पहिलाच चित्रपट सुपरहिट त्यानंतर झाला गायब, 9 वर्षानंतर थेट ‘बिग बॉस’मध्ये! जाणून घ्या कोण आहे करण नाथ?

करण नाथने 2002मध्ये ‘ये दिल आशिकाना’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. करण नाथ असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्याचा पहिला चित्रपट अगदी सुपरहिट ठरला होता. पण नंतरच्या काळात त्याचे चित्रपट फारसे चालले नाहीत.

पहिलाच चित्रपट सुपरहिट त्यानंतर झाला गायब, 9 वर्षानंतर थेट ‘बिग बॉस’मध्ये! जाणून घ्या कोण आहे करण नाथ?
करण नाथ
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 9:57 AM

मुंबई : बिग बॉसचा 15वा सीझन (Bigg Boss OTT) रविवारी सुरू झाला. करण जोहरचा शो ‘बिग बॉस OTT’ Voot वर ऑनलाईन स्ट्रीम होत आहे. हा शो तुम्ही Voot वर चोवीस तास पाहू शकता. तर प्रत्येक सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता एक तासाचा विशेष भाग दाखवण्यात येईल. दुसरीकडे, एलिमिनेशनची प्रक्रिया रविवारी रात्री 8 वाजता होईल, ज्यामध्ये करण जोहर उपस्थित असेल. सर्व पुष्टीकृत स्पर्धक राकेश बापट, जीशान खान, मिलिंद गाबा, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण नाथ, शमिता शेट्टी, उर्फी जावेद, नेहा भसीन, मूस जताना, अक्षरा सिंह, दिव्या अग्रवाल आणि रिद्धिमा पंडित या शोमध्ये सामील झाले आहेत. आज आपण यातील स्पर्धक कारण नाथ (Karan Nath) याच्याबद्दल जाणून घेणार आहोत…

कोण आहे करण नाथ?

करण नाथने 2002मध्ये ‘ये दिल आशिकाना’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. करण नाथ असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्याचा पहिला चित्रपट अगदी सुपरहिट ठरला होता. पण नंतरच्या काळात त्याचे चित्रपट फारसे चालले नाहीत. या चित्रपटाची गाणी ‘उठा ले जावांगा’ आणि ‘ये दिल आशिकाना’ प्रचंड हिट झाली होती. करण नाथ हा माधुरी दीक्षितचे व्यवस्थापक राकेश नाथ यांचा मुलगा आहे.

कारकिर्दीची गाडी रुळावर आलीच नाही!

तथापि, ‘ये दिल आशिकाना’ च्या यशानंतरही करण नाथची कारकीर्द रुळावर आली नाही आणि ती सतत ढासळत राहिली. एक एक करत, करणचे सर्व आगामी चित्रपट फ्लॉप होत गेले आणि याचमुळे करण देखील फ्लॉप कलाकारांच्या यादीत सामील झाला. करण नाथने ‘पागलपन’, ‘एलओसी कारगिल’ ते ‘तुम’, ‘तेरा क्या होगा जॉनी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण ते सगळेच फ्लॉप ठरले.

मनोरंजन विश्वातून गायब

परिणामी, करण नाथ चित्रपट जगतातून गायब झाला. चित्रपटातील प्रचंड अपयशामुळे करण नाथ नैराश्यात राहू लागला. 2003 मध्ये दिलेल्या मुलाखतीतही त्यानी हा खुलासा केला होता. त्याचा ‘पागलपन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा ही गोष्ट घडली. करण नाथ आणि त्याच्या वडिलांना असे वाटत होते की, हा चित्रपट पुढे चालू शकतो. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा सर्व उलट घडले. चित्रपट सुपर फ्लॉप झाला आणि लोकांनी त्याच्या अभिनयावर देखील खूप टीका केली.

डिप्रेशनमध्ये गेला अभिनेता

यामुळे करण डिप्रेशनमध्ये गेला. मात्र, नंतर करणने स्वतःची काळजी घेतली. तो सुमारे आठ वर्षे या सगळ्यापासून दूर राहिला आणि या दरम्यान त्याला कोणताही चित्रपट मिळाला नाही. त्यानंतर जवळपास 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा करणने पुनरागमन केले. 2020 मध्ये ‘गन्स ऑफ बनारस’ चित्रपटात काम केले. हा चित्रपट अनेक कारणांसाठी विशेष होता. वास्तविक, हा 2007च्या एका सुपरहिट तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर सूरी यांनी केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत नतालिया कौर झळकली होती.

(Know about Bigg Boss Contestant and Bollywood Actor Karan Nath)

हेही वाचा :

Bigg Boss OTT | घरचं प्रकरण सोडून शमिता शेट्टी ‘बिग बॉस’च्या घरात! राज कुंद्रा प्रकरणानंतरही शोमध्ये एंट्री करताना म्हणाली…

Bigg Boss OTT Confirmed Contestants : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह ते टीव्ही शो क्वीन दिव्या अग्रवाल, ‘हे’ स्पर्धक दिसणार बॉलिवूडच्या घरात!

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.