Stranger Things 4 Teaser | बहुप्रतीक्षित ‘Stranger Things 4’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, कॅलिफोर्नियात होणार अॅक्शनचा धमाका!
स्ट्रेंजर थिंग्जच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Netflix ने Stranger Things 4 चा टीझर रिलीज केला आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्ज 3’च्या अंतिम भागापुढेच या सीरीजची नवी सुरूवात होते. मालिकेतील जिम हॉपर गायब झाल्यानंतर, इलेव्हनला नवीन शहरात जाण्यास भाग पाडले जाते.
मुंबई : स्ट्रेंजर थिंग्जच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Netflix ने Stranger Things 4 चा टीझर रिलीज केला आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्ज 3’च्या अंतिम भागापुढेच या सीरीजची नवी सुरूवात होते. मालिकेतील जिम हॉपर गायब झाल्यानंतर, इलेव्हनला नवीन शहरात जाण्यास भाग पाडले जाते. पण तिथे तिचे वर्गमित्र अजिबात स्वागतार्ह नाहीत. तिला वर्गात त्यांच्याकडून अनेकदा त्रास दिला जातो.
‘स्ट्रेंजर थिंग्ज 4’ ही सीरीज 2022 च्या उन्हाळ्यात रिलीज होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्ज डे’च्या निमित्ताने, नेटफ्लिक्सने स्ट्रेंजर थिंग्जच्या चौथ्या सीझनचा ‘वेलकम टू कॅलिफोर्निया’ हा चौथा टीझर रिलीज केला आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्ज 4’मध्ये 9 भाग असणार आहेत.
इलेव्हनच्या पत्राने होते टीझरची सुरुवात!
Stranger Things 4 ची सुरुवात एका पत्राने होते ज्यात Elven म्हणते की, ‘प्रिय माइक, आज 185 वा दिवस आहे. मला वाटते की, मी शेवटी या वातावरणाशी जुळवून घेतले आहे आणि मला आता ही शाळा आवडते आहे. मी इथे अनेक मित्र बनवले आहेत.’ मात्र, टीझर पाहून हे स्पष्टपणे कळते की इलेव्हन मैत्री करण्याच्या बाबतीत खोटे बोलत आहे.
इलेव्हन पुढे माईकला स्प्रिंग ब्रेकसाठी तयार होण्यास सांगतो. त्याचवेळी दुसऱ्या ठिकाणी, शाळेच्या वर्गात उपस्थित वर्गमित्र तिची चेष्टा करताना आणि त्याच्याकडे पाहून हसताना दिसत आहेत. इलेव्हन या सर्व गोष्टी एका पत्रात लिहिते, जे पत्र माईक वाचताना दिसत आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘स्ट्रेंजर थिंग्ज 4’ रिलीज होण्याची शक्यता!
टीझरमध्ये या लव्हस्टोरी दरम्यान अचानक बंदुकीच्या गोळ्या, सैनिक, चालत्या गाड्या, हेलिकॉप्टर यासह अनेक अप्रतिम दृश्ये पाहायला मिळतात. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, नवीन सीझन अॅक्शन आणि अॅडव्हेंचरने परिपूर्ण असणार आहे आणि त्यात बरेच सस्पेन्स देखील दडलेले आहे. स्ट्रेंजर थिंग्जचा पहिला आणि तिसरा सीझनही उन्हाळ्यात रिलीज झाला होता. याचा अर्थ असा की चौथा सीझन देखील जुलै ते सप्टेंबर दरम्यान उन्हाळ्यात रिलीज होईल. तर, सध्या अमेरिकेत उन्हाळा सुरु आहे.
स्ट्रेंजर थिंग्जचा चौथा सीझन पाहण्यासाठी तुम्हाला पहिले तीन सीझन पाहावेच लागतील. ही एक हिट मालिका आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. आता चौथा सीझन किती मोठा आहे आणि तो प्रेक्षकांच्या अपेक्षांवर किती खरा उतरतो, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.