Fardeen Khan | संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’मधून फरदीन खान ओटीटीमध्ये पदार्पण करणार…

या वेब सीरिजमध्ये फरदीन खानसोबतच मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी आणि रिचा चढ्ढा देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. फरदीनने या वेब सीरिजचे काही भाग शूट केल्याचेही सांगितले जात आहे. आता तो पुढच्या शेड्युलसाठी सेटवर दिसणार आहे.

Fardeen Khan | संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी'मधून फरदीन खान ओटीटीमध्ये पदार्पण करणार...
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 10:17 AM

मुंबई : फरदीन खानच्या (Fardeen Khan) बॉलिवूड कमबॅकची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. फरदीन खान ब्लास्ट या चित्रपटातून पुनरागमन करणार असल्याची बातमी होती. या चित्रपटात त्याच्यासोबत रितेश देशमुखही (Ritesh Deshmukh) असणार आहे. मात्र, त्या अगोदरच फरदीन आता ओटीटी पदार्पण करण्यासाठीही तयार आहे. रिपोर्टर्सनुसार, फरदीन खान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या वेब सीरिजमध्ये (Web series) दिसणार आहे. फरदीन भन्साळींच्या नेटफ्लिक्स सीरिज हिरामंडीमध्ये दिसणार असल्याची बातमी मिळते आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

हिरामंडी वेब सीरिज भन्साळींचा ड्रीम प्रोजेक्ट

या वेब सीरिजमध्ये फरदीन खानसोबतच मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी आणि रिचा चढ्ढा देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. फरदीनने या वेब सीरिजचे काही भाग शूट केल्याचेही सांगितले जात आहे. आता तो पुढच्या शेड्युलसाठी सेटवर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी फरदीन खानची सासू आणि अभिनेत्री मुमताजही ‘हिरामंडी’मध्ये दिसणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र, मुमताज या वेब सीरिजमध्ये आहेत की नाही हे अजूनही नक्की सांगता येणार नाही. ‘हिरमंडी’ ही नेटफ्लिक्सची सर्वात महागडी वेब सीरीज असल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

वेब सीरिजमध्ये प्रेम, फसवणूक, राजकारण सर्वच

‘हिरमंडी’ ही भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वीची गोष्ट आहे. यामध्ये लाहोरचा प्रसिद्ध रेड लाईट एरिया, हिरामंडी आणि त्यामध्ये राहणाऱ्या वेश्या दाखवण्यात येणार आहेत. मालिकेत प्रेम, फसवणूक, राजकारण अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ही वेब सीरिज 8 भागांची असेल, त्यातील पहिले दोन भाग भन्साळी स्वतः दिग्दर्शित करणार आहेत. जूनच्या अखेरीस ‘हिरामंडी’चे शूटिंग सुरू झाले होते. त्यासाठी भन्साळींनी मुंबईत लाहोर वसवले आहे. या मालिकेचा सेट अतिशय सुंदर असून हुबेहुब पाकिस्तानच्या लाहोरसारखा दिसतो, असे सांगण्यात येत आहे.

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.