How to build a sex room: ‘सेक्स रुम’ डिझाझन, एकदम हटके विषय, Netflix ची नवीन वेब सीरिज चर्चेत

सीरिजच्या नावातंच सगळं काही स्पष्ट केलेलं आहे. प्रसिद्ध लग्झरी इंटेरिअर डिझायनर मेलनी रोझ (Melanie Rose) यांच्या संकल्पनेवर ही सीरिज आधारित आहे. मेलनी या तरुण जोडप्यांना त्यांच्या लैंगिक इच्छांनुसार त्यांचे बेडरुम डिझाइन करून देतात.

How to build a sex room: 'सेक्स रुम' डिझाझन, एकदम हटके विषय, Netflix ची नवीन वेब सीरिज चर्चेत
Netflix ची नवीन वेब सीरिज चर्चेतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 5:13 PM

नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला विविध विषयांवरील नवनवीन वेब सीरिज, चित्रपट आणले जातात. यापैकी काही सीरिज त्यांच्या हटके विषयामुळे चर्चेत येतात. अशीच एक सीरिज सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे ‘हाऊ टू बिल्ड अ सेक्स रुम’ (How to build a sex room). सीरिजच्या नावातंच सगळं काही स्पष्ट केलेलं आहे. प्रसिद्ध लग्झरी इंटेरिअर डिझायनर मेलनी रोझ (Melanie Rose) यांच्या संकल्पनेवर ही सीरिज आधारित आहे. मेलनी या तरुण जोडप्यांना त्यांच्या लैंगिक इच्छांनुसार त्यांचे बेडरुम डिझाइन करून देतात. बेडरुम ही जोडप्यांसाठी अत्यंत खास जागा असते आणि तिथले इंटिमेट क्षण अविस्मरणीय राहावेत किंवा कामुक भावना जागृत व्हावी या दृष्टीने त्या बेडरुमची रचना करतात. एकूण आठ एपिसोड्सची ही सीरिज आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये मेलनी या विविध जोडप्यांना त्यांच्या घरी भेटतात आणि त्यांची मुलाखत घेतात.

प्रत्येक जोडप्याची कामुक भावना आणि इच्छा ही वेगवेगळी असते. त्याबद्दल त्यांच्याशी बोलून, त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेऊन त्या छोट्या-मोठ्या गोष्टींद्वारे बेडरुम डिझाइन करतात. यात मग अगदी सेक्स टॉय कलेक्शनपासून ते सुंदर उशी, फुलांच्या पाकळ्या, मऊ ब्लँकेट्स आणि लग्झरी डिझाइनपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असतो.

या सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये मेलनी या राज आणि रायन या जोडप्याला भेटतात. लैंगिक गोष्टींच्या बाबतीत या विवाहित जोडप्याच्या आवडीनिवडी या एकमेकांविरुद्ध असतात. राज ही पेशाने गायिका असून तिला सेन्शुअल गोष्टी आवडत असल्याचं तिने सांगितलं. तर तिचा पती रायन हा तर्कशुद्ध आणि टेक्निकल गोष्टींमध्ये विश्वास ठेवतो. व्हेकेशनदरम्यान जेव्हा लग्झरी सूट्समध्ये राहायला जातो तेव्हा इंटिमेट होण्याची इच्छा अधिक जागृत होत असल्याचं या जोडप्याने मेलनीला सांगितलं. त्यांच्या आवडीनिवडीनुसार मेलनी त्यांच्यासाठी ‘एल’ आकाराच्या खोलीचं लेआऊट डिझाइन करते. इंटिमेट गोष्टींच्या बाबतीत राज आणि रायन या दोघांची आवड जरी वेगळी असली तरी त्यातून सुवर्णमध्य काढत आणि दोघांची आवड लक्षात ठेवत त्या खास बेडरुम डिझाइन करतात. कपल्सच्या लहानातल्या लहान गोष्टीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी मेलनी घेत असतात.

हे सुद्धा वाचा

मेलनी यांनी डिझाइन केलेली बेडरुम

कोण आहेत मेलनी रोझ?

मेलानी या गेल्या 15 वर्षांपासून जोडप्यांसाठी त्यांच्या आवडीनिवडीनुसार सेक्शुअल रुम्सचं डिझाइन करत आहे. अशा गोष्टींबद्दल आणि जागेबद्दल बोलणं म्हणजे गलिच्छ किंवा घृणास्पद नसून प्रत्यक्षात रोमँटिक, सुंदर आणि विलासी असू शकतात हे या शोमधून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नेटफ्लिक्सवरील आठ एपिसोड्सच्या या सीरिजला नेटकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.