‘Money Heist Season 5’च्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित, प्रोफेसरच्या खेळीवर खिळल्यात सर्वांच्या नजरा!

मनी हाईस्ट (Money Heist Season 5) हा नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. त्याच्या शेवटच्या हंगामाची घोषणा झाल्यापासून, प्रेक्षक याबद्दल खूप उत्सुक होते. शेवटच्या हंगामाचा पहिला भाग अर्थात सीझन 5 नेटफ्लिक्सवर आला आहे आणि दुसऱ्या भागाच्या रिलीजची तारीख आधीच ठरवली गेली आहे.

‘Money Heist Season 5’च्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित, प्रोफेसरच्या खेळीवर खिळल्यात सर्वांच्या नजरा!
Money Heist 5
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 4:00 PM

मुंबई : मनी हाईस्ट (Money Heist Season 5) हा नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. त्याच्या शेवटच्या हंगामाची घोषणा झाल्यापासून, प्रेक्षक याबद्दल खूप उत्सुक होते. शेवटच्या हंगामाचा पहिला भाग अर्थात सीझन 5 नेटफ्लिक्सवर आला आहे आणि दुसऱ्या भागाच्या रिलीजची तारीख आधीच ठरवली गेली आहे.

स्पॅनिश मालिकेबद्दल आधीच एक भरपूर चर्चा आहे, परंतु नेटफ्लिक्स ही चर्चा अधिक उच्च करण्याचा प्रयत्न करीत आहे. नेटफ्लिक्सने अलीकडेच यूट्यूबवर ‘मनी हाईस्ट 5’च्या दुसऱ्या भागाचा छोटा टीझर रिलीज केला आहे.

टीझरचे ठळक मुद्दे

नेटफ्लिक्सने या सीरीजचा टीझर आधी स्पॅनिश आणि नंतर इतर भाषांमध्ये रिलीज केला आहे. हा टीझर फक्त 31 सेकंदांचा आहे. टीझरची सुरुवात प्राध्यापकांच्या सहकाऱ्यांच्या निराशेने भरलेल्या चेहऱ्याने आणि प्राध्यापकाच्या आवाजापासून होते. प्रोफेसर म्हणतात, “गेल्या काही तासांत मी माझ्या जवळच्या दोन लोकांना गमावले. आता मी या चोरीमुळे इतर कोणालाही मरू देणार नाही.” या टीझरमध्ये हे स्पष्ट आहे की पहिल्या भागाचे अॅक्शन सीन्स फक्त एक झलक होती, खरा धमाका येणे अजून बाकी आहे.

प्राध्यापकानेही शस्त्र घेतले हाती!

या टीझरमधील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आता प्रोफेसरनेही शस्त्र हाती घेतले आहे. आता प्रोफेसर ताकदीबरोबरच मनाशी लढताना दिसतील. प्रेक्षकांनी या सीरीजदरम्यान प्रोफेसरला फक्त बुद्धी वापरताना पाहिले. टीझर बघून असे वाटते की, या शेवटच्या भागात प्रोफेसरच्या वाट्यालाही काही अॅक्शन सीन्सही येणार आहेत. प्रोफेसर आपल्या टीममधील सदस्यांना वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे.

या अंतिम हंगामाच्या पहिल्या भागात, ‘टोकियो’ शेवटच्या वेळी मरताना दिसली. मात्र, टोकियो अजूनही जिवंत आहे, याबद्दल सोशल मीडियात कयास बांधले जात आहेत. प्रोफेसरचे सर्व साथीदार मरतील की लष्कराच्या विशेष युनिट बँकेवर झालेल्या हल्ल्यात प्रोफेसर त्यांना वाचवण्याचा मार्ग शोधतील? ज्या सोन्याच्या चोरीसाठी प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे त्याचे काय होईल? असे अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे ‘मनी हाईस्ट’च्या सीझन 5च्या दुसऱ्या भागात सापडतील.

अंतिम हंगामाचा पहिला भाग 3 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झाला. त्याचा दुसरा भाग 3 डिसेंबर 2021 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. ही सीरीज स्पॅनिश, हिंदी, इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

National Crush : रश्मिका मंदानाच नाही, तर देशातील तरुणांचा ‘या’ अभिनेत्रींवरही आहे क्रश

Raj Kundra New Trouble : राज कुंद्राविरोधात तक्रार करण्यासाठी शर्लिन चोप्रा मुंबईतल्या जुहू पोलीस ठाण्यात

Nora Fatehi | शॉर्ट्स परिधान करून इंग्रजी गाण्यावर थिरकली नोरा फतेही, पाहा तिचा अतरंगी डान्स Video

Manasi Naik-Pradip Kharera : कपल गोल्स, पाहा अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेराचं नवं फोटोशूट

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.