Lock Up : कंगना राणावतच्या लॉक अप शोची धमाकेदार सुरूवात…! ही आहे स्पर्धकांची संपूर्ण यादी
कंगना रणावतने (Kangana Ranaut) एकता कपूरच्या (Ekta Kapoor) लॉक अप शोमधून (Lock Up) ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. कंगना आणि एकताने आधीच सांगितले होते की हा शो खूप खतरनाक होणार आहे आणि प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याअगोदर कधीही जे प्रेक्षकांनी आजपर्यंत पाहिले नाही.
मुंबई : कंगना रणावतने (Kangana Ranaut) एकता कपूरच्या (Ekta Kapoor) लॉक अप शोमधून (Lock Up) ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. कंगना आणि एकताने आधीच सांगितले होते की हा शो खूप खतरनाक होणार आहे आणि प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याअगोदर कधीही जे प्रेक्षकांनी आजपर्यंत पाहिले नाही. शोच्या पहिल्याच भागात कंगनाची काही स्पर्धकांसोबत शाब्दिक चकमक झाल्याचे पाहिला मिळाले. याआधीही शोच्या काही स्पर्धकांची नावे समोर आली होती, मात्र आता काल रात्री सर्व स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. चला तर जाणून घेऊयात शोच्या स्पर्धकांची संपूर्ण यादी.
- सुनील पाल- या शोमध्ये कॉमेडियन सुनील पाल देखील सहभागी झाला आहे. त्याची जोडी मुनव्वर फारुकीसोबत आहे. सुनीलने यापूर्वीही अनेक शोमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे आणि त्याने काही चित्रपटांमध्ये कामही केले आहे.
- मुनव्वर फारुकी- स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी या शोचा स्पर्धक आहे. मुनव्वर त्यांच्या परफॉर्मन्सदरम्यान अशी विधाने करतात की ते अडचणीत येतात. शोमध्ये येताच त्यांनी कंगना राणावतलाही भरपूर उत्तरे दिली.
- सायशा शिंदे- डिझायनर सायशा शिंदे गेल्या वर्षी चर्चेत होती. ती स्वपनिलवरून सायशा बनली आहे. तिच्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले. या शोमध्ये तिची जोडी चक्रवाणी महाराजांसोबत आहे.
- पूनम पांडे- या शोमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन पूनम पांडेही दिसली आहे. पूनमने 2020 मध्ये तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्न केले. पण लग्नानंतर काही दिवसांनीच सॅमवर धमकावण्याचा आणि शोषणाचा आरोप केला, त्यानंतर सॅमला अटक करण्यात आली. यानंतर, पूनमला गेल्या वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती.
- सारा खान- बिग बॉस 4 मध्ये खूप चर्चेत असलेली टीव्ही अभिनेत्री सारा खान देखील या शोमध्ये सहभागी झाली आहे. बिग बॉसमध्ये साराने अली मर्चंटसोबत लग्न केले होते, पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता.
- निशा रावल- निशा रावल गेल्या वर्षी पती करण मेहरासोबतच्या वादामुळे खूप चर्चेत होती. अभिनेत्रीने करणवर विवाहबाह्य संबंध आणि मारहाणीचे आरोप केले होते. आता या शोमध्ये आल्यानंतर निशा काय करते, हे पाहण्यासारखे असेल.
- करणवीर बोहरा- टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा देखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसला आहे. करणवीरला चांगलीच पसंती मिळत असल्याने तो या शोमध्ये काय करतो हे पाहावे लागेल.
- सिद्धार्थ शर्मा- बिग एफ आणि स्प्लिट्सविला सारख्या रिअॅलिटी शोमध्ये चांगली कामगिरी करणारा सिद्धार्थ शर्माही या शोमध्ये आहे. तो यापूर्वी एकता कपूरच्या अल्ट बालाजी वेब सीरिज पंच बीटमध्येही दिसला आहे.
- बबिता फोगाट- 2014 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची मान उंचावणारी कुस्तीपटू बबिता फोगाटही या शोमध्ये आली आहे. या शोमध्ये पूनमसोबत बबिताची जोडी आहे.
- अंजली अरोरा- सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजली अरोरा देखील शोमध्ये आहे.
- पायल रोहतगी- बिग बॉसची माजी स्पर्धक पायल रोहतगी आजही अनेक वादात सापडते. सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे ती अनेकदा अशी विधाने करते की तिच्यावर अनेकदा कारवाईही झाली आहे. पायलही या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली आहे.
- चक्रपाणी महाराज- चक्रपाणी महाराज म्हणून ओळखले जाणारे देखील या शोचा एक भाग आहेत. कोरोना विषाणू महामारीच्या सुरुवातीच्या काळात चक्रपाणी त्यांच्या ‘गोमूत्र पार्टी’मुळे चर्चेत होते.
- शिवम शर्मा- स्प्लिट्सविला शोमध्ये दिसणारा शिवम शर्मा देखील या शोमध्ये एक स्पर्धक आहे.
- तहसीन पूनावाला- वकील आणि कार्यकर्ते तहसीन पूनावाला देखील या शोचा एक भाग आहे. तहसीन याआधी बिग बॉस 13 मध्ये दिसली होती.
संबंधित बातम्या :