Rocketry The Nambi Effect | आर. माधवनचा ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ चित्रपट हिंदीमध्येही, या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा!

आर. माधवनच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीबद्दल खूप उत्सुकता बघायला मिळते आहे. OTT वर रॉकेट्री: ओटीटीवर हिंदी आवृत्ती आल्याने हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटाबद्दल आर. माधवनने सांगितले की, ही एक अशी कथा आहे जी संपूर्ण जगाला दाखवण्याची गरज आहे.

Rocketry The Nambi Effect | आर. माधवनचा 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' चित्रपट हिंदीमध्येही, या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा!
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 9:49 AM

मुंबई : आर. माधवन त्याच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ (Rocketry The Nambi Effect) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूड अभिनेता आर. माधवन यांनी केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा चित्रपट 1 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित (Released in theaters) झाला होता. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट दक्षिणेकडील भाषांमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर आधीच प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाची हिंदी आवृत्तीही (Hindi version) ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. यामुळेच हिंदी भाषिक अत्यंत आनंदात दिसत आहेत.

आर. माधवनच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्टची हिंदी आवृत्तीही ओटीटीवर रिलीज

आर. माधवनच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्टची हिंदी आवृत्तीही ओटीटीवर रिलीज झाली आहे. चित्रपटाची हिंदी आवृत्ती वूट सिलेक्टवर प्रदर्शित झाली आहे. यापूर्वी हा चित्रपट दक्षिण भारतीय भाषांमध्ये ओटीटीवर लॉन्च करण्यात आला आहे. अॅमेझॉन प्राइमवर हा चित्रपट दक्षिण भाषांमध्ये उपलब्ध आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच आर. माधवननेही मुख्य भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची पटकथाही आर. माधवन स्वतः. हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही आवडला होता.

हे सुद्धा वाचा

संपूर्ण जगाला ही स्टोरी दाखवण्याची गरज- आर. माधवन

आर. माधवनच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीबद्दल खूप उत्सुकता बघायला मिळते आहे. OTT वर रॉकेट्री: ओटीटीवर हिंदी आवृत्ती आल्याने हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटाबद्दल आर. माधवनने सांगितले की, ही एक अशी कथा आहे जी संपूर्ण जगाला दाखवण्याची गरज आहे. हे लक्षात घ्यावे की लवकरच हा चित्रपट कलर्स सिनेप्लेक्स वाहिनीवर देखील प्रसारित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. चित्रपट दोन भागात विभागला आहे.

या चित्रपटातून आर. माधवनने दिग्दर्शक म्हणून सोडली वेगळी छाप

पहिल्या भागात माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनातील कामगिरी सांगितल्या आहेत. तर दुसऱ्या भागात तो षड्यंत्राचा तसेच त्याच्यावर झालेला अन्याय आणि अत्याचार दाखवण्यात आलायं. या चित्रपटातून आर. माधवनने दिग्दर्शक म्हणून आपल्या वेगळ्या प्रवासाला सुरूवात केलीयं. या चित्रपटात त्यांनी नंबी नारायणन यांची भूमिकाही साकारली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननेही या चित्रपटात कॅमिओ केला होता. या चित्रपटात शाहरुख खान एका पत्रकाराच्या भूमिकेत होता.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.