Tiku Weds Sheru | कंगना रनौतसाठी आनंदाचा दिवस! ‘पद्मश्री’सोबत होमप्रोडक्शनच्या ‘टिकू वेड्स शेरू’च्या फर्स्टलूकची भेट!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने काही आठवड्यांपूर्वी याची माहिती देताना सांगितले होते की, ती नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करणार आहे.

Tiku Weds Sheru | कंगना रनौतसाठी आनंदाचा दिवस! ‘पद्मश्री’सोबत होमप्रोडक्शनच्या ‘टिकू वेड्स शेरू’च्या फर्स्टलूकची भेट!
Tiku Weds Sheru
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 1:04 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने काही आठवड्यांपूर्वी याची माहिती देताना सांगितले होते की, ती नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करणार आहे आणि आज (8 नोव्हेंबर) तिने या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. यासोबतच आजपासून चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू झाल्याचे सांगितले आहे.

सोशल मीडिया स्टार आणि टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) ‘टिकू वेड्स शेरू’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत (Nawazuddin Siddiqui) महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये अवनीत कौरचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

पोस्टरकडे चाहत्यांच्या नजरा!

कंगनाने एकापाठोपाठ एक असे या चित्रपटाचे तीन पोस्टर रिलीज केले आहेत, त्यापैकी एका पोस्टरमध्ये नवाज आणि अवनीत एकत्र दिसत आहेत, तर दोन पोस्टरपैकी एक नवाज आणि एक अवनीतचा सिंगल आहे.

नवाजचे एक आकर्षक पोस्टर रिलीज करताना कंगनाने लिहिले, “जेव्हा आपण भेटतो तेव्हा मनातून भेटतो, नाहीतर स्वप्नातही भेटणे मुश्कील. शिराज खान अफगानी उर्फ ​​शेरूला भेटा.”

पाहा पोस्टर :

अभिनेत्री अवनीतचे पोस्टर रिलीज करताना कंगनाने लिहिले की, “चलो तो चाँद तक,  नाही तो शाम तक. भेटा तस्लीम खान उर्फ ​​टिकूला.” या पोस्टरमध्ये अवनीत लाल रंगाचा शिमरी ड्रेस परिधान करून खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

पाहा पोस्टर :

तिसरे पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिले की, “निर्माती म्हणून या प्रवासाची सुरुवात खूप खास आहे आणि त्याच दिवशी पद्मश्री सन्मान मिळणे देखील. मणिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत माझ्या पहिल्या प्रोडक्शन व्हेंचर ‘टिकू वेड्स शेरू’ची पहिली झलक. तुम्हा सर्वांसाठी… माझ्या हृदयाचा एक तुकडा येथे आहे, आशा आहे की तुम्हाला ते आवडेल. शूटिंग सुरू होतेय…….”

पाहा पोस्टर :

‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाचे सर्व पोस्टर्स अतिशय प्रेक्षणीय आहेत. दिग्दर्शक साई कबीर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे, तर कंगना रनौत याची निर्मिती करत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Padma Shri Awards 2020 : बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना रनौतसह गायक अदनान सामीचा ‘पद्मश्री’ देऊन सन्मान! पाहा फोटो

‘नट्टू काका’ गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये परतणार? ‘तारक मेहता..’मध्ये घनश्याम नायक यांच्या जागी नव्या अभिनेत्याची चर्चा!

‘रावरंभा’च्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी, ओम भूतकर पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात एकत्र!

शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.