक्षकांना खूप आवडला आहे. मालिकेची कथा रॉ अधिकारी हिम्मत सिंह आणि त्याच्या 19 वर्षांच्या शोधावर आधारित आहे, ज्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. अभिनेते केके मेनन हे हिंमत सिंह हे प्रमुख पात्र साकारत आहेत, जे अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या मास्टरमाईंडच्या शोधात टास्क फोर्सचे नेतृत्व करतात.

रे

चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही. दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी, अभिषेक चौबे, वासन बाला यांनी चार लघुकथा, स्पॉटलाइट, बहुरूपी, बिपीन चौधरी स्मृतीभ्रम आणि बरीन भौमिकचा आजार पडद्यावर आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या सर्व चित्रपटांमध्ये एकमेकांना जोडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे स्वतःची ओळख शोधणे. ‘रे’ हे मुखवटाच्या मागे असलेल्या पुरुष पात्रांमध्ये विणलेले एक काव्य आहे. परिपूर्णतेसाठी धडपडत असताना, येथे अहंकार, मत्सर, विश्वासघाताशी लढणारे नायक आहेत.

दिल्ली क्राईम

ही कथा भारतातील क्रूर सामूहिक बलात्कार-निर्भया प्रकरणाच्या वास्तविक जीवनातील तपासावर आधारित आहे. या मालिकेत शेफाली शाहने मुख्य भूमिका साकारली आहे आणि तिचे पात्र खूप पसंत केले गेले आहे. ही गोष्ट दिल्ली पोलिसांच्या तपासाभोवती फिरते, ज्यांनी गुन्हेगारांना कैद केले.

मुंबई डायरी 26/11

‘मुंबई डायरीज 26/11’ हा एक मेडिकल थ्रिलर कथा आहे, जी रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात घडते. ही मालिका मुंबईत घडलेल्या 26/11च्या हृदयद्रावक घटनेवर आधारित आहे. या मालिकेत, जीव वाचवण्यासाठी आणि इतरांना बरे करण्याच्या या लढाईत, आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त तुटलेले दाखवले आहे. ही मालिका पाहिल्यावर तुमच्या डोळ्यातही अश्रू येतील.

हाऊस ऑफ सिक्रेट्स: द बुरारी डेथ्स

या डॉक्युमेंट्रीमध्ये दिल्लीतील एका कुटुंबातील 11 सदस्यांच्या मृत्यूसंबंधातील धक्कादायक सत्ये आणि सिद्धांतांची माहिती आहे.

हेही वाचा :

Raja Rani Chi Ga Jodi : संजीवनी रणजीत ढाले पाटलांचा SWAG, पाहा अभिनेत्री शिवानी सोनारचे खास फोटो

Aai Kuthe Kay Karte | अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा, बदलणार देशमुखांच्या घराची सूत्र!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.