मुंबई : शनिवार-रविवारी घरी मस्त आराम करत, आवडीचा चित्रपट किंवा वेबसीरिज पाहण्याची मजाच काही वेगळी असते. नवा वा जुना कोणताही चित्रपट असो किंवा वेबसीरिज , नेटफ्लिक्सवर (Netflix)सगळं पहायला मिळतं. नेटफ्लिक्स सध्याच्या काळातील आघाडीचे व्हिडीओ स्ट्रीमिंग ॲप आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आपल्या आवडीचे व्हिडीओज् (Videos)पहायला मिळत असल्याने अल्पकाळातच ते सर्वांच्या आवडीचे ॲप झाले आहे. लहान मुलांसाठीच्या चित्रपटांपासून मोठ्यांना आवडतील असे जगभरातील विविध भाषेतील चित्रपट, वेगवेगळ्या विषयांवरच्या उत्कंठावर्धक वेबसीरिज, असा खजाना नेटफ्लिक्सवर सापडतो. मात्र बऱ्याच जणांना त्यांचे प्लॅन खूप महाग वाटतात. पण आज आम्ही तुम्हाला नेटफ्लिक्सच्या अशा एका प्लॅनची (Netflix Plan)माहिती देणार आहोत, ज्यामुळे अगदी कमी पैशांत तुम्ही महिनाभर नेटफ्लिक्सवरील विविध भाषांतील चित्रपट, वेबसीरिजचा मनमुराद आनंद लुटू शकाल. नेटफ्लिक्सचा हा सबस्क्रिप्शन प्लॅन अवघ्या 149 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. या प्रीपेड प्लॅनमुळे केवळ शनिवार-रविवार नाही, तर संपूर्ण महिना तुमचे मनोरंजन होईल. नेटफ्लिक्सचा हा सबस्क्रिप्शन प्लॅन असून तो कोणीही युझर ॲक्सेस करू शकतो.
खरंतर, नेटफ्लिक्सवर लिस्टेड मोबाइल प्लॅनची किंमत 149 रुपये इतकी आहे. त्यामध्ये युझर्सना स्टॅंडर्ड पिक्चर क्वॉलिटी (480 पिक्सेल) पाहायला मिळते. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याचा वापर फक्त मोबाईल आणि टॅबवर केला जाऊ शकतो. म्हणजे नेटफ्लिक्सचा हा प्लॅन घेतलात तर तुम्ही केवळ तुमचा मोबाईल अथवा टॅब यावरूनच नेटफ्लिक्स ॲक्सेस करू शकाल. कॉम्प्युटर किंवा टीव्हीवर त्याचा वापर करता येणार नाही. मात्र 199 रुपयांच्या प्लॅनमुळे मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि टॅबवरून नेटफ्लिक्स ऑपरेट करता येऊ शकते. पण ते एका वेळेस एकाच टीव्हीवरुन अथवा एकाच स्क्रीनवरून ॲक्सेस करता येते.
नेटफ्लिक्स प्रमाणेच इतर ओटीटी (OTT)प्लॅटफॉर्म्सची संख्या वाढत असून नेटफ्लिक्सचे युझर्स इतर ठिकाणी विखरत आहे. घटत्या युझरसंख्येला आळा घालण्यासाठी नेटफ्लिक्सने अनेक कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिरातींसह अनेक स्वस्त प्लॅन नेटफ्लिक्स घेऊन येणार असल्याची माहिती मिळत आहे. टीव्ही आणि मोबाईल साठी सध्या सर्वात स्वस्त प्लॅन 199 रुपयांचा आहे. मात्र याहून अधिक स्वस्त प्लॅन लवकरच येतील अशी महिती समोर येत आहे.