Money Heist Season 5 Part 2 | Alicia गेम चेंजर ठरणार की प्रोफेसर पुन्हा एकदा मात देणार? ‘मनी हाईस्ट’च्या शेवटच्या भागात काय घडणार?

गुन्हेगारी आणि ड्रामावर आधारित अनेक चित्रपट आणि वेब सीरीज आल्या असल्या, तरी 'मनी हाईस्ट'चे (Money Heist ) प्रकरण काही वेगळेच ठरले आहे. या स्पॅनिश वेब सीरीजने जगभरात खळबळ उडवून दिली.

Money Heist Season 5 Part 2 | Alicia गेम चेंजर ठरणार की प्रोफेसर पुन्हा एकदा मात देणार? ‘मनी हाईस्ट’च्या शेवटच्या भागात काय घडणार?
Money Heist 5
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 8:00 AM

मुंबई : गुन्हेगारी आणि ड्रामावर आधारित अनेक चित्रपट आणि वेब सीरीज आल्या असल्या, तरी ‘मनी हाईस्ट’चे (Money Heist ) प्रकरण काही वेगळेच ठरले आहे. या स्पॅनिश वेब सीरीजने जगभरात खळबळ उडवून दिली. काही काळापूर्वी या मालिकेचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आधी लोकांना वाटलं की, हा सीरीजचा शेवटचा भाग आहे, पण सीरीज पाहिल्यावर कळलं की, अजून खरा पिक्चर तर यायचा बाकी आहे.

बरं आता या मालिकेचा शेवटचा भाग म्हणजेच पाचव्या सीझनचा दुसरा खंड म्हणा किंवा फायनल शो, 3 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसागणिक चाहत्यांची उत्सुकता वाढत चालली आहे की, या शेवटच्या भागामध्ये प्रोफेसर आणि टीमचे काय होईल? चोरीच्या सोन्याचे पुढे काय होईल…

प्रोफेसर चोरीत सामील होणार!

‘मनी हाईस्ट’च्या ट्रेलरनुसार प्रोफेसर यावेळी फुल फॉर्ममध्ये दिसणार आहे. ट्रेलरमध्ये ‘रॉयल ​​मिंट ऑफ स्पेन’ आणि ‘बँक ऑफ स्पेन’मध्ये चोरीची योजना आखताना दिसत आहे. प्रोफेसर जे अनेकदा पडद्यामागे मोठे खेळ खेळतात ते, आता आपल्या टीमला वाचवण्यासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत. ट्रेलरमध्ये प्रोफेसरची टीम एकामागून एक विखुरताना दिसली होती. यात रोमान्स, प्रेम, भावना, मैत्री आणि भरपूर सस्पेन्स आहे.

या खास दिवसासाठी प्रोफेसरने काही नियोजन केले आहे का? की त्यांचा चोरीचा खेळ शेवटी संपणार आहे? अॅलिसिया गेम चेंजर असेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज (3 डिसेंबर) कळणार आहे.

अॅलिसिया गेम चेंजर ठरणार?

मनी हाईस्ट टीमच्या सदस्याप्रमाणेच, अॅलिसिया देखील स्पेन, युरोपमध्ये आता एक वाँटेड चेहरा बनली आहे. पोलिसांनी जाहीर केले आहे की, अॅलिसियाने प्रोफेसरशी हातमिळवणी केली आहे. तुम्ही ही मालिका आधी पाहिली असेल, तर तुम्हाला कळेल की अॅलिसिया कोण आहे. सीझन 3 आणि 4 मध्ये अॅलिसियाला या केसच्या तपासासाठी आणले जाते. चौथा सीझन अॅलिसिया आणि प्रोफेसरच्या काउंटरने संपतो. जिथे प्रोफेसर तिच्या बंदुकीच्या धाकावर आहेत.

याआधी, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अॅलिसियाने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा पर्दाफाश केला, ज्यामुळे तिला निलंबित करण्यात आले. अशा परिस्थितीत, पाचव्या सीझनमध्ये, ती एक रहस्यमय पात्र बनते. ती प्रोफेसरसोबत आहे की, तिच्या चलाख मनाने तयार केलेली योजना आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. कारण पाचव्या सीझनच्या खंड 1 मध्ये, अनेकदा असे दिसते की अॅलिसिया कदाचित प्रोफेसरसोबत आहे. पण, शेवटच्या क्षणी अॅलिसिया वॉशरूममध्ये एका शस्त्रास्त्रासह दिसते. याचा अर्थ अ‍ॅलिसिया पूर्णपणे प्रोफेसरच्या बाजूने नाही, त्यामुळे मनी हाईस्टच्या पतनाचे कारण अॅलिसिया असेल का? पुढे काय होईल, असे अनेक प्रश्न आज सुटणार आहेत.

पाचव्या सीझन व्हॉल्यूम 2​​चा ट्रेलर पाहता, आणखी एक गोष्ट लक्षात येते की टोकियोच्या मृत्यूचा टीमवर वाईट परिणाम झाल आहे. ट्रेलरमध्ये पोलिस दल बँकेवर हल्ला करताना दिसत आहे. अशा स्थितीत सोने पोलिसांच्या ताब्यात आले तरी या टीमचे सदस्य जिवंत राहावेत, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

Video | Oops Moment! चाहत्यांचे आभार मानत होती गायिका अन् अचानक खांद्यावरून ड्रेसच निसटला!

Money Heist | ‘मनी हाईस्ट सीझन 5’ सीरीजचा शेवट नाही!, प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवा अध्याय, जाणून घ्या…

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.