Money Heist 5 Release Time : उरलेयत अवघे काहीच तास, जाणून घ्या ‘मनी हाईस्ट 5’ कुठे आणि किती वाजता पाहता येणार?
प्रोफेसर आणि त्याच्या टीमने प्रत्येक सिनेमा प्रेमीच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येकजण ‘मनी हाईस्ट सीझन 5’च्या (Money Heist 5) रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीझन आज (3 सप्टेंबर) चाहत्यांसमोर सादर होणार आहे.
मुंबई : प्रोफेसर आणि त्याच्या टीमने प्रत्येक सिनेमा प्रेमीच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येकजण ‘मनी हाईस्ट सीझन 5’च्या (Money Heist 5) रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीझन आज (3 सप्टेंबर) चाहत्यांसमोर सादर होणार आहे. आज म्हणजेच शुक्रवारी, मनी हाईस्टचा शेवटचा सीझन रिलीज होत आहे (Money Heist 5 Release Time).
‘मनी हाईस्ट सीझन 5’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. या क्राईम-थ्रिलर वेब सीरीजचे चाहते खूप वेळ आतुरतेने वाट पाहत होते. आता अलीकडेच नेटफ्लिक्सने ही सीरीज रिलीज होण्याची वेळ जाहीर केली आहे.
‘मनी हाईस्ट सीझन 5’ केव्हा आणि कोणत्या वेळी रिलीज होईल?
‘मनी हाईस्ट 5’ व्हॉल्यूम 1 शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाईल, हे जाणून चाहत्यांना देखील आनंद होईल. एवढेच नाही, तर मालिकेचा हा शेवटचा सीझन 2 भागांमध्ये सादर केला जात आहे. त्याचा पहिला भाग आज सादर केला जाईल, तर दुसरा भाग 3 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
एवढेच नाही तर, मनी हाईस्टबद्दल चाहत्यांना असणाऱ्या क्रेझमुळे त्याचे इमोजी देखील रिलीज करण्यात आले आहेत. नेटफ्लिक्सच्या अकाऊंटवरून असे लिहिले गेले आहे की, जर तुम्ही हे इमोजी पाहण्यास सक्षम असाल तर, तुमचा मास्क घालण्याची वेळ आली आहे, कारण मनी हाईस्ट उद्या भेटीला येणार आहे.
शोचे किती भाग असतील?
मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या खंडात त्याचे फक्त 5 भाग असतील. प्रोफेसर आणि त्यांची टीम अशा स्थितीत आहे, जिथे सुटण्याचा कोणताही मार्ग नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या नजरा प्रोफेसर आता परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करणार आहे, याकडे लागले आहेत. तर, चौथा हंगाम 2020मध्ये आला, ज्यामध्ये 8 भाग होते. स्पॅनिश व्यतिरिक्त, हा शो नेटफ्लिक्सवर इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध आहे.
त्याच वेळी, नवीन सीझनमध्ये अनेक नवीन चेहरे दाखल होणार आहेत. दुसरीकडे असेही म्हटले जात आहे की, चौथ्या सीझनमध्ये मरण पावलेला नैरोबी या सीझनमध्ये परतणार आहे. मनी हाईस्टचा सीझन 5 हा शेवटचा सीझन असणार आहे. ज्यामुळे प्रेक्षक त्याबद्दल खूप उत्सुक आहेत.
कशी हिट झाली सीरीज?
Abserver.com च्या अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे या सीरीजला खूप फायदा झाला आहे. खरं तर, लॉकडाऊन दरम्यान ‘मनी हाईस्ट’चा तिसरा आणि चौथा सीझन रिलीज झाला होता आणि त्यावेळी प्रत्येकजण ओटीटीवर सीरीज पाहण्यात अधिक व्यस्त होता, कारण थिएटर बंद होते. प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली आणि प्रत्येकाला ती खूप आवडली. कोरोना काळादरम्यान सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेब सीरीजमध्ये ‘मनी हाईस्ट’चा देखील समावेश आहे.
हेही वाचा :
शहनाजला करायचं होतं सिद्धार्थ शुक्लाशी लग्न, बिग बॉस 13च्या ‘या’ माजी स्पर्धकानं केला खुलासा