Dhamaka | कार्तिक आर्यनने पूर्ण केले ‘धमाका’ चित्रपटाचे चित्रीकरण, लवकरच ट्रेलरमधून करणार धमाका!
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan) त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. अभिनेत्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. कार्तिक सध्या नेहमीच चर्चेत असतो. आता कार्तिक त्याच्या आगामी 'धमाका' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan) त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. अभिनेत्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. कार्तिक सध्या नेहमीच चर्चेत असतो. आता कार्तिक त्याच्या आगामी ‘धमाका’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. टीझरनंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही काळापूर्वी, कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा होती. अचानक कार्तिक त्याच्या ‘दोस्ताना 2’ चित्रपटातून बाहेर निघाला होता. पण, तेव्हापासून अभिनेत्याकडे कामाची रांग लागली आहे.
‘धमाका’चा ट्रेलर होणार रिलीज!
कार्तिक आर्यन स्टारर ‘धमाका’ ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा विशेष चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर सादर केला जाईल. कार्तिक आणि त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. काही काळापूर्वी धमकाचा ‘टीझर’ रिलीज झाला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता.
‘धमका’चा टीझर रिलीज होऊन सहा महिन्यांहून अधिक कालावधी झाला असला तरी या चित्रपटाच्या रिलीजबाबत कोणतीही विशिष्ट माहिती समोर आलेली नाही. आता हे स्पष्ट झाले आहे की कार्तिकने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, आम्ही तुम्हाला सांगू की लवकरच चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांसमोर सादर केला जाणार आहे.
नेटफ्लिक्सने सांगितले सत्य
कार्तिकच्या या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने 135 कोटी रुपये दिल्याच्या बातम्या सतत येत आहेत. त्यानुसार ओटीटीवरील हा सर्वात महागडा चित्रपट म्हणून याचे वर्णन केले जात होते. आता या बातमीनंतर नेटफ्लिक्सने एक प्रतिसाद सादर केला आहे.
अमर उजालाच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने या गोष्टी निराधार असल्याचे सांगितले आहे. ‘लव्ह आजकल’च्या फ्लॉपपासून कार्तिक आर्यनवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. सारा आणि अनन्या यांच्या सोबत अफेअरच्या वृत्तामुळे देखील अभिनेत्याच्या कारकीर्दीवर परिणाम झाला आहे. अमर उजालाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी नेटफ्लिक्सला याबद्दल विचारले की, त्यांनी कार्तिकचा आगामी चित्रपट 135 कोटींनी खरेदी केला आहे का?
यावर, नेटफ्लिक्सने असे म्हटले आहे की, ते केवळ चुकीचे आहे, ही आकडेवारी अजिबात खरी नाही. याद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, ध्माकाच्या अधिकाराबाबत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या केवळ अफवा होत्या. किंवा आपण असे म्हणू शकता की, हा एक पब्लिसिटी स्टंट देखील असावा. चित्रपटाचे एकूण ओटीटी हक्क, त्यातील निम्मेही अद्याप विकले गेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कार्तिकने आकारली ‘इतकी’ फी
असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाची शूटिंग कार्तिक आर्यन याने अवघ्या 10 दिवसात पूर्ण केले आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने 20 कोटींची मोबदला घेतला होता. ‘धमाका’ हा चित्रपट कोरियन चित्रपट ‘द टेरर लाईव्ह’चा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे, जो चाहत्यांनी खूप आवडला होता.