Sanak Trailer Launch : विद्युत जामवालच्या दमदार अ‍ॅक्शनसह चित्रपटाची कथाही जबरदस्त, पाहा ‘सनक’चा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालच्या (Vidyut Jammwal) आगामी ‘सनक’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोचक आहे. यात एक भावनिक कथा आणि दमदार अ‍ॅक्शन यांची सरमिसळ पाहायला मिळतेय.

Sanak Trailer Launch : विद्युत जामवालच्या दमदार अ‍ॅक्शनसह चित्रपटाची कथाही जबरदस्त, पाहा ‘सनक’चा ट्रेलर
Sanak
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 4:37 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालच्या (Vidyut Jammwal) आगामी ‘सनक’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोचक आहे. यात एक भावनिक कथा आणि दमदार अ‍ॅक्शन यांची सरमिसळ पाहायला मिळतेय. सुमारे 2 मिनिटे 36 सेकंदांचा हा ट्रेलर विद्युत जामवाल सकारात असलेले पात्र ‘विवान’ आणि त्याची पत्नी यांच्यापासून सुरू होतो. त्याच्या पत्नीच्या हृदयाचे ऑपरेशन होणार आहे आणि त्याला ऑपरेशन रूममध्ये नेले जात आहे. मग अचानक काही सशस्त्र लोक हॉस्पिटलवर हल्ला करतात आणि लोकांना मारू लागतात. विद्युत पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो त्या माणसांना एक एक करून मारू लागतो.

विद्युत आपल्या पत्नीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यानंतर नेहा धुपियाची एंट्री होते आहे. ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्याच वेळी, विद्युत रुग्णालयात या सशस्त्र लोकांशी लढत आहे. यादरम्यान तो आपली जोरदार अ‍ॅक्शन दाखवताना दिसतो. चित्रपटाची संपूर्ण कथा एका रुग्णालयात दाखवण्यात आली आहे. रुग्णालयात काही लोकांनी बंदुकीच्या धाकावर विद्युतच्या पत्नीसह अनेकांना ओलिस ठेवले आहे. विद्युत् आपला जीव, पत्नी आणि इतरांचा जीव कसा वाचवेल, हे मोठ्या पडद्यावर पाहणे मनोरंजक असणार आहे.

पाहा ट्रेलर :

विवान हे ‘सनक’ मधील विद्युताच्या पात्राचे नाव आहे. अभिनेत्री रुक्मिणी मैत्र त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात नेहा धुपिया आणि चंदन रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विपुल अमृतलाल शाह यांनी केले आहे. याची निर्मिती झी स्टुडिओ आणि सनसाइन पिक्चर्स यांनी केली आहे. हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2021 रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

अमेरिकन चित्रपटाचा रिमेक

‘सनक’ हा 2002 च्या अमेरिकन चित्रपट ‘जॉन क्यू’ चा हिंदी रिमेक आहे. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते, ज्यात विद्युत गंभीर जखमी झालेला दिसत होता. त्याच्या एका हातात एक मूल आणि दुसऱ्या हातात बंदूक होती. त्याच्या चेहऱ्यावर आक्रमकता दिसून येत होती, जे हे दर्शवत होते की, तो खूप त्रास सहन करूनही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे.

‘ओटीटी’ मनोरंजनाचा नवा पर्याय

ओटीटी प्लॅटफॉर्म आजच्या काळात सामान्य माणसाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. वेब सीरीज असो किंवा ओटीटीवर रिलीज झालेले चित्रपट असो, लोकांमध्ये त्याबद्दल खूप क्रेझ आहे. याआधी बहुतेक वेब सीरीज ओटीटीवर पाहिल्या गेल्या होत्या, पण कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरच अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. 50 टक्के चित्रपटगृहे उघडल्यानंतरही निर्माते त्यांच्या चित्रपटांशी कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत.

हेही वाचा :

Aryan Khan Drug Case: कुणी मेकअप आर्टिस्ट तर कुणी शिक्षक, पाहा आर्यन खानसोबत आणखी कोणकोण अटकेत?

‘वहिनीसाहेब’ पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार, अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या नव्या लूकमुळे चाहते उत्साही!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.