नवी दिल्ली : बॉलिवूड(Bollywood)चे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचं गेल्या वर्षी 29 एप्रिलला निधन झालं. ते आता या जगात नसले तरी त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयानं लोकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतलं त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. आता इरफान खान यांचा ‘मर्डर अॅट द तीसरी मंझिल 302’ (Murder At The Teesri Manzil 302) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाची झलक पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
शूटिंगदरम्यान मोठ्या दुर्घटनेतून बचावले होते
इरफान खान यांचा चित्रपट ‘मर्डर अॅट द तीसरी मंझिल 302’चं दिग्दर्शन नवनीत बाज सैनी यांनी केलंय. इरफान खान यांचा हा चित्रपट 31 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रसारित होणार आहे. इरफान खान (Irrfan Khan) यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात लकी अली, दीपल शॉ आणि रणवीर शौरीसारखे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इरफान खान यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटातल्या एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान इरफान एका मोठ्या दुर्घटनेतून बचावले होते.
…आणि सुखरूप बाहेर आणलं
ही गोष्ट 2007 सालची आहे, जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं. दिग्दर्शक नवनीत थायलंडमधल्या पटाया इथं शूटिंग करत होते. त्याला समुद्राच्या मधोमध गाण्यांचा एक सीक्वन्स शूट करायचा होता. इरफान खान, लकी अली आणि दीपल शॉ नुकतेच बोटीवर बसून समुद्रकिनारी पोहोचले होते. तेव्हा वातावरणही खराब झालं आणि बोटीचं इंजिनही बंद झालं. दरम्यान, काही वेळ हे लोक परत न आल्यानं समुद्रकिनारी असलेले काही साथीदार घाबरून आले. यानंतर स्थानिक बचाव पथकानं त्यांना बाहेर काढलं आणि सुखरूप किनाऱ्यावर आणलं.
#IrrfanKhan‘s long delayed film #MurderAtTeesriManzil302 finally gets a release!!
Directed by #NavneegBajSaini, the film also stars @luckyali @DeepalShaw and @RanvirShorey.
Premieres Dec 31st on @ZEE5India.@irrfank #Irrfan pic.twitter.com/6RaON6tmK8
— CinemaRare (@CinemaRareIN) December 27, 2021
अंग्रेजी मीडियम अखेरचा चित्रपट
इरफान खान यांचा शेवटचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांनी दीपक डोबरियाल, किकू शारदा आणि रश्मिका मंदाना यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं होतं. या चित्रपटात करीना कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय इरफान खान ‘लाइफ ऑफ पाय’, ‘द लंचबॉक्स’, ‘तलवार’, ‘पान सिंग तोमर’, ‘पिकू’, ‘मकबूल’ आणि ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात.