Koffee With Karan 7: ‘कॉफी विथ करण’मध्ये आलिया-रणवीरने शेअर केलं बेडरुम सिक्रेट, पहा Video

करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण' 7 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्मवर वर सुरू होणार आहे. आलिया भट्ट आणि तिचा खास मित्र रणवीर सिंग या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत.

Koffee With Karan 7: 'कॉफी विथ करण'मध्ये आलिया-रणवीरने शेअर केलं बेडरुम सिक्रेट, पहा Video
'कॉफी विथ करण'चा (Koffee With Karan 7) नवा सिझन लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 8:25 AM

‘कॉफी विथ करण’चा (Koffee With Karan 7) नवा सिझन लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. करण जोहरचा शो त्याच्या अनोख्या थीममुळे खूप चर्चेत आहे आणि त्याला चाहत्यांचं प्रचंड प्रेमही मिळतं. कॉफी विथ करण सीझन 7 येत्या 7 जुलैपासून हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडची एक झलक समोर आली आहे. लवकरच आई होणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) शोच्या पहिल्या एपिसोडचे पाहुणे आहेत. ‘कॉफी विथ करण’च्या नव्या प्रोमोमध्ये करण जोहर या दोघांसोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये आलिया आणि रणवीरने त्यांच्या लग्नाशी, खासगी आयुष्याशी संबंधित अनेक गुपितं उघड केली आहेत.

करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो ‘कॉफी विथ करण’ 7 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्मवर वर सुरू होणार आहे. आलिया भट्ट आणि तिचा खास मित्र रणवीर सिंग या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. आलिया आणि रणवीर या दोघांची ऑफस्क्रीन धमाल या शोमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. करण जोहर या दोघांचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे या शोच्या निमित्ताने त्याने दोघांच्या खासगी आयुष्यातील बरेच प्रश्न विचारले आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करणने आलियाला विचारलं की लग्नानंतर तिला सर्वात जास्त कशाची भीती वाटली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रोमोमध्ये करण दोघांना विविध प्रश्न विचारताना दिसत आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना आलिया म्हणते, “हनीमून वगैरे असं काही नसतं. तुम्ही खूप थकलेले असता.” दुसरीकडे रणवीर त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतो. नंतर जेव्हा करण जोहर आलियाला विचारतो की तिची कोणाशी केमिस्ट्री चांगली आहे, रणवीर सिंग की वरुण धवन? त्यावर ती रणवीर कदाचित असं उत्तर देते. कदाचित हा शब्द ऐकून रणवीर नाराज होऊन उठतो आणि निघून जातो. नंतर तो परत येतो आणि तिला म्हणतो, ‘मैत्रिणीच्या नावावर तू कलंक आहेस’. कलंक हा आलिया आणि वरुणचा चित्रपट आहे. करण जोहरच्या शोच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो पाहून हा शो खूपच मजेशीर असणार असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.