रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, तरीही ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही ‘जस्ट फ्रेंड’!
असंख्य तरुणींच्या हृदयाची धडधड वाढविणारे लोकप्रिय अभिनेते ललित प्रभाकर आणि सर्वगुणसंपन्न बिनधास्त अभिनेत्री गौतमी देशपांडे यांनी आपल्या लालित्यपूर्ण वाचिक अभिनयातून 'जस्ट फ्रेंड'चा सुपर रोमँटिक ऑडिओ-ड्रामा अधिकच लज्जतदार, मजेशीर आणि उत्कंठावर्धक केला आहे.
मुंबई : आम्ही फक्त ‘जस्ट फ्रेंड’ असल्याची कबुली देण्यासाठी लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे या सुपर रोमँटिक जोडीने ‘स्टोरीटेल मराठी’ची निवड केली आहे. ‘जस्ट फ्रेंड’ असताना एकमेकांसोबत कसं रहावं? आपल्या भावना कश्या व्यक्त कराव्यात? यासाठी त्यांनी नव्या तरुणाईच्या मनाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या प्रख्यात लेखिका सायली केदार आणि गौरी पटवर्धन यांच्याकडून शाब्दिक मदत घेतली आहे.
त्यांच्या प्रेमाचा हा सुपर रोमँटिक चकटदार, खुसखुशीत ऑडिओ ड्रामा स्टोरीटेल मराठीने आपल्या ऑडिओबुकमध्ये रेकॉर्ड केला आहे. सर्वांचे कुतूहल जागवत असलेला हा ऑडिओ ड्रामा आपल्याला घरबसल्या, प्रवासात किंवा इतर कुठेही असताना, आपल्या मर्जीनुसार हवे तेव्हा ‘स्टोरीटेल’वर ऐकता येणार आहे. ‘जस्ट फ्रेंड’ या नव्याकोऱ्या ऑडिओ ड्रामाच्या निमित्ताने सर्वांना वेड लावणारी ललित प्रभाकर गौतमी देशपांडे ही क्युट बबली जोडी एकत्र आली आहे.
असंख्य तरुणींच्या हृदयाची धडधड वाढविणारे लोकप्रिय अभिनेते ललित प्रभाकर आणि सर्वगुणसंपन्न बिनधास्त अभिनेत्री गौतमी देशपांडे यांनी आपल्या लालित्यपूर्ण वाचिक अभिनयातून ‘जस्ट फ्रेंड’चा सुपर रोमँटिक ऑडिओ-ड्रामा अधिकच लज्जतदार, मजेशीर आणि उत्कंठावर्धक केला आहे.
मैत्रीतलं नातं अन् प्रेम!
मैत्री, मैत्रीतलं नातं, त्यांच्यातील रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, त्यासोबत असलेली डिपेन्डन्सी अश्या अनेक प्रेमळ नाजूक क्षणांचे सूक्ष्म निरीक्षण करून या व्यक्तिरेखा खुलविण्यासाठी या जोडगोळीने विशेष मेहेनत घेतली आहे. आदिती आणि चिराग या प्रमुख पात्रांचं सादरीकरण करताना ललित आणि गौतमी यांच्यातील उत्कठ बॉंडिंग दिसून येते. या दोन्ही व्यक्तिरेखा ते पुरेपूर जगले आहेत असे ‘जस्ट फ्रेंड’ स्टोरीटेलवर ऐकताना जाणवत राहते.
काय आहे कथा?
आदिती आणि चिराग अगदी बेस्ट फ्रेंड्स… आदितीच्या भाषेत अगदी Made for each other पण only as friends! आदितीला कुठलाही प्रॉब्लेम आला की चिरागची आठवण येते… चिराग तर आदितीच्या मेसेज शिवाय डोळेच उघडत नाही. दोघांच्या मैत्रीत इतका मोकळपणा की, अगदी डेटिंग ऍपवरच्या मुलाला कुठे भेटू हे विचारायलासुद्धा आदितीला चिराग लागतो. चिराग कधी कशामुळे चिडला असेल आणि त्यातून त्याला कसं मनवायचं हेही तिला आपोआप कळतं. एकमेकांवाचून ते जगूच शकत नाहीत. पण मग, खरंच हे इतके कॉम्पीटेबल असताना आदिती चिरागला सोडून डेटिंग ऍप वरुन मुलं का शोधतीये? आणि आदितीला जसा चिराग फक्त ‘as a friend’ हवाय तसंच चिरागचं नक्की आहे ना? या गोष्टीत त्या दोघांमधली मैत्री पावसाच्या साथीने घट्ट तर होत जाते, पण त्यांच्यातलं नातं मैत्रीच्या एक पाऊल पुढे जाईल का?
प्रतिभावान लेखिका!
लेखिका गौरी पटवर्धन यांनी स्टोरीटेलसाठी लोकप्रिय अभिनेते ‘सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर यांच्या आवाजामधील लोकप्रिय ‘हौस हजबंड’, मृण्मयी गोडबोले स्वानंदी टिकेकरसह ‘फिरंग’, तसेच नेहा अष्टपुत्रेसह ‘चिडका बिब्बा’, ‘रोकू बंद पडला’, ‘अळी आणि कोळी’, शेतातून ताटात, कल्पेश समेळसह मंकूचं झाड’, सौरभ गोगटेसह ‘डॉल हाऊस’, स्वप्नाली पाटीलसह ‘तो ती आणि तिचा तो’, मेघना एरंडेसह ‘बाहुलीचं लग्न’, मिशन हिमालय, ‘ऍडव्हेंचर काश्मीर’ इत्यादी ऑडिओ सिरीज लिहिल्या आहेत.
तर, लेखिका सायली केदार यांनी नुकतीच सुपरहिट झालेली अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या कल्पक वाचिक अभिनयाने नटलेली ‘केस 002’ व अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह ‘केस 001’ अभिनेत्री अक्षया देवधर हिच्या आवाजातील ‘झोलर’, स्वप्नाली पाटील, सिध्दार्थ चांदेकरसह ‘चित्रकथा’ स्वानंदी टिकेकर, अंगद म्हैसकर, सायली पाठक, पुष्कराज चिरपुटकरसह ‘टू टायमिंग’ भाग 1 व 2चे लेखन केले आहे. स्वतंत्रपणे लिखाण करणाऱ्या या दोन प्रतिभावंत लेखिका ‘जस्ट फ्रेंड’ नव्या ऑडिओ सिरीज निमित्तानं प्रथमच एकत्र आल्याने एक अभिनव कलाकृतीची निर्मिती झाली आहे.