‘राधा: द इटरनल मेलडी’ या शॉर्ट ॲनिमेशन चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, विजेत्यांचा आमदार सुनिल प्रभूंनी केला सत्कार!

फेरीकाऊज ॲनिमेशन स्टुडिओ निर्मित ‘राधा: द इटरनल मेलडी’ या शॉर्ट ॲनिमेशन चित्रपटाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी अत्यंत प्रतिष्ठेच्या 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट व सर्वोत्कृष्ट ऑडीओग्रॅफी असे पुरस्कार प्राप्त झाले.

‘राधा: द इटरनल मेलडी’ या शॉर्ट ॲनिमेशन चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, विजेत्यांचा आमदार सुनिल प्रभूंनी केला सत्कार!
विजेत्यांचा आमदार सुनिल प्रभूंनी केला सत्कार!
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 2:26 PM

मुंबई : फेरीकाऊज ॲनिमेशन स्टुडिओ निर्मित ‘राधा: द इटरनल मेलडी’ या शॉर्ट ॲनिमेशन चित्रपटाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी अत्यंत प्रतिष्ठेच्या 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट व सर्वोत्कृष्ट ऑडीओग्रॅफी असे पुरस्कार प्राप्त झाले. या वेळी चित्रपटाचे निर्मात्या संगिता चौधरी, दिग्दर्शक बिमल पोद्दार, ॲनिमेटर नितीन खारकर, ध्वनी ऑलवीन रेगो, व संजय मौर्या अशा तब्बल 5 जणांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुख्य प्रतोद, आमदार सुनिल प्रभु यांनी “राधा: द इटरनल मेलडी” या शॉर्ट ॲनिमेशन चित्रपटाचे निर्मात्या संगिता चौधरी, दिग्दर्शक बिमल पोद्दार व द्विमितीय व त्रिमितीय ॲनिमेटर नितीन खारकर यांचा सत्कार केला. यावेळी विधानसभा संघटक शालिनी सावंत, उपविभाग प्रमुख जितेंद्र वळवी, शिवसैनिक व सकल मराठा समाजाचे दीपक परब उपस्थित होते. नितीन खारकर हे जेष्ठ शिवसैनिक कै. रवींद्र खारकर यांचे चिरंजीव असून गोकुळधाम दिंडोशी येथील रहिवासी आहेत.

काय आहे या चित्रपटाची कथा?

राधा ही दोन भिन्न पात्रांमधील प्रेम आणि त्याग याविषयी एक भावनिक उतार-चढाव आहे. एक वृद्ध आजी (राधा) आपल्या नातवाचे पालनपोषण करते आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करते. नियतीने त्यांना कालांतराने वेगळे केले आणि त्यामुळे आता वेगळ्या शहरात राहणार्‍या नातवाला एक नजर पाहण्यासाठी आजीची तगमग सुरू होते. या मुकपटातील दृश्ये आणि संगीत फार बोलके आणि व्यक्त होणारे आहेत. हिंदू पौराणिक कथेनुसार कृष्णाने तिला वृंदावनात सोडल्यानंतर राधाची प्रतीक्षा आणि ‘बिराह’ या दोन व्यक्तींमधील एक अदृश्य बंध या कथेत बांधला गेला आहे.

राधा सध्याच्या प्रत्येक घरातील एका वृद्ध, एकाकी स्त्रीचे प्रतिनिधित्व करते जिथे मुले चांगल्या भविष्यासाठी, करिअरसाठी आणि जीवनशैलीसाठी आपले घर, परिवार सोडतात. ज्यामुळे कुटुंबातील मोठी माणसे एकटे पडली आहेत आणि त्यांच्याकडे दुसरं काही उरले नाही, पण गेलेल्या दिवसांच्या आठवणी त्यांच्या भोवती पिंगा घालतात.

नात्यांचा आदर करण्याची शिकवण

हा चित्रपट दोन पात्रांमधील प्रेम आणि स्नेहावर आधारित आहे. एखाद्याला गमावणे कठीण आहे आणि माणूस म्हणून आपण नेहमी पश्चात्ताप करतो किंवा जेव्हा ती व्यक्ती नसते तेव्हा आपल्या कृतीबद्दल पश्चात्ताप होतो.  “आपण मुलगा/मुलगी, भाऊ/बहीण, वडील/आई आणि मित्र या नात्याचा आदर केला पाहिजे, पालनपोषण केले पाहिजे आणि नात्यांचे उत्सव साजरे केले पाहिजे. बिनशर्त आणि शुद्ध प्रेम कधीही मरत नाही, ते शाश्वत आहे.  ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्यांना आपण कधीही गमावत नाही;  आम्ही त्यांना पाहू शकत नसतानाही ते आमच्या पाठीशी उभे असतात. जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात ते आपल्याला कधीही सोडत नाहीत, अशा प्रेमाच्या दोन लोकांमधील चिरंतन बंध कधीही तुटत नाही, हे या चित्रपटाचे सार आहे.

हेही वाचा :

’झिम्मा’ चित्रपटातून गवसणार नभाच्या पल्ल्याडचं ‘माझे गाव’, मैत्रिणींच्या सहलीत प्रेक्षकही घेणार फिरस्तीचा अनुभव!

जाता जाताही सत्कार्य करून गेला अभिनेता पुनीत राजकुमार, नेत्रदानामुळे 4 लोकांना मिळाली दृष्टी!

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.