AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ते म्हणतात… सगळं सेमच आहे”, Kranti Redkar ने सांगितला पती Sameer wankhede सोबतचा शॉपिंगचा किस्सा

क्रांती रेडकरने तिचे पती आणि अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचा शॉपिंगचा किस्सा सांगितला आहे. तिने इन्स्टाग्रामवर रील शेअर करत शॉपिंगवेळी समीर वानखेडे यांची रिअॅक्शन काय असते ते सांगितलं आहे.

ते म्हणतात... सगळं सेमच आहे, Kranti Redkar ने सांगितला पती Sameer wankhede सोबतचा शॉपिंगचा किस्सा
क्रांती रेडकर, समीर वानखेडेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 9:44 PM

मुंबई : संसार म्हटलं की त्याच त्या गोष्टींवरून नवरा-बायकोचे वाद, लुटूपुटूची भांडणं आलीच. सर्व सामान्यांच्या घरात ज्या गोष्टी घडतात त्याच गोष्टी सेलिब्रिटींच्या घरातही घडतात का? असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असेल. याचं उत्तर अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) दिलं आहे. शेवटी संसार म्हटलं की घरोघरी मातीच्या चुली! त्यामुळे क्रांतीने तिचे पती आणि अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासोबतचा शॉपिंगचा किस्सा सांगितला आहे. तिने इन्स्टाग्रामवर रील (Instagram Reel) शेअर करत शॉपिंगवेळी समीर वानखेडे यांची रिअॅक्शन काय असते ते सांगितलं आहे. “आम्ही एकत्र शॉपिंगला गेलो तर आम्हाला दोघांना लागणारी वस्तू जरी घ्यायची असेल तरी समीर खरेदीत फार रस घेत नाहीत. ते नेहमी म्हणतात सगळं सेमचं तर आहे, तुला जे हवं घे”, असं क्रांती म्हणाली आहे.

क्रांती रेडकरचा शॉपिंग किस्सा

क्रांती रेडकरने मॉलमध्ये गेल्यानंतर तिथं जे पाहिलं त्यावर एक रील बनवलं. “मी एका मॉलमध्ये गेले होते, तिथे एक जोडपं चप्पल खरेदी करण्यासाठी आलं होतं. तो मुलगा बेबी तुला ही चप्पल चांगली दिसेल. हा कलर बघ तुला मस्त दिसेल, जरा चालून दाखव बघू… असं म्हणत होता. त्यांना पाहून मला असं वाटलं की कोण असतात ही माणसं?”, असं क्रांती या रीलमध्ये म्हटलं आहे. पुढे तिने तिचे पती समीर वानखेडे यांच्यासोबतचा शॉपिंगचा किस्सा सांगितला. “आम्ही एकत्र शॉपिंगला गेलो तर आम्हाला दोघांना लागणारी वस्तू जरी घ्यायची असेल तरी समीर खरेदीत फार रस घेत नाहीत ते नेहमी म्हणतात सगळं सेमचं तर आहे. कसला कलर? तुला जे हवं घे. असं समीर नेहमी म्हणतात”, असं क्रांती म्हणाली आहे. या रीलला तिने “मला खात्री आहे की मला टाइप वन वाला असा नवरा झेपला नसता” असं कॅप्शन दिलं आहे.

हा किस्सा तिच्या वडिलांना सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती हेही तिने सांगितलं आहे. मी माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की “अगं बॉयफ्रेड असेल तो तिचा… असं म्हणाले”, असं क्रांतीने या रीलमध्ये सांगितलं आहे.

क्रांतीचा हा व्हीडिओ अनेकांना आवडला आहे. तिच्या या रीलवर अनेकांनी कमेंट करत आपले अनुभव सांगितलं आहेत. एका युजरने “सेम काल मी पण चप्पल घेतली. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, अहो… बघा ना कोणती चप्पल घेऊ? त्यावर ते म्हणाले घे कोणती पण आणि चल…. आता यावर काय बोलायचं सांगा?”, असं ही युजर म्हणाली आहे.

संबंधित बातम्या

The Kashmir Files मध्ये वाशिमच्या मराठमोळ्या बालकलाकाराने साकारली भूमिका; दोन महिने कडाक्याच्या थंडीत केलं शूटिंग

Gayathri Accident: मैत्रिणींसोबतची होळी ठरली शेवटची; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अवघ्या 26 वर्षी अपघातात मृत्यू

The Kashmir Filesची कथा काल्पनिक असल्याचा आरोप करणाऱ्यांवर पल्लवी जोशी भडकल्या; म्हणाल्या..

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.