Mirzapur 3 : गुड्डू भैया-कालीन भैया येतोय, ‘मिर्झापूर 3’ च्या रिलीज बद्दल महत्त्वाची अपडेट
'मिर्झापूर 3' च्या प्रदर्शनाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय. तिसरा भाग रिलीज कधी होणार? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आता या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. या सीरीजचे निर्माते रितेश सिधवानी यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
ओटीटी प्लेटफॉर्म प्राइम वीडियोवरच्या लोकप्रिय वेब सीरीजपैकी एक म्हणजे ‘मिर्झापूर’. या वेब सीरीजचे पहिले दोन सीजन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आता ‘मिर्झापूर 3’ कधी रिलीज होणार? याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुक्ता आहे. गुड्डू भैया आणि कालीन भैया यांचा संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक्त आहेत. ‘मिर्झापूर 3’ वेब सीरीज वर्ष 2024 मध्ये रिलीज होऊ शकते. या सीरिजची नेमकी रिलीज डेट अजून समोर आलेली नाही. पण प्रोड्यूसर रितेश सिधवानी यांनी ‘मिर्झापूर 3’ वेब सीरीजबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
वेब सीरीज कधी रिलीज करायची हे आमच्या नाही, हे प्राइम वीडियोच्या हातात आहे. मला असं वाटतं की, ही वेब सीरीज जून-जुलै पर्यंत रिलीज होईल असं प्रोड्यूसर रितेश सिधवानी म्हणाले. रितेश सिधवानी यांनी नेमकी रिलीज डेट सांगितलेली नाही. पण एक स्पष्ट झालय की, पुढच्या तीन-चार महिन्यात ‘मिर्झापूर 3’ रिलीज होईल. अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. आता फक्त तारखेची प्रतिक्षा आहे.
मुन्ना त्रिपाठी दिसणार का?
जेव्हा प्राइम व्हिडिओने अपकमिंग चित्रपट आणि सीरीजची लिस्ट दिली होती, तेव्हा त्या कार्यक्रमाला मिर्झापूरची पूर्ण स्टार कास्ट पोहोचली होती. फक्त मुन्ना भय्याचा रोल साकारणारे दिव्येंदु शर्मा दिसले नव्हते. ‘मिर्झापूर’ ही प्राइम विडिओवरची हिट वेब सीरीज आहे. रितेश दुसऱ्या एका मुलाखतीत म्हणाला की, “दुर्देवाने मुन्ना त्रिपाठी सीरीजमध्ये कमबॅक करणार नाहीय. पण काहीतरी इंटरेस्टिंग घडणार आहे. लोकांना वाट पाहावी लागेल” मिर्झापूरचा पहिला सीजन 2018 मध्ये आला होता. त्यानंतर दोन वर्षांनी 2020 मध्ये दुसरा सीजन आला. आता चार वर्षानंतर मिर्झापूर 3 येणार आहे. हिंसाचाराने भरलेली ही वेब सीरीज OTT प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.