Ani Kay hava : ‘आणि काय हवं 3’मध्ये जुई आणि साकेतचे नाते होणार अधिकच दृढ, वर्किंग कपल्सला प्रिया बापटचा सल्ला

'आणि काय हवं'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. हल्लीच्या कपल्सचं प्रतिनिधित्व करणारे जुई आणि साकेत बघताबघता घराघरात पोहोचले. (Jui and Saket's relationship will be stronger in 'Aani Kay Hava 3', Priya Bapat's advice to working couples)

Ani Kay hava : 'आणि काय हवं 3'मध्ये जुई आणि साकेतचे नाते होणार अधिकच दृढ, वर्किंग कपल्सला प्रिया बापटचा सल्ला
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 9:32 AM

मुंबई : हल्लीचे करिअर ओरिएंटेड कपल्स घरीसुद्धा ऑफिस घेऊन येतात. दिवसभर ऑफिसमध्ये केलेली कामं, तिथले ताणतणाव, चिडचिड, बॉस, सहकाऱ्यांसोबतचे संवाद अशा अनेक गोष्टी ऑफिस सुटल्यावर घरी सुद्धा येतात. अनेकदा घरी आल्यावरही आपल्या पार्टनरसोबत त्याच्याच चर्चा रंगतात. नवरा बायकोच्या हेल्दी रिलेशनशीपसाठी (Healthy Relationship) हे कधी नुकसान करणारंही ठरू शकतं. याच गोष्टी कधी कधी भांडणासाठी कारणीभूत ठरतात. अशा वेळी या चर्चा टाळून एकमेकांना वेळ देत आपण आपलं नातं अधिकच दृढ करू शकतो, हे ‘आणि काय हवं‘च्या (Ani kay hava 3) तिसऱ्या सिझन मध्ये दाखवण्यात आलं आहे.

‘आणि काय हवं’च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. हल्लीच्या कपल्सचं प्रतिनिधित्व करणारे जुई आणि साकेत बघताबघता घराघरात पोहोचले. अनेकांना त्यांच्यात आपले प्रतिबिंब दिसते. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे आता ‘आणि काय हवं’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

वर्किंग कपल्सला प्रियाचा सल्ला

ऑफिसच्या कामानंतर एकत्र वेळ घालवण्याबाबत जुई म्हणजेच प्रिया बापट म्हणते, ‘वर्किंग कपल्सनी ऑफिसच्या कामानंतर एकमेकांसाठी काही वेळ काढलाच पाहिजे, जेणे करून त्यांचे नाते बहरेल, काही वेळ एकत्र सोबत घालवल्याने एकमेकांमधील बॉण्डिंग अधिक घट्ट होते. काही गोष्टींची, विचारांची देवाणघेवाण केल्याने, नव्याने काही छंद एकत्र जोपासल्याने आपण एकमेकांना उत्तमरित्या ओळखू शकतो. नात्यातील जीवंतपणा कायम राहतो आणि या सगळ्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे एकमेकांमधील विश्वास आणि प्रेम वाढते. नाते कधी कंटाळवाणे होत नाही. माझ्या वैयक्तिक नात्याबद्दल सांगायचे तर या गोष्टीची आम्हीही पुरेपूर काळजी घेतो.” तर साकेत म्हणजेच उमेश कामत म्हणतो, ” दिवसभर कामात व्यस्त असल्यानंतर थोडा वेळ तरी प्रत्येक कपलने एकमेकांसाठी काढलाच पाहिजे. साहजिकच दिवसभर घडलेल्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर कराव्यात. पण ऑफिस कधी घरी आणू नये. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवली तर तुमचे नाते कधीच रटाळ बनणार नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनमध्ये करण्यात आला आहे.’

संबंधित बातम्या

Money Heist : मनी हाईस्टमध्ये प्रोफेसरचं प्रेम ‘रकैल’, मात्र वास्तविक जीवनात घेतेय अविवाहित जीवनाचा आनंद

Sonakshi Sinha : ‘दबंग गर्ल’ची किलर अदा, पाहा सोनाक्षी सिन्हाचे हटके फोटो

Hina Khan : रेड ड्रेसमध्ये हीना खानचं नवं फोटोशूट, सोशल मीडियावर जलवा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.