OTT This Week : ‘रश्मि रॉकेट’ ते ‘घोस्ट्स’, पाहा या आठवड्यात ओटीटीवर काय काय रिलीज होणार

OTT वर रिलीज झालेले चित्रपट आणि वेब सीरीज प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे सर्वोत्तम स्त्रोत बनले आहेत. आता हळूहळू चित्रपटगृहेही सुरू होत आहेत, परंतु ओटीटीवरील लोकांचा विश्वास आणखी वाढला आहे. नेटफ्लिक्स, वूट, डिस्ने प्लस हॉटस्टार, Amazon प्राइम व्हिडिओ यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या वेब सीरीज आणि चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात.

OTT This Week : ‘रश्मि रॉकेट’ ते ‘घोस्ट्स’, पाहा या आठवड्यात ओटीटीवर काय काय रिलीज होणार
OTT release
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 7:56 AM

मुंबई : OTT वर रिलीज झालेले चित्रपट आणि वेब सीरीज प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे सर्वोत्तम स्त्रोत बनले आहेत. आता हळूहळू चित्रपटगृहेही सुरू होत आहेत, परंतु ओटीटीवरील लोकांचा विश्वास आणखी वाढला आहे. नेटफ्लिक्स, वूट, डिस्ने प्लस हॉटस्टार, Amazon प्राइम व्हिडिओ यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या वेब सीरीज आणि चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. ज्या प्रकारची सामग्री टीव्हीवर दाखवली जाऊ शकत नाही, ती वेब सीरीजमध्ये उत्तम प्रकारे पाहिली जाते.

तर, प्रेक्षकांना चित्रपटांच्या रिलीजसाठी फार काळ वाट पाहावी लागत नाही. ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे आणि येणारा आठवडा प्रेक्षकांसाठी मनोरंजनासाठी भरलेला असणार आहे. तर येत्या आठवड्यात OTT वर कोणते चित्रपट आणि वेब सीरीज रिलीज होणार आहेत ते जाणून घेऊया…

भ्रमम

पृथ्वीराज सुकुमारन यांचा ‘भ्रमम’ हा चित्रपटही 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट तब्बू आणि आयुष्मान खुरानाच्या ‘अंधाधुन’ने प्रेरित असल्याचे मानले जाते. या चित्रपटात राशी खन्ना आणि ममता मोहनदास मुख्य भूमिकेत आहेत.

द घोस्ट्स

‘द घोस्ट्स’ मालिका 8 ऑक्टोबर रोजी वूट सिलेक्टवर रिलीज होत आहे. ही मालिका एका स्वतंत्र पत्रकार आणि शेफवर आधारित आहे, जो एका मोठ्या घरात राहायला येतो आणि इथे त्यांना भूत भेटते. या विनोदी सीरीजचा ट्रेलर चांगलाच आवडला आहे.

सेक्सी बीस्ट

अनोखी संकल्पना घेऊन सेक्सी बीस्ट सीझन 2 पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. डेटिंग शो पुन्हा एकदा काही वयोमर्यादा प्रश्न उपस्थित करेल. आपण एखाद्याच्या/तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारावर प्रेम करू शकता का? ही सीरीज 7 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.

लिटल थिंग्स सीझन 4

‘लिटिल थिंग्स 4’ देखील लवकरच रिलीज होणार आहे. यापूर्वी त्याचे तीन सीझन प्रेक्षकांना खूप आवडले होते, म्हणूनच निर्मात्यांनी त्याचा चौथा सीझन आणला आहे. ही मालिका 15 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.

रश्मी रॉकेट

तापसी पन्नू स्टारर ‘रश्मी रॉकेट’ 15 ऑक्टोबर रोजी Zee5वर रिलीज होत आहे. ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट एका छोट्या गावातील मुलीची कथा आहे, ज्यांना निसर्गाची खास भेट मिळाली आहे. आकाश खुराना दिग्दर्शित हा चित्रपट नंदा पेरियासामी यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.

‘ओटीटी’ मनोरंजनाचा नवा पर्याय

ओटीटी प्लॅटफॉर्म आजच्या काळात सामान्य माणसाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. वेब सीरीज असो किंवा ओटीटीवर रिलीज झालेले चित्रपट असो, लोकांमध्ये त्याबद्दल खूप क्रेझ आहे. याआधी बहुतेक वेब सीरीज ओटीटीवर पाहिल्या गेल्या होत्या, पण कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरच अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटगृहे उघडल्यानंतरही निर्माते त्यांच्या चित्रपटांशी कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत.

हेही वाचा :

‘तू माझ्यासाठी सगळं काही आहेस…’, 11 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय ‘बिग बॉस OTT’ फेम झीशान!

Nora Fatehi | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी नोरा फतेही करायची ‘हे’ काम, अनुभव सांगताना म्हणाली…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.