मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे यांचं ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ गाणं रिलीज, बिग बॉसनंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र

जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथ यांचा 'जोडी दोघांची दिसते चिकनी' हा म्युझिक व्हीडिओ रिलीज झाला आहे. जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथ यांचं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीला उतरतंय.

मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे यांचं 'जोडी दोघांची दिसते चिकनी' गाणं रिलीज, बिग बॉसनंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र
मीरा जगन्नाथ, जय दुधाणे-जोडी दोघांची दिसते चिकनी
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 12:06 PM

मुंबई : बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) या रिअ‍ॅलिटी शोचा उपविजेता जय दुधाणे (Jay Dudhane) आणि याच शोधमील स्पर्धक असलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Meera Jagnnath) पहिल्यांदाच म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र आले आहेत. ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ (Jodi Doghanchi Disate Chikani) हा म्युझिक व्हीडिओ रिलीज झाला आहे. सप्तसूर म्युझिक या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हीडिओ रिलीज झालाय. ‘जोडी दोघांची दिसते चिकनी, कोलीवाऱ्याची राजा नी राणी’ असे शब्द असलेलं हे गाणं अतिशय श्रवणीय आहे. सहजपणे ओठी रुळणारे आणि उडती चाल ही गाण्याची वैशिष्ट्यं आहेत. जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथ यांचं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीला उतरतंय.

साईनाथ राजाध्यक्ष यांनी ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. बीना राजाध्यक्ष या सहनिर्मात्या आहेत. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे या नव्या दमाच्या गायकांनी हे गाणं गायलं आहे. राजेंद्र वैद्य कल्याणकर यांच्या शब्दांना अमेय मुळे यांनी स्वरसाज चढवला आहे.

एमटीव्हीवरच्या ‘स्प्लिट्सव्हिला’ या रिअॅलिटी शोच्या तेराव्या सीझनमधून जय दुधाणे प्रकाशझोतात आला. त्यानंतर जयनं बिगबॉसच्या अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद मिळवलं. तर मीरानं माझ्या नवऱ्याची बायको’ आणि येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकातून आपला अभिनय प्रवास सुरू केला. बिग बॉसमध्ये मीरा आणि जय दोघे एकत्र होते. बिग बॉसचा सीझन संपल्यानंतर मीरा आणि जय पहिल्यांदाच म्युझिक व्हिडिओतून एकत्र झळकले आहेत. साईनाथ राजाध्यक्षनिर्मित ‘तुझी माझी यारी’ या प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या वेबसिरीजमध्ये मीरा जगन्नाथने मुख्य भूमिका केली आहे.

मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे यांचं ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ नुकतंच प्रदर्शित झालंय. त्यांच्या या गाण्याला दोन दिवसात साडे सहाशेहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

संबंधित बातम्या

Sai Tamhankar Photos : सई ताम्हणकरचा क्लासी लूक, फोटो इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

Praveen Kumar Sobti Passed Away : महाभारतात भिमाची भूमिका साकारणारे अभिनेते, अ‍ॅथलिट प्रविण कुमार सोबती यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Birthday Special : बिकनीपासून लेहंग्यापर्यंत इशिता राज शर्माच्या बोल्ड लूकने चाहते घायाळ, पाहा खास फोटो!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.