Kill Chori | श्रद्धा कपूर आणि भुवन बामच्या जोडीची कमाल, ‘किल छोरी’ गाण्याची युट्युबवर धमाल!

YouTuber भुवन बाम (Bhuvan Baam) आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा म्युझिक व्हिडीओ ‘किल छोरी’ (Kill Chori) रिलीज झाल्यापासून प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. ‘किल छोरी’ नावाचा हा म्युझिक व्हिडीओ दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे.

Kill Chori | श्रद्धा कपूर आणि भुवन बामच्या जोडीची कमाल, ‘किल छोरी’ गाण्याची युट्युबवर धमाल!
bhuvan-Shraddha
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 3:05 PM

मुंबई : YouTuber भुवन बाम (Bhuvan Baam) आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा म्युझिक व्हिडीओ ‘किल छोरी’ (Kill Chori) रिलीज झाल्यापासून प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. ‘किल छोरी’ नावाचा हा म्युझिक व्हिडीओ दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये भुवन बाम पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीसोबत डान्स करताना दिसत आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांमध्ये धुमाकूळ घालत आहे.

यूट्यूबवर ‘किल छोरी’ गाणे ट्रेंडिंग!

‘किल छोरी’ गाणे रिलीज झाल्यापासून हे यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. ट्रेंडिंग लिस्टमध्ये ते अव्वल स्थानावर आहे. तसेच, याला अवघ्या 24 तासांत 20 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. दिवाळीच्या अनुषंगाने हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. हे यंदाचे दिवाळीचे स्पेशल गाणे बनू शकते. यात भुवन बाम आणि श्रद्धा यांची लव्ह केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. गाण्यात श्रद्धा कपूर खूप सुंदर दिसत आहे, तर भुवन बाम देखील खूप सुंदर दिसत आहे.

भुवन हा भारतातील सर्वात मोठा YouTuber मानला जातो. त्याची लोकप्रियता यूट्यूबवरील एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. श्रध्दा सारखी स्टार सोबत आली, की धमाल तर होणारच ना! या व्हिडीओमध्ये भुवन गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आणि श्रद्धा मरून कलरच्या ड्रेसमध्ये एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहे.

पाहा गाणे :

View this post on Instagram

A post shared by Bhuvan Bam (@bhuvan.bam22)

भुवनची ‘धिंडोरा’ वेब सीरीजही चर्चेत!

युट्यूबर भुवन बामही सध्या त्याच्या ‘धिंडोरा’ या वेब सीरीजमुळे खूप चर्चेत आहे. त्याची ही वेब सीरीज प्रेक्षकांना खूप आवडते आहे. त्याच्या प्रमोशन दरम्यान भुवनने सर्व मोठे YouTubers एकत्र केले होते. भुवनच्या या मालिकेच्या प्रमोशनसाठी सर्वजण एकत्र आले होते. या सीरीजचे 3 भाग यूट्यूबवर स्ट्रीम केले जात आहेत.

भुवन बाम आणि श्रद्धा कपूरचे हे गाणे फ्री फायर इंडिया ऑफिशियलच्या यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. ‘किल चोरी’ हे गाणे अॅश किंग आणि निकिता गांधी यांनी गायले आहे आणि संगीत सचिन जिगर यांचे आहे. त्याचे बोल वायुने लिहिले आहेत. सचिन जिगर यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्हाला एक विनोदी गाणे आणायचे होते, ज्यामध्ये पार्टीचा मूड असेल. आम्हाला आशा आहे की प्रेक्षकांना ते आवडेल. नेहमीप्रमाणे, रसिक माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतील.

हेही वाचा :

आधी मारहाणीचा आरोप, मग घटस्फोट, आता स्नेहा वाघ पूर्वपतीला म्हणतेय ‘मला तुझ्या लग्नाला बोलव!’

Abhishek-Aishwarya Love Story | चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले, वाचा कशी होती अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकथा…

RRR | आलिया,अजय देवगणचे तेलगू चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण, एस एस राजामौलीच्या बहूचर्चित चित्रपटाचा टिझर आउट

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.