Madhuri Dixit | ‘धकधक गर्ल’ची नवी इनिंग, माधुरी दीक्षित करणार OTTवर धमाकेदार पदार्पण!

नुकतीच माधुरी दीक्षित हिच्या पहिल्या वेब सीरीजविषयी माहिती समोर आली आहे. माधुरी दीक्षित करण जोहरच्या प्रोडक्शनमधून डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.

Madhuri Dixit | ‘धकधक गर्ल’ची नवी इनिंग, माधुरी दीक्षित करणार OTTवर धमाकेदार पदार्पण!
माधुरी दीक्षित
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 11:59 AM

मुंबई : आजकाल कोरोनामुळे चित्रपटगृह बंद आहेत, अशा परीस्थित लोक ओटीटीकडे वळले आहेत. नव्या आशयासह नवे कलाकार ओटीटीवर धुमाकूळ घालत आहेत. याच कारणामुळे अनेक सुपरस्टार्स देखील वेगवेगळ्या प्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सामील होत आहेत. आता या यादीत बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षितचाही (Madhuri Dixit) समावेश होणार आहे (Madhuri Dixit debut on OTT platform with Karan johar dharma production).

नुकतीच माधुरी दीक्षित हिच्या पहिल्या वेब सीरीजविषयी माहिती समोर आली आहे. माधुरी दीक्षित करण जोहरच्या प्रोडक्शनमधून डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.

माधुरीची नवी इनिंग

रिपोर्ट्सनुसार माधुरीला तिच्या पहिल्या वेब सीरीजसाठी खूप तगडे मानधन मिळाले आहे. असे म्हटले जात आहे की, हिंदी चित्रपटात काम करताना असताना देखील माधुरीला कधीही इतके मानधन मिळालेले नाही. लग्नानंतर चित्रपटांना निरोप देऊन निघून गेलेल्या माधुरीने ‘आजा नचले’ या चित्रपटाद्वारे कमबॅक केला होता.

मीडिया रिपोर्टनुसार करण जोहरची डिजिटल कंटेंट प्रोडक्शन कंपनी माधुरी दीक्षितसोबत एक नवी वेब सीरीज बनवत आहे. या मालिकेचे नाव खूप खास असणार आहे. यासह, बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली या सीरीजचे दिग्दर्शन करणार आहेत.

कोरोनामुळे शुटिंग लांबणीवर

कोरोनामुळे या सीरीजचे शूटिंग बर्‍याच दिवसांपासून स्थगित आहे. म्हणजेच आता हे स्पष्ट झाले आहे की, आता माधुरी दीक्षितलासुद्धा लारा दत्ता, सुष्मिता सेन यांच्याप्रमाणेच डिजिटल पदार्पणाद्वारे चाहत्यांना सरप्राईज द्यायचे आहे. आता बॉलिवूडची धकधक गर्ल डिजिटल विश्वात धमाका करणार का, याकडे सगळ्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

माधुरी दीक्षितची ही नवी सीरीज Amazon Prime Videoवर प्रदर्शित होईल. माधुरी ही एक अभिनेत्री आहे, जी नेहमीच वादापासून दूर राहते. आता वयाच्या 54 व्या वर्षी ती पहिली-वाहिली वेब फिल्म करून नवी इनिंग सुरु करणार आहे.

कशी असेल ही सीरीज?

माधुरी दीक्षितची ही वेब सीरीज ‘फॅमिली ड्रामा’ असणार आहे. ‘दीवार’ चित्रपटाच्या ‘मेरे पास माँ है’ या संवादातून त्याचे नाव ठेवण्यात येणार आहे. नावाप्रमाणेच ही सीरीज देखील विशेष असणार आहे. माधुरी बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, परंतु ती अनेक रियॅलिटी डान्सिंग शोच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळत आहे. सध्या अभिनेत्री ‘डान्स दिवाने’ या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे.

माधुरीने तिच्या कारकीर्दीत अनेक उत्तम चित्रपटांत काम केले होते. ‘मृत्युदंड’, ‘लज्जा’, ‘हम आपके हैं कौन’, ‘साजन’, ‘देवदास’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. लग्नानंतर अभिनेत्रीने सिनेमा विश्वाला निरोप दिला आणि परदेशात शिफ्ट झाली होती.

(Madhuri Dixit debut on OTT platform with Karan johar dharma production)

हेही वाचा :

एक दिवस आधीच ढासळली होती राज कौशल यांची तब्येत, पत्नी मंदिराला म्हणाले ‘मला हार्टअटॅक येतोय’

Photo : ‘कुछ कुछ होता है’ ते ‘बाजीराव मस्तानी’ ‘या’ सुपरहिट चित्रपटांना ऐश्वर्या रायनं दिला होता नकार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.