Crime-Thriller Films | या विकेंडला क्राईम-थ्रिलर चित्रपट-सीरीज पाहण्याचा विचार करताय? मग, ‘या’ पैकी एकाची निवड नक्की करा!

बॉलिवूडमध्ये सर्व प्रकारचे चित्रपट सादर केले जातात. ज्यात अॅक्शन, थ्रिलर, कॉमेडी, ड्रामा, हॉरर, रोमँटिक आणि सस्पेन्सफुल अशा सगळ्याच चित्रपटांचा समावेश आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या प्रकरच्या चित्रपटांना स्वतःचे असे महत्त्व आहे.

Crime-Thriller Films | या विकेंडला क्राईम-थ्रिलर चित्रपट-सीरीज पाहण्याचा विचार करताय? मग, ‘या’ पैकी एकाची निवड नक्की करा!
OTT Movies
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 7:52 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्व प्रकारचे चित्रपट सादर केले जातात. ज्यात अॅक्शन, थ्रिलर, कॉमेडी, ड्रामा, हॉरर, रोमँटिक आणि सस्पेन्सफुल अशा सगळ्याच चित्रपटांचा समावेश आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या प्रकरच्या चित्रपटांना स्वतःचे असे महत्त्व आहे. आजकाल वेब सीरीज पाहण्याचा ट्रेंड वाढला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये असे अनेक चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित झाल्या आहेत, ज्यांनी शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. आज आपण अशाच काही सस्पेन्सफुल चित्रपट आणि वेब सीरीज बद्दल बोलणार आहोत, ज्या एकदा सुरु केल्यानंतर तुम्हाला त्या शेवट पाहण्यास भाग पाडतील…

क्रिमिनल जस्टीस

क्रिमिनल जस्टीस या सीरीजचे दोन भाग डिस्ने हॉटस्टारवर उपलब्ध आहेत. पहिल्या भागात विक्रांत मेस्सी एका मुलीच्या घरी जातो आणि त्याच रात्री मुलीची हत्या केली जाते. विक्रांत अर्थात आदित्यला पोलिसांनी हत्या आणि बलात्काराच्या आरोपाखाली पकडले आहे. आदित्यला न्याय मिळेल का आणि त्या रात्री मुलीला कोणी मारले हे जाणून घ्यायचे आहे, मग ही सीरीज तुमच्या वीकेंडला आणखी खास बनवू शकते. या सीरीजची खास गोष्ट म्हणजे पंकज त्रिपाठी यात वकील बनले आहेत.

एक रूका हुआ फैसला

80च्या दशकातील पंकज कपूर अभिनीत ‘एक रूका हुआ फैसला’ हा एक अतिशय मनोरंजक चित्रपट आहे. असे म्हटले जाते की, या चित्रपटाची कथा इतकी सस्पेन्सफुल होती की, लोक सिनेमागृहामध्ये दोनदा हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. या चित्रपटात एका व्यक्तीच्या हत्येच्या प्रकरणात, 12 सदस्यांची ज्यूरी त्यावर काम करताना दिसते.

 हसीन दिलरुबा

‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. खूनाच्या रहस्यावर आधारित हा एक उत्तम चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेता विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत दिसले आहेत. ज्या लोकांना मर्डर मिस्ट्री पाहायला आवडतात, त्यांच्यासाठी हा चित्रपट खूप चांगला पर्याय आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

दिल्ली क्राईम

रिची मेहता दिग्दर्शित ही वेब सीरीज 2019मध्ये रिलीज झाली होती. या सीरीजचा प्रत्येक भाग भरपूर सस्पेन्सने भरलेला आहे. यामध्ये शेफाली शहा यांनी उपायुक्त वर्तिका चतुर्वेदीची भूमिका साकारली होती. ‘दिल्ली क्राईम’ला देशात आणि जगात खूप प्रशंसा मिळाली आहे. तसेच, 48व्या एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट ‘ड्रामा सीरीज’ हा पुरस्कार देखील मिळाला आहे.

नोव्हेंबर स्टोरी

वेब सीरीज ‘नोव्हेंबर स्टोरी’ ही तामिळ भाषेमध्ये बनलेली वेब सीरीज आहे. ही सीरीज हिंदीत डब आणि रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य पात्र साकारात आहे, अभिनेत्री तमन्ना भाटिया. अल्झायमरने ग्रस्त असलेल्या आपल्या लेखक वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मुलीच्या या कथेमध्ये खूपच सस्पेन्स आहे, ज्यामुळे प्रेक्षक देखील कथेत गुंग होतो.

हेही वाचा :

Kangana Ranaut : जयललिता असत्या तर कंगनाऐवजी ‘या’ अभिनेत्रीला मिळाली असती बायोपिकमध्ये काम करण्याची पहिली संधी

Gautami Deshpande: छबिदार सुरत देखणी, जणू हिरकणी, नार गुलजार… गौतमी देशपांडेचा अस्सल मराठमोळा अंदाज पाहाच!

Sapna Choudhary | आधी अपघाती मृत्यूच्या अफवेची जोरदार चर्चा, आता सपना चौधरीच्या नव्या व्हिडीओमुळे चाहते आनंदी! 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.