Money Heist | तब्बल 5 वेळा ऑडिशन दिल्यानंतर अल्वारो मोर्टेला मिळाले ‘मनी हाईस्ट’मध्ये काम, खऱ्या आयुष्यातही शिक्षक म्हणूनही केलेय काम!

स्पॅनिश अभिनेता अल्वारो मोर्टे (Alvaro Morte) यांनी या प्रोफेसरची दमदार भूमिका साकारली आहे. ही संपूर्ण सीरीज चाहत्यांचे मनोरंजन करते, परंतु यामध्ये अल्वारो मोर्टेचे पात्र चाहत्यांच्या अगदी जवळचे आहे.

Money Heist | तब्बल 5 वेळा ऑडिशन दिल्यानंतर अल्वारो मोर्टेला मिळाले ‘मनी हाईस्ट’मध्ये काम, खऱ्या आयुष्यातही शिक्षक म्हणूनही केलेय काम!
अल्वेरो मोर्टे
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 10:10 AM

मुंबई : एक हुशार प्राध्यापक पुन्हा त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी येत आहे आणि तेही नव्या धमाक्यासह. ‘मनी हाईस्ट’चा 5 सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या क्राईम ड्रामा सीरीजची वाट चाहते आतुरतेने बघत आहेत. ‘मनी हाईस्ट’ (Money Heist) या सीरीजमधील ‘प्रोफेसर’चे पात्र सर्व चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे.

स्पॅनिश अभिनेता अल्वारो मोर्टे (Alvaro Morte) यांनी या प्रोफेसरची दमदार भूमिका साकारली आहे. ही संपूर्ण सीरीज चाहत्यांचे मनोरंजन करते, परंतु यामध्ये अल्वारो मोर्टेचे पात्र चाहत्यांच्या अगदी जवळचे आहे. चला तर, जाणून घेऊया या लोकप्रिय अभिनेत्याबद्दल…

मध्यमवर्गीय कुटुंबात अल्वारोचा जन्म

अल्वारो मोर्टे यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1975 रोजी अल्जेसिरस (Algeciras), स्पेन येथे झाला. अल्वारो मोर्टे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अभिनेत्याच्या जन्मानंतर, त्याचे कुटुंब दक्षिण स्पेनमधील बुर्जॅलन्स, कॉर्डोबा येथे स्थायिक झाले.

अभिनेत्याचे शिक्षण

अल्वारोच्या शिक्षणाबद्दल बोलायचे, तर त्याने पहिला कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता. परंतु, नंतर तो त्यात रमलाच नाही, म्हणून त्याने नाट्य कलामध्ये प्रवेश घेतला. अल्वारो मोर्टे यांनी फिनलँडच्या टँपेरे विद्यापीठातून (University of Tampere) पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो माद्रिदला गेला.

कर्करोगाशी यशस्वी झुंज

अभिनेता अल्वारो मोर्टे 2011मध्ये कर्करोगाला बळी पडले होते. अल्वारो मोर्टे यांना डाव्या पायात ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. अभिनेता स्वतः म्हणाला होता की, जेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याला कर्करोगाचे निदान झाले आहे, तेव्हा त्याला वाटले की आता तो मरणार आहे. आपला पाय कापला जाईल, याची त्याला खूप भीती वाटत होती. मात, अभिनेत्याने हार मानली नाही आणि कर्करोगालाही पराभूत केले.

आयुष्यातला टर्निंग पॉईंट

अल्वारो मोर्टेच्या कारकीर्दीसाठी ‘मनी हाईस्ट’ हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला आहे. अल्वारोचे जीवन आणि करिअर या दोन्हीसाठी ही सीरीज अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या मालिकेने केवळ स्पेनमध्येच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये अभिनेत्याला ओळख मिळाली आहे. अगदी बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना यानेही सीरीजमधील प्रोफेसरची भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

कशी मिळाली भूमिका?

प्रोफेसरच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने तब्बल पाच वेळा ऑडिशन दिली होती. ही गोष्ट जाणल्यानंतर प्रत्येकजण अल्वारो मोर्टेचे कौतुक करतो. माध्यम अहवालांनुसार, अल्वारोने दोन महिन्यांत तब्बल पाच वेळा ऑडिशन दिली आणि तो पाचव्या प्रयत्नात सफल झाला.

शिक्षक म्हणूनही केले काम

पडद्यावर प्राध्यापकाची भूमिका साकारणारा अल्वारो मोर्टे प्रत्यक्ष जीवनातही विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतो. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता फिनलँडच्या टँपरे विद्यापीठात साहित्य आणि स्टेज व्यवस्थापन या विषयावर व्याख्याने देतो. एवढेच नाही तर अभिनेत्याची एक थिएटर कंपनी देखील आहे. अल्वारो मोर्टेचे कंपनीचे नाव ‘300 pistolas’ आहे. याची स्थापना अभिनेत्याने 2012 मध्ये केली होती. अल्वारो मोर्टेचे स्टायलिस्ट ब्लँका क्लेमेंटेशी (Blanca Clemente) लग्न केले आहे. त्यांना दोन मुले ज्युलियट आणि लिओन आहेत.

(Money Heist 5 After auditioning 5 times, Alvaro Morte got a role in Money heist)

हेही वाचा :

Money Heist Season 5 Trailer | ‘प्रोफेसर’ला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक, काही वेळातच रिलीज होणार बहुप्रतीक्षित ‘मनी हाईस्ट 5’चा ट्रेलर!

Bigg Boss OTT | ‘बिग बॉस ओटीटी’ची पहिली स्पर्धक जाहीर, ‘ही’ सुप्रसिद्ध गायिका दिसणार BB15च्या घरात!

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....