Pushpa The Rise : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘पुष्पा’चा ‘अॅमेझॉन’वर होणार प्रिमियर!

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा पुष्पा : द राइज (Pushpa The Rise) हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालतोय. हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राइम(Amazon Prime)वर उपलब्ध होणार आहे.

Pushpa The Rise : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'पुष्पा'चा 'अॅमेझॉन'वर होणार प्रिमियर!
पुष्पा : द राइज
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 7:29 PM

मुंबई : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा पुष्पा : द राइज (Pushpa The Rise) हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालतोय. सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित 7 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिस(Box Office)वर उत्कृष्ट कामगिरी केलीय. या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी म्हणजे हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राइम(Amazon Prime)वर उपलब्ध होणार आहे.

विक्रमावर विक्रम सध्या तिसर्‍या आठवड्यात, पुष्पा अजूनही थिएटरमध्ये चांगला चालतोय. 18व्या दिवशी (रविवार) या सिनेमान बॉक्स ऑफिसवर जगभरात 300 कोटींचा गल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा हा चित्रपट केवळ सहावा दक्षिण भारतीय चित्रपट ठरलाय.

अॅमेझॉनवर येणार बुधवारी Amazon प्राइम व्हिडिओनं एक ट्विट शेअर केलं, त्यात त्यांनी पुष्पाची तारीख जाहीर केली. अल्लू अर्जुनचा “पुष्पा: द राइज” 7 जानेवारी रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होणार आहे. तेलुगू अॅक्शन थ्रिलर 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तमिळ आणि कन्नड भाषांसह डब आवृत्त्यांमध्येदेखील प्रदर्शित झाला. Amazon Prime Videoच्या अधिकृत ट्विटर पेजनं चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा केली.

हिंदी सिनेमे पाहत आला अल्लू अर्जुन अलीकडेच अल्लू अर्जुननं त्याच्या पुष्पा चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत, लहानपणापासून हिंदी चित्रपट पाहत कसा मोठा झालो आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश करणं हा त्याच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा भाग कसा याविषयी खुलासा केला होता. अल्लू अर्जुननं मुंबईतल्या पुष्पा या चित्रपटाच्या विशेष कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडमधील चित्रपटांच्या निवडीबद्दल खुलासा केला होता.

फेब्रुवारीत येणार दुसरा भाग सुकुमार दिग्दर्शित, या चित्रपटात जगपती बाबू, प्रकाश राज, धनंजय, अनसूया भारद्वाज, हरीश उथमन आणि वेनेला किशोर यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. पुष्पाचे दोन भाग असून दुसरा भाग या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होईल. SS राजामौली दिग्दर्शित RRR पुढे ढकलला गेलाय. या आठवड्यात कोणतेही बिग बजेट सिनेमे रिलीज न झाल्यानं बॉक्स ऑफिसवर पुष्पा अजून चालू राहण्याची अपेक्षा आहे.

Deepika Padukone | मॉडेलिंगपासून ते टॉप अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास, आजघडीला आलिशान आयुष्य जगते दीपिका पदुकोण!

Shehnaaz Gill | सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत रमली शहनाज गिल, कठीण काळात स्वतःला ‘असं’ सावरलं!

Radhe Shyam Postponed | प्रभासच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार! ‘राधे श्याम’चं प्रदर्शन लांबणीवर!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.