संदीप खरेंचा सुमधुर आवाज, अच्युत गोडबोले यांचे ‘मनात’ ऑडीओ बुकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला!

स्टोरीटेल मराठीवर मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी अत्यंत वेगळी कादंबरी ‘मनात’चे ऑडीओबुक प्रकाशित होत आहे. मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात मांडलेला आहे. फ्रॉइड पासून एरिक फ्रॉमपर्यंत अनेक मानसशास्त्रज्ञांची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख तसेच मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत - एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या ऑडीओबुक ऐकायला मिळणार आहे.

संदीप खरेंचा सुमधुर आवाज, अच्युत गोडबोले यांचे ‘मनात’ ऑडीओ बुकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला!
Manat Audiobook
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 12:47 PM

मुंबई : स्टोरीटेल मराठीवर मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी अत्यंत वेगळी कादंबरी ‘मनात’चे ऑडीओबुक प्रकाशित होत आहे. मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात मांडलेला आहे. फ्रॉइड पासून एरिक फ्रॉमपर्यंत अनेक मानसशास्त्रज्ञांची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख तसेच मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत – एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या ऑडीओबुक ऐकायला मिळणार आहे. मन म्हणजे काय? मनाचा शोध घेताना, प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास गोडबोले यांनी उलगडून दाखवला असून प्रसिद्ध कवी, गायक अभिनेता संदीप खरे यांच्या रसाळ वाणीतून स्टोरीटेल मराठीवर हे ऑडिओबुक ऐकणं हा प्रसन्न अनुभव आहे.

देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा लेखक अच्युत गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडला आहे. अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.

‘मन’ नावाचं प्रकरण!

अच्युत गोडबोले लिखित ‘मनात’  या मानसशास्त्रावरील पुस्तकच्या केवळ सात आठवड्यांत सहा आवृत्त्या निघाल्या. शालेय वयात ‘मनाचे श्‍लोक’ न वाचलेली व्यक्ती दुर्मिळच असेल. गोडबोले यांनाही त्या मनाच्या श्‍लोकांनी मनाविषयी विचार करायला भाग पाडलेलं दिसतं. त्यानंतर पुढच्या आयुष्यभराच्या शालेय, महाविद्यालयीन, चळवळीच्या काळात आणि पुढं विविध महत्त्वाच्या जागतिक कंपन्यांमध्ये काम करतानासुद्धा या मनाच्या प्रकरणानं लेखकाला पछाडलेलं होतं असं दिसतं. व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तोंड देताना या ‘मन’ नावाचं प्रकरण लेखकाच्या मनात कायम डोकावल्याचं जाणवतं.

संदीप खरेंचा सुमधुर आवाज!

साहित्य, कलेच्या प्रांतात मुशाफिरी करतानाही लेखकाला जागोजागी या ‘मनाच्या’ दर्शनानं स्तिमित व्हायला व्हायचं. या आणि अशा अनेक गोष्टींनी लेखक अच्युत गोडबोले यांच्या मनात हे पुस्तक साकारण्याची प्रेरणा आणि बळ लाभलं आहे. सोपी, सुलभ, सुटसुटीत वाक्‍यरचना आणि सर्व प्रकारच्या वाचकांना सहज कळेल अशी ओघवती, खुसखुशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. संदीप खरे यांच्या मधुर आवाजात स्टोरीटेलवर हे ऑडिओबुक ऐकायला सुरवात करताच श्रोते या श्रवणानंदात पूर्ण गुंगून जातात. हे ऑडिओबुक संपूर्ण ऐकल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.

प्रसिद्ध सामाजिक विचारवंत आणि संशोधक डॉ. अभय बंग आणि डॉ. प्रकाश आमटे, प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी बापट, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे, समाजाचं मानसशास्त्राबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारे डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. प्रदीप पाटकर, विविध विद्यापीठांतले मानसशास्त्राचे विभागप्रमुख अशा सर्वांनी मन:पूर्वक दिलेल्या अभिप्रायांनी “मनात’ या पुस्तकाच्या उपयुक्ततेवर आणि सौंदर्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे.

हेही वाचा :

Money Laundering Case : बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुरुंगात जाऊनही घेतली सुकेश चंद्रशेखरची भेट, अनेक सेलिब्रिटी गोत्यात येणार!

Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.