PV Narasimha Rao : प्रकाश झांचा नवा प्रोजेक्ट, नरसिंह राव यांची जीवनकथा लवकरच ओटीटीवर दिसणार!

चित्रपट निर्माते प्रकाश झा (Prakash Jha) यांनी नुकतीच सोमवारी एक मोठी घोषणा केली. प्रकाश झा यांनी अहा ओटीटी (Aha) प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव  (P. V. Narasimha Rao) यांच्यावर सीरीज बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

PV Narasimha Rao : प्रकाश झांचा नवा प्रोजेक्ट, नरसिंह राव यांची जीवनकथा लवकरच ओटीटीवर दिसणार!
Narsimha Rao-Prakash jha
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 3:47 PM

मुंबई : चित्रपट निर्माते प्रकाश झा (Prakash Jha) यांनी नुकतीच सोमवारी एक मोठी घोषणा केली. प्रकाश झा यांनी अहा ओटीटी (Aha) प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव  (P. V. Narasimha Rao) यांच्यावर सीरीज बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेचे नाव ‘हाफ लायन’ (Half Lion) असे असणार आहे. विशेष म्हणजे ही सीरीज अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘हाफ लायन’ हा बायोग्राफिकल ड्रामा विनय सीतापती यांच्या पुस्तकावर आधारित आहे.

अहा स्टुडिओ आणि अॅप्लॉज एंटरटेनमेंट यांनी एकत्र येऊन ही सीरीज बनवली असून, ही सीरीज हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत 2023मध्ये प्रदर्शित होणार आहे.

त्यांनी केलेले अमुल्य बदल जगाला कळावे!

प्रकाश झा यांनी ‘गंगाजल’, ‘अपहरण’ आणि ‘राजनीती’ या सारखे उत्तम चित्रपट दिले आहेत. ते म्हणतात की, आजच्या पिढीतील फार कमी लोकांना पीव्ही नरसिंह राव यांच्याबद्दल माहिती आहे, त्यांनी भारत बदलला आहे आणि या गोष्टी तरुणाईला समजल्या पाहिजेत.

प्रकाश झा पुढे म्हणाले की, ‘त्यांनी भारताला ते आर्थिक स्वातंत्र्य दिले होते, ज्यासाठी आपण सुमारे 45 वर्षे लढलो होतो. त्यांनी आपल्या देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाज आणि दैनंदिन जीवनात बदल घडवून आणला, जो आता पूर्णपणे अपरिवर्तनीय आहे. आज आपण जे आहोत, ते त्या 5 वर्षांमुळे आहोत. चांगलं, वाईट किंवा कुरूप काहीही असो, पण आज आपण जे आहोत ते त्या 5 वर्षांमुळेच!’

पी.व्ही.नरसिंह राव यांचे काम मोठ्या पडद्यावर दिसणार!

सीरीजचे निर्माते म्हणाले की, पीव्ही नरसिंह राव यांची महानता ही होती की, त्यांनी आणलेल्या आर्थिक सुधारणांचे श्रेय त्यांनी कधीही घेतले नाही. परंतु, अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) यांना त्याचे श्रेय दिले होते. राव यांना त्यांचे हक्क कधीच दिले गेले नाहीत हे दुर्दैवी आहे, पण या सीरीजमुळे त्यांचे काम प्रसिद्धीच्या झोतात येईल, असेही दिग्दर्शकाने म्हटले आहे.

लवकरच कलाकारांची घोषणा करणार

निर्माता अल्लू अरविंद, प्रमोटर, AHA आणि व्यवस्थापकीय संचालक गीता आर्ट्स यांनी सांगितले की, नरसिंह राव यांची ही कथा पडद्यावर आणण्यासाठी टीम प्रचंड उत्सुक आहे. शोच्या कलाकारांबाबत अद्याप इतर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कलाकारांचा शोध सुरू झाला आहे.

पीव्ही नरसिंह राव यांनी 1991 ते 1996पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले आणि त्यांच्या कार्यकाळात देशातील मोठ्या आर्थिक सुधारणांचे श्रेय त्यांना जाते. तसे, आतापर्यंत माजी पंतप्रधानांवर अनेक चित्रपट आणि सीरीज बनल्या आहेत आणि त्या सर्वांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या सीरीजकडूनही प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

हेही वाचा :

Vicky-Ankita Wedding | ‘आज मेरे यार की शादी है..’ अंकिता लोखंडे-विकी जैनच्या संगीत सोहळ्याला कंगनाने लावले चार चांद!

Happy Birthday Rana Daggubati | फोटोग्राफीचे व्यवसायिक शिक्षण, अभिनयच नव्हे ‘या’ क्षेत्रातही राणा दग्गुबाती अव्वल!

Happy Birthday Sameera Reddy | आई झाल्यानंतर नैराश्यात गेली, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहतेय समीरा रेड्डी!

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.