Aashram | बॉबी देओल आणि प्रकाश झा यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने पाठवली नोटीस!
प्रकाश झा यांची वेब सिरीज 'आश्रम'च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी करणी सेनेने वेब या सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
मुंबई : प्रकाश झा यांची वेब सिरीज ‘आश्रम’च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी करणी सेनेने वेब या सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आश्रमविरूद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर आता जोधपूर कोर्टाने बॉबी देओल आणि प्रकाश झा यांनाही नोटीस पाठविली आहे. या दोघांना 11 जानेवारी रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या वेब सीरीजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला असून तिसर्या सीझनची तयारीही सुरू झाली आहे. (Increased difficulty for Bobby Deol and Prakash Jha)
View this post on Instagram
वकील खुश खंडेलवाल यांच्या याचिकेवर कोर्टाने हा आदेश दिला आहे. पण बॉबी देओल आणि प्रकाश झा यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यास कोर्टाने नकार दिला आहे. आता बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना 11 जानेवारीला कोर्टात जायला हजर राहवे लागणार आहे. करणी सेनेचे म्हणणे आहे की, या वेब सीरीजमध्ये हिंदू धर्माचा अपमान होत आहे. आता प्रकाश झा हे करणी सेनेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहण्यासारखे आहे.
दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भागही प्रेक्षकांना आवडला होता. यानंतर आता प्रेक्षक आश्रम या बेव सीरीजच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच प्रकाश झा यांनी आश्रम बेव सीरीजच्या यशाचे सेलिब्रेशन संपूर्ण टिमसोबत केले होते. प्रकाश झा यांनी सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचा फोटोही शेअर केले होते. ज्यात संपूर्ण टिम केक कापताना दिसत होते. फोटो शेअर करताना त्यांनी लिहले आहे की, ‘आश्रम’ ला एवढे प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद 900 मिलियन व्यूज मिळाले आहेत आणि अजुनही व्यूज मिळत आहेत. आश्रमच्या दुसरा भाग बाबा निराला काशीपूरच्या गुन्ह्यांभोवती फिरली आहे.
आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. वादाचे कारण ‘आश्रम चॅप्टर-2’ या वेब सीरीजमध्ये आश्रमाची काळीबाजू दाखवली गेली आहे. अभिनेता बॉबी देओल याने या वेब सीरीजमध्ये ‘काशीपूरचा बाबा निराला’ हे पात्र साकारले आहे. ‘आश्रम’ची कथा ड्रग्ज, बलात्कार, नरसंहार आणि राजकारणाभोवती फिरत आहे. मालिकेत सनातन धर्माच्या बाबांना ढोंगी, भोगी, गुन्हेगार दाखवून सनातन धर्माची बदनामी केली जात आहे. केवळ धार्मिक भावना भडकवण्यासाठी या वेब सीरीजला ‘आश्रम’ असे नाव देण्यात आले आहे, असा आरोप हिमांशू यांनी केला होता.
संबंधित बातम्या :
(Increased difficulty for Bobby Deol and Prakash Jha)