Mile Sur Mera Tumhara : स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, पाहा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गाणं नव्या रुपात
कलाकार स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात कसे मागे राहतील. तर 33 वर्षांपूर्वी 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणं आपल्या भेटीला आलं होतं. या गाण्यानं रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती. आता याच गाण्याची आठवण करून देत हे गाणं रिक्रीयेट करण्यात आलं आहे. (Mile Sur Mera Tumhara: Independence Day excitement, see the song 'Mile Sur Mera Tumhara' in a new form)
मुंबई : स्वातंत्र्याशिवाय (Independence) जीवन जगण्याचा विचार केला तरी भीती वाटते. आज आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा होता आणि त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या दिवशी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं, म्हणून आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. देशभक्तीवर अनेक चित्रपट आणि गाणी बनली आहेत.
मग कलाकार स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात कसे मागे राहतील. तर 33 वर्षांपूर्वी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ (MILE SUR MERA TUMHARA REVISITED) हे गाणं आपल्या भेटीला आलं होतं. या गाण्यानं रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती. आता याच गाण्याची आठवण करून देत हे गाणं रिक्रीयेट करण्यात आलं आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अनेक कलाकारांनी एकत्र येत हे गाणं शूट केलं आहे.
पाहा गाणं