Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चर्च-मदरशांवर चित्रपट बनवून दाखवा!’, बजरंग दलाच्या हल्ल्यानंतर आता साध्वी प्रज्ञाची ‘आश्रम 3’ला धमकी!

सोमवारी (25 ऑक्टोबर) बातमी आली की, बजरंग दलाच्या लोकांनी भोपाळमध्ये सुरू असलेल्या बॉबी देओल स्टारर 'आश्रम 3' चा सेट तोडला. त्याचवेळी आता भोपाळमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी चित्रपट निर्मात्यांना धमकी दिली आहे.

‘चर्च-मदरशांवर चित्रपट बनवून दाखवा!’, बजरंग दलाच्या हल्ल्यानंतर आता साध्वी प्रज्ञाची ‘आश्रम 3’ला धमकी!
Sadhvi Pragya
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 11:12 AM

मुंबई : चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग नुकतेच सुरू झाले होते की, त्यावरून वाद निर्माण झाला आहे. सोमवारी (25 ऑक्टोबर) बातमी आली की, बजरंग दलाच्या लोकांनी भोपाळमध्ये सुरू असलेल्या बॉबी देओल स्टारर ‘आश्रम 3’ चा सेट तोडला. त्याचवेळी आता भोपाळमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी चित्रपट निर्मात्यांना धमकी दिली आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत भक्ती आखाडा वेब सीरीज, स्क्रिप्ट आणि चित्रपटांच्या सामग्रीचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करेल. एवढेच नाही तर, गरज पडल्यास वादग्रस्त चित्रपटांची निर्मिती होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रज्ञाने ‘आश्रम’ मालिकेच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंगही थांबवण्याची धमकी दिली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली सनातन धर्माची विटंबना आणि अपमान केला जात असल्याचा आरोप प्रज्ञा यांनी केला आहे.

भाजप खासदाराची धमकी आणि चित्रपट निर्मात्यांना इशारा

भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, मी संन्यासी असल्यामुळे साधूंच्या वेदना समजू शकते. ‘आश्रम’ हा शब्द ऐकताच मन प्रसन्न होते आणि चांगल्या भावनांचा संवाद होऊ लागतो, पण ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे. आता हिंदूंच्या भावना दुखावणारे चित्रपट बनवले जात आहेत. हे सर्व आता फक्त मध्य प्रदेशातच नाही, तर संपूर्ण देशात थांबले पाहिजे.

यासोबतच प्रज्ञाने चित्रपट निर्मात्यांना आव्हान दिले की, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी चर्च, मदरसे, बायबल आणि कुराणवरील चित्रपट दाखवावेत. लव्ह जिहादवर कोणी चित्रपट का बनवत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भोपाळमध्ये सुरू असलेल्या ‘आश्रम 3’च्या शूटिंगच्या सेटवर सोमवारी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. एवढेच नाही, तर सेटची नासधूस केली. बजरंग दलाच्या या हल्ल्यात चित्रपटाच्या टीममधील 4 ते 5 जण जखमी झाले. एवढेच नाही, तर हल्लेखोरांनी प्रकाश झा यांच्यावर शाईही फेकली. या घटनेनंतर हंसल मेहता, प्रितिश नंदी, सुधीर मिश्रा या चित्रपट निर्मात्यांनी याचा तीव्र निषेध केला. त्याचबरोबर या घटनेविरोधात बॉलिवूडने आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘आश्रम 2’ ही अडकली होती वादात

‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता. यानंतर दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनानंतर असेच एक संकट कोसळले होते. धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

हेही वाचा :

Antim : The Final Truth च्या ट्रेलर लॉन्चनंतर आयुष शर्माच्या घरी पार्टीचं आयोजन, बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी

Happy Birthday Sussane Khan | पहिल्याच नजरेत सुझान खानच्या प्रेमात पडला होता हृतिक रोशन, पहिल्या डेटचं बिल देखील सुझानच्या नावावर!

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.