Pavitra Rishta 2 | ‘मानव’च्या भूमिकेमुळे शाहीर शेख होतोय ट्रोल, अभिनेत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले…
‘पवित्र रिश्ता 2’ (Pavitra Rishta 2) ही मालिका सध्या ‘झी 5’वर प्रसारित होत आहे. अंकिता लोखंडे (Ankita lokhande) या शोमध्ये अर्चनाची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर मानवची व्यक्तिरेखा शाहीर शेख (shaheer Sheikh) साकारत आहे. अंकिताने याआधी पहिल्या भागातही अर्चनाची भूमिका साकारली होती.
मुंबई : ‘पवित्र रिश्ता 2’ (Pavitra Rishta 2) ही मालिका सध्या ‘झी 5’वर प्रसारित होत आहे. अंकिता लोखंडे (Ankita lokhande) या शोमध्ये अर्चनाची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर मानवची व्यक्तिरेखा शाहीर शेख (shaheer Sheikh) साकारत आहे. अंकिताने याआधी पहिल्या भागातही अर्चनाची भूमिका साकारली होती. तर, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने ‘मानव’ साकारला होता. दुसऱ्या सीझनमध्ये शाहीरला मानवच्या भूमिकेत पाहून सुशांतचे चाहते खूप निराश झाले. आता शाहीरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आउटलुक इंडियाशी बोलताना शाहीर म्हणाला की, त्याने सुशांतची जागा घेतली नसून हितेनला रिप्लेस केलं आहे. शाहीर म्हणाला, खरे सांगायचे तर मी हितेनची जागा घेतली आहे, कारण माझ्या आधी तो शोमध्ये मानवची भूमिका साकारत होता. पहिल्या भागाच्या शेवटच्या 2-2.5 वर्षात त्याने मानवची भूमिका साकारली होती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मी हितेनची जागा घेतली आहे. चाहत्यांसाठी मी म्हणेन की, त्यांनी माझी जागा सुशांतशी तोलू नये. त्यानंतर सुशांतने अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे.
मी नसतो तर…
शाहीर पुढे म्हणाला की, त्याने ते पात्र साकारले कारण तो चांगला आहे आणि तो नसता तर इतर कोणत्याही अभिनेत्याने हे पात्र साकारले असते. तो म्हणाला की, हे काहीतरी ताजे आणि नवीन होते, आम्ही ते खऱ्या मनाने केले आहे. मी खूप मनापासून काम केले आहे. जेव्हा मी स्वतःला पडद्यावर पाहिले तेव्हा मलाही ती भावना जाणवली. मला माहित नाही की, लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात. ते माझ्यासाठी काम होते आणि मी कधीही काम नाकारणार नाही. मी एक अभिनेता आहे आणि माझे काम अभिनय करणे आहे. जर, मी हे पात्र केले नसते, तर दुसरे कोणी केले असते. मला हे पात्र खरोखर आवडले आणि त्याच्याशी न्याय करायचा होता.
यापूर्वी शाहीर हे पात्र साकारताना घाबरला होता!
याआधी शाहीरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, हे पात्र साकारण्यापूर्वी तो खूप घाबरला होता. शाहीर म्हणाला होता, जेव्हा मला या शोची ऑफर देण्यात आली होती, तेव्हा मी म्हणालो की, मी ते करू शकणार नाही कारण या शोबद्दल माझ्याकडून अधिक अपेक्षा ठेवल्या जातील. मग मी स्वत:ची समजून काढली की मी अशा प्रकारे हार मानू शकत नाही. मला वाटले की, जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत, म्हणून मी या शोला हो म्हणालो.
‘पवित्र रिश्ता 2’चं नाही तर, सध्या शाहीर ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या शोमध्ये दिसत आहे. तो शोमध्ये देवची भूमिका साकारत आहे. शाहीरसोबतच एरिका फर्नांडिस आणि सुप्रिया पिळगावकर या शोमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. हा शो खूप लोकप्रिय आहे.
हेही वाचा :
Rakhi Sawant | तोकडे कपडे फिरंगी मैत्रिणी… राखी सावंत नव्या फोटोंमुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!